आपल्या देशावर किंवा जागतिक पातळीवर जर आपण चिकित्सकरित्या नजर टाकली तर लक्षात येईल की गरीब लोक गरीब होत चालले आहेत आणि श्रीमंत श्रीमंत होत चालले आहेत. वर्षानुवर्षे तेच चित्र आपल्याला दिसत आहे. सरकार गोरगरीबांसाठी अनेक योजना राबवत असते. त्याच्याने त्यांना थोडाफार आधार मिळतो. तात्पुरत्या त्यांच्या समस्या सुटतात. पण काही काळातच त्यांची परिस्थिती तशीच होऊन जाते. तसेच कष्ट सुरू होतात, त्याच अपेष्टांना सामोरे जावे लागते आणि ते कर्जबाजारी होतात.
जर आपला तो समाज ज्याची आर्थिक परिस्थिती थोडी चांगली आहे त्याने अशा गोरगरिबांना, दीनदुबळ्यांना आर्थिक आधार दिला तर ही समस्या संपुष्टात येण्यास मदत होईल. तो आधार कसा द्यावा याचे उत्तर या छोटेखानी पुस्तिकेत आपल्याहा मिळेल. मुजाहिद शेख देशमुख लिखित “दीनदुबळ्यांचा कैवारी” या पुस्तिकेत प्रत्येक पानावर गोरगरिबांना कशा प्रकारे व का मदत करावी याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. पवित्र कुरआन आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचा संदेश व शिकवणी या पुस्तकात संकलित करण्यात आलेल्या आहेत. हे वाचून माणसांमध्ये दानधर्म करण्याची इच्छा जागृत होते. याचबरोबर अजून कशा प्रकारे आपण लोकांची मदत करू शकतो याचे पुरावेही या पुस्तकात आढळतात.
या पुस्तकात अशा समाजाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे की ज्यात कोणी भीक मागणारा राहणार नाही. जर आपण या शिकवणींचा विचार केला आणि त्यांची अंमलबजावण केली तर काही काळातच गरीबी कालबाल्य होईल.
इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबईने प्रकाशित केलेले हे पुस्तक आपल्याला नक्कीच विचार करण्यास आमंत्रित करते की आपणही दीनदुबळ्यांच्या समस्यांवर काहीतरी करावे जेणेकरून आपल्या समाजाचा हा घटक सक्षम होऊन आपल्या पायावर उभा राहील. सर्व पुस्तकप्रेमींना विनंती आहे की त्यांनी इतके चांगले व उत्तम पुस्तक अवश्य वाचावे.
- अकबर मलिक
मो.-९३२२७१९५४६
Post a Comment