एका अशा युगात ज्याविषयी हा दावा केला जातो की, भारत पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था आहे. पाच ट्रिलियन म्हणजे नेमके किती रूपये हे गणित 142 कोटी भारतीयांमध्ये किती जणांना कळतंय हे माहित नाही. बँक, अर्थमंत्रालय, मोठे उद्योगपती ज्यांचा देशात दरारा आहे, ज्या व्यवसायावर त्यांनी बोट ठेवले ते व्यवसाय त्यांचेच.
असो येथे प्रश्न आहे देशातील आत्महत्यांमध्ये का वाढ होते याचा. एका सर्व्हेक्षणातून दरवर्षी देशात दोन लाखांच्या जवळपास लोक मृत्यूला कवटाळतात. म्हणजे दररोज 450 ते 500 लोक आत्महत्या करतात. वर्ष 2019 साली एक लाख जनसंख्येतून 15 लोक आत्महत्या करत होते. यात 21 विद्यार्थ्यांचा समावेश होतो.
भारताच्या लोकसंख्येच्या हिशेबाने काही लोकांना विशेष करून सरकारला असे वाटेल की इतक्या मोठ्या देशात इतक्या लोकसंख्येतून जर एक-दोन लाख लोक आत्महत्या करत असतील तर त्यात विशेष अशी चिंतेची बाब काय? अशी विचार करण्याची जी मानसिकता आहे ती घातक आहे. जर देशातला एकही माणूस ईश्वराने दिलेल्या जीवनाच्या देणगीचा सदुपयोग करत नाही तर त्याचा काय फायदा? कारण जीवनाच्या देणगीची तुलना कशाशीच करता येत नाही आणि केलीही जाऊ नये. कारण जीवन देणं हे फक्त ईश्वराच्या हातातीली गोष्ट आहे. जगभरातील सर्व धनसामग्री उपयोगात आणून देखील मनुष्य एखादा जीव निर्माण करू शकत नाही. म्हणजे मानवी जीवन किती बहुमुल्य आहे. तो काही कारणांनी वाया जाऊ नये, अशी भावना जोवर निर्माण होत नाही तोवर कोट्यावधी लोकांमधून एक दोन लाख लोक मरण पावले तर त्यात काय? असे लोक म्हणणार नाहीत.
देशात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची टक्केवारी जास्त आहे. त्याची अनेक कारणं आहेत. सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक समस्या. शिक्षण मिळालेच तर शिक्षण -(उर्वरित पान 7 वर)
घेतल्यानंतर रोजगार मिळेल की नाही ही समस्या फार मोठी आहे. जी संख्या आत्महत्या करणाऱ्यांची आहे ती देखील या समस्येपुढे लहान आहे. स्त्रियांच्या आत्महत्या बऱ्या प्रमाणात कमी आहेत, असे आकडेवारीवरून दिसून येते. पुरूषांपेक्षा निम्म्या म्हणजे 45 हजार स्त्रिया दरवर्षी आत्महत्या करतात. याचे मूळ कारण असे की कोणतीही स्त्री आपल्या मर्जीने आत्महत्या करत नाही. कारण ती जन्मदाती आहे. तिला तिच्या मुलाबाळांचे संगोपन करायचे असते. ही जबाबदारी माझी नसून मुलांच्या वडिलांची आहे, असा विचार देखील तिच्या मनात येत नाही. ह्या ज्या आत्महत्या महिलांच्या होतात, मग त्या कशा? याचे उत्तर आहे पुरूषांनीच स्त्रीला आत्महत्या करायला भाग पाडलेले असते. एकतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिच्या सन्मानाची लक्तरे तोडली जातात. तसेच ज्या मुली/स्त्रियांबाबतीत असे प्रकार घडतात त्या कुणालाही तोंड दाखवू शकत नाहीत. शेवटचा पर्याय आत्महत्याच उरतो. दूसरे कारण महिलांच्या आत्महत्यांचे ते ही पुरूषच. हुंडाबळीसाठी आजही दरवर्षी हजारो स्त्रियांना एकतर ते त्यांच्या पती, सासू-सासऱ्याच्या जाचाला कंटाळून स्वतः अंगावर राकेल ओतून आगीच्या हवाली करतात, किंवा सासरची मंडळी स्वतःच तिला आगीत जाळून टाकतात आणि आत्महत्येचे नाव देतात. जर अभ्यास केला गेला तर असे दिसून येईल की आत्महत्येसाठी अनेक सामाजिक कारणे असून, यामध्ये आर्थिक कारण फार महत्त्वाचे आहे. प्रत्येक सामाजिक समस्येचे कारण शेवटी अर्थकारणाशीच जोडलेले असते.
