(१०४) वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक अल्लाहच्या आयतींना मानीत नाहीत अल्लाह कधीच त्यांना खर्यापर्यंत पोहचण्याची सद्बुद्धी देत नाही आणि अशा लोकांसाठी दु:खदायक प्रकोप आहे.
(१०५) (पैगंबर काही खोटे रचीत नाही तर) असत्य ते लोक रचीत आहेत जे अल्लाहच्या आयतींना मानीत नाहीत.३० वास्तविक पाहता तेच खोटे आहेत. (१०६) जो माणूस ईमान धारण करूनही इन्कार करण्यावर विवश केला गेला असेल मात्र त्याच्या मनात ईमान असेल (तर काही हरकत नाही) परंतु ज्याने मनापासून कुफ्र स्वीकारले तर त्याच्यावर अल्लाहचा कोप आहे. अशा सर्व लोकांसाठी मोठा प्रकोप आहे.३१
३०) दुसरा अनुवाद असाही होऊ शकतो ‘असत्य तर ते लोक रचीत असतात जे अल्लाहच्या आयतींवर ईमान आणत नाहीत.’
३१) सदरहू आयत त्या मुस्लिमांसंबंधी आहे ज्यांचा त्या वेळी भयंकर छळ केला जात होता आणि असह्य यातना देऊन त्यांना कुफ्रसाठी विवश केले जात होते. त्यांना सांगितले गेले आहे की जर एखाद्या वेळी अत्याचारांपायी विवश होऊन केवळ जीव वाचविण्यासाठी तुम्ही ‘कुफ्रचे वचन तोंडाने उच्चारले, आणि तुमची मने मात्र कुफ्रच्या श्रद्धेपासून अलिप्त राहिली तर क्षमा केली जाईल. परंतु जर मनापासून तुम्ही कुफ्रचा स्वीकार केला तर जगात भले तुम्ही आपले प्राण वाचवा, अल्लाहच्या कोपापासून तुम्ही वाचू शकणार नाही
Post a Comment