Halloween Costume ideas 2015

जमाअते इस्लामी हिंद कुनवाड पूरग्रस्तांना देणार घरे बांधून

जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रने पूरग्रस्त कुनवाड हे गाव दत्तक घेतले आहे. जि.प.च्या सहाय्याने जमाअत कुनवाड येथील नागरिकांना घरकुल बांधून देणार आहे. याबद्दलच्या कराराची प्रत प्रकल्प संचालक माने यांना देताना जमाअतचे पदाधिकारी व ग्रामस्थ.

कोल्हापूर 
जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र आणि आयडीएल रिलीफ कमिटी ट्रस्ट तर्फे 26 जानेवारी 2020 पासून कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी घरकुलांच्या बांधकामास सुरूवात करणार आहे. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या दरम्यान, 20 जानेवारी 2020 रोजी एक सामंजस्य करार झाला. ज्या अनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील कुनवाड हे गाव घरकुलांच्या बांधणीसाठी जमाअतने दत्तक घेतले आहे.
    सुरूवातीच्या टप्प्यात 38 पूरग्रस्त कुटुंबांसाठी घरकुलं बांधण्यात येतील आणि स्वच्छ पेयजलासाठी 2 प्युरिफायर ही उपलब्ध करून दिले जातील. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात काही महिन्यापूर्वी भयानक पूर आला होता. आणि हा तालुका पुरामुळे सर्वात जास्त क्षतिग्रस्त झाला. याच तालुक्यातील कुनवाड आणि इतर गावांमध्ये कित्येक दिवस पूर परिस्थिती कायम होती. सुरूवातीपासून जमाअत-ए-इस्लामी हिंद व आयआरडब्ल्यूच्या-(उर्वरित पान 2 वर)
 स्वयंसेवकांनी या भागातील पूरग्रस्त लोकांची सर्वोतोपरी मदत केली होती. येथील नागरिकांचे पुरामुळे झालेल्या सर्वांगीन नुकसानीकडे पाहता त्यांना मदतीची गरज होती.
    राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांसाठी फिल्ड रिलीफ फंड आणि आवास घरकुल योजने अंतर्गत 95 हजार रूपये ते 1 लाख 20 हजार पर्यंतची रक्कम पात्र पूरधारकांना मिळते. मात्र घरकुलाच्या निर्मितीसाठी एवढी रक्कम अपुरी आहे. म्हणून जमाअते इस्लामी हिंद आणि आयडीएल रिलीफ ट्रस्ट मिळून या गावातील घरांच्या नुकसानीचा अभ्यास केला. तुटलेल्या घरांची अभियंत्यांकडून पाहणी करून घेतली आणि प्रत्येकाला आरसीसीचे घरकुल तयार करण्यासाठी कमीत कमी 3 लाख रूपये लागतील. याचा अंदाज बांधला. सरकारतर्फे मिळालेल्या रक्कमेत जमाअते इस्लामी उर्वरित रक्कम म्हणजे जवळ-जवळ 2 लाख रूपये प्रत्येक घरकुलासाठी टाकून हे बांधकाम करून देईल आणि हे काम पुढच्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले तर पुढच्या टप्प्यात कुरूंदवाड, राजापूर, हेरवाड आणि सांगली जिल्ह्यातील भिलवाडीमध्ये सुद्धा घरकुलांची बांधणी केली जाईल. शिवाय, विद्यार्थी संघटना एसआयओ तर्फे आवश्यक ते शालेय साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देईल. तसेच ग्रंथालयामध्ये पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येतील.
    पुनर्वसनाच्या या प्रकल्पावर 2 कोटी 48 लाख रूपये खर्च येणार आहे. हा सामंजस्य करार होत असताना सरकारतर्फे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जमाअते इस्लामी महाराष्ट्र समाजसेवा विभागाचे सचिव मुहम्मद मजहर फारूख, डीआरडीएचे प्रोजेक्ट डायरेक्टर अजयकुमार माने, जिल्हा प्रकल्प अधिकारी वैशाली म्हस्के आणि जमाअतचे इस्लामी हिंद कोल्हापूरचे इस्माईल शेख, एसआयओचे आशपाक पठाण उपस्थित होेते.
    जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. जेव्हा-जेव्हा देशात संकटाची स्थिती उत्पन्न होते तेव्हा-तेव्हा नागरिकांच्या मदतीसाठी जमाअत त्यांच्यासाठी धावून मदतीचा हात देते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget