तरुण आणि असे लोक ज्यांना काही यशप्राप्ती झाली नव्हती काही केल्या त्यांनी दैवी संदेशाला स्वीकारले नव्हते, तरीदेखील आत्मसंतुष्टेमुळे या संदेशाची तीव्रता आणि स्पष्टतेमुळे लोकांच्या लहानशा जीवनात एक प्रकारची हलचल माजविली होती. ह. उस्मान (र.) यांनी वाळवंटात जो आवाज ऐकला होता “जागे व्हा, झोपत राहू नका” याचा स्पष्ट व सरळ अर्थ असा होता की ते लोक खऱ्या झोपेतून जागे झालेले असून एका नव्या जीवनात पदार्पण करत आहेत. पण ज्यांनी यापूर्वीही इन्कार केला होता त्यांनी पुन्हा त्याची पुनरावृत्ती केली की या जगातल्या जीवनापलीकडे कोणतेच जीवन नाही. “आम्हाला परत जीवित केले जाणार नाही.” (कुरआन-४:२९) त्यांच्या म्हणण्याचे उत्तर अल्लाहने दिले, “आम्ही हे आकाश आणि ही धरती सर्व काही जे आकाश आणि या धरतीच्या दरम्यान आहे. उगाच खेळ म्हणून निर्माण केलेले नाहीत.” (कुरआन-२१:१६) “आणि तुम्ही काय समजता आम्ही तुम्हाला उगाच निर्माण केले आहे आणि तुम्ही आमच्याकडे परत आणले जाणार नालीत?” (कुरआन-४४:३८) ज्यांच्या मनामध्ये अविश्वासाने घर केलेले नव्हते खरे पाहता ह्या अवतरणामुळे हे स्पष्ट झाले की हे अवतरण खऱ्या अर्थाने एका प्रकाशासारखे आहे ज्यामध्ये मार्गदर्शनाची शक्ती आले. दुसरीकडे या संदेशाच्या समांतर एक असे व्यक्तिमत्त्व होते, एक पैगंबर ज्यांचे जगणे पाहून ते जो संदेश देत आहेत तो खोटा असेल असे कुणी सांगू शकत नव्हते. एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व ज्यांच्या बाबतीत कुणी हे सांगण्याचे धाडस करू शकत नव्हते की खोटे बोलत आहेत. त्यांना खात्री होती की ते कुणालाही फसवणार नाहीत आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये इतकी बुद्धिमत्ता होती की स्वतः त्यांनाही कुणी फसवू शकत नव्हता. मुहम्मद (स.) यांच्या संदेशामध्ये त्यांना एकीकडे ताकीद करण्यात आली की त्यांनी त्याचा स्वीकार करावा तर दुसरीकडे हे आश्वासन देखील होते की (जर त्यांनी तो संदेश स्वीकारला तर) त्यांचे जगणे आनंदाने ओतप्रोत होईल. “जे लोक म्हणतात, अल्लाह आमचा विधाता आहे आणि त्यावर ठाम राहतात त्यांच्याकडे देवदूत येतात (नि म्हणतात), तुम्ही भिऊ नका की दुःखी होऊ नका. ज्या स्वर्गाविषयी तुम्हांस वचन दिले गेले आहे त्याचा आनंद साजरा करा. आम्ही या जगातील जीवनात तुमच्या मदतीस होतो आणि परलोकातसुद्धा. आणि तुम्हांस हवे ते तिथे लाभेल आणि तुम्ही मागाल ते आहे नितांत दयावंत आणि क्षमाशीलतर्फे मेजवानी म्हणून.” (कुरआन-४१:३०-३२) अल्लाहने अवतरित केलेल्या स्वर्गाविषयीच्या अनेक आयतींमध्ये त्यातील एका आयतीत सांगतो की अनंतकालीन बागा आहेत ज्याचे वचन अल्लाहने पुण्यकर्मींना दिले आहे. त्यामध्ये ते आहे ज्याची ते इच्छा करतात सदासर्वदासाठी, एक असे वचन जे पुण्य करण्यासाठी तुझ्या विधात्याच्या या वचनाशी बांधिलकी आहे. (कुरआन-२५:१५-१६) जे सत्य श्रद्धावंत आहेत त्यांचे वर्णन करताना (अल्लाह म्हणतो) हे ते लोक आहेत ज्यांना आमच्या भेटीची आशा आहे, तर जे श्रद्धाहीन आहेत त्यांना आमच्या भेटीची आशा नाही. असे लोक या जगातल्या क्षुल्लक जीवनाशी समाधानी आहेत. जे श्रद्धावंत आहेत त्याच्या चालीरिती श्रद्धाहीनांशी प्रत्येक बाबतीत विरोधी आहेत. ज्या स्वप्नांत श्रद्धाहीन लोक व्यक्त होते ते असे की त्यांना तिसऱ्याकडून सर्व काही मिळणार ह्याची खात्री होती. सत्यतेला ओळखणे आणि त्याची पुष्टी करणे म्हणजे आपल्या आशा-आकांक्षांना या जगाकडून दुसरीकडे वळवणे इतकेच नव्हे तर या जगात चोहीकडे अल्लाहने जे संकेत प्रकट केले आहेत त्यांचा उलगडा करणेही आहे. “धन्य आहे तो ज्याने आकाशात राशी बनवल्या आणि त्यामध्ये दिवा (सूर्य) आणि चंद्र बनवला आणि त्यानंतर रात्र आणि दिवसाला एकमेकांच्या पाठोपाठ येण्यास भाग पाडले. (हे त्यांच्यासाठी) ज्यांना तेथे घेण्याचा आणि आभार मानण्याची इच्छा असेल.” (कुरआन-२५:६१-६२)
(अनुवाद- स. इफ्तिखार अहमद)
Post a Comment