दुरखेम नावाच्या एका पाश्चात्य शास्त्रज्ञाने आत्महत्येची चार कारणे दिली आहेत. 1. अहंकार, 2. परोपकार 3. सामाजिक बांधिलकी नसणे किंवा दिशाहीनता 4. फेटालिस्टिक- प्राणघातक.
हे शास्त्रज्ञ पाश्चात्य असल्याने त्यांनी समाजाच्या सामाजिक रचनेचा, मुल्यांचा जो अभ्यास केलेला आहे तो पाश्चात्य संस्कृतीतील समाजाचा आहे. याचा संबंध भारताच्या संस्कृतीशी नसल्याने त्यांनी दिलेली कारण भारतीय समाजाला लागू होत नाहीत. अहंकार करणारा माणूस पाश्चात्य असू शकेल पण भारतातील माणूस आत्महत्या करणार नाही. पण याची दूसरी बाजू पाहिली तर भारतातील लोक जातीच्या अहंकारापोटी स्वतःचा जीव देत नाहीत दुसऱ्याचा जीव घेतात. याचे कारण हा अहंकार त्यांनी स्वतः कमावलेला नाही, अमुक जातीचे असल्याचे आपोआप त्यांना तो अहंकार मिळाला आणि या अहंकारापोटी ते इतरांचे रक्त सांडतात. स्वतःचा जीव देत नाहीत. दूसरे कारण परोपकार म्हटले आहे. पाश्चात्य लोकांचे परोपकाराशी आत्महत्येशी कोणते संबंध माहित नाही पण भारतीय संस्कृतीत परोपकाराचे कोणते स्थान आहे, याबाबत शोध घ्यावा लागेल. तिसरे कारण सामाजिक दिशाहीनता हे भारतीयांना लागू होते आणि चौथे कारण प्राणघातक. याबाबतीत तर काय बोलावे.
एकंदर, भारतात आत्महत्यांत वृद्धी होण्याचे कारण सध्याची अनिश्चित राजकीय आणि आर्थिक व्यवस्था असे आपण म्हणू शकतो. लोक बोलून दाखवत नाहीत करून दाखवितात असेच म्हणावे लागेल.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकत्याच एका सर्वेक्षणाने ही गोष्ट समोर आली आहे की पुरूषांच्या आत्महत्यांमध्ये 33 टक्के वाढ झाली आहे. 71 टक्के आत्महत्या करणारे लोक व्यावसायिक आणि पगारदार वर्गातले आहेत. यात 73 टक्के लोक असे आहेत ज्यांची 5-10 लाख वार्षिक कमाई आहे. तर 52 टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखावर आहे.
पदवीधारकांची आत्महत्यांमध्ये 100 टक्के वाढ झालेली आहे. आर्थिक कारणामुळे 94 टक्के लोक आत्महत्या करतात. कौटुंबिक समस्यांमुळे 107 टक्के जास्त लोकांनी आत्महत्या केली. 45-50 वर्षाच्या वयोगटात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 33 टक्के वाढ झालेली आहे. तर 60 वर्षाच्या वरील वयोगटातल्या लोकांमध्ये 55 टक्क्यांनी आत्महत्या वाढल्या आहेत.
वरील अभ्यासावरून हे स्पष्ट दिसून येते की, जशी देशाची सामाजिक आर्थिक, राजकीय परिस्थिती गोंधळलेली तशीच प्रत्येक माणसांच्या आत्महत्यांचे कारण देखील गोंधळलेले आहे.
- सय्यद इफ्तेखार अहमद
Post a Comment