भांडवलवादी साम्राज्याजवळ स्त्रियांच्या शोषणाचे आणखी एक क्षेत्र, सौंदर्य वाढविणारे उत्पादन आणि फॅशन आहे़ यामुळे जगभराच्या भांडवलदारांना दरवर्षी 19 अब्ज डॉलरचा नफा होतो़ यासाठी ते जुलूम, अत्याचार, छल-कपटाच्या सर्व मार्गांचा उपयोग करतात़ सौंदर्य स्पर्धा, फॅशन परेड, ख्यातनाम व्यक्तींची संस्कृती, इंग्रजी वर्तमानपत्राच्या तीन क्रमांकाचे पृष्ठ (पेज 3), स्त्रियांची असंख्य नियतकालिके, टी़व्ही़शोज्, रियालिटी) शोज् इत्यादी त्या चलाखीचे लबाडीचे काही प्रकार आहेत़ वर्तमानपत्र आणि टी़व्ही़ वरील जाहिरातींतील एक मोठा भाग या फायदेशीर उद्योगाला समर्पित असतो़ या फसवाफसवीने भरलेल्या खेळास बळी पडून स्त्रिया आपले आरोग्य, शांती आणि समाधान या सर्वांचा नाश करतात़ प्रसिद्ध मानसशास्त्रीय नियतकालिक ‘सायकॉलॉजी टूडे’ ने एक मानसिक रोग ‘बॉडी मानिया’ची ओळख केली आहे़ या रोगाला स्त्रिया बळी पडत आहेत़ ज्या (स्त्रिया) आपल्याला सुंदर बनविण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार होतात़
भांडवलदारवर्ग सर्वप्रथम सौंदर्य स्पर्धा, प्रख्यात व्यक्ती आणि ‘पेज थ्री’ मार्फत काही सुंदर स्त्रियांना मॉडेलच्या स्वरूपात प्रस्तुत करून जगभराच्या तरूण स्त्रियांना, त्यांच्यासारखे बनण्याचे वेड आणि उन्माद निर्माण करतो़ हे वेड भांडवलदार वर्गाची सर्वांत मोठी कार्यसिद्धी असते़ या वेडाच्या आधारावर भांडवलदारांच्या अब्जावधी डॉलरच्या उद्योगाची भांडवलवादी इमारत उभी राहते़ सुरूवातीला स्पष्ट स्वरूपात हानिकारक असल्याची जाणीव न होणारे क्रीमस्, जेली इत्यादी सौंदर्य वाढविणारी उत्पादने होत़ असंख्य प्रकारचे लोशन, तेल, क्रीम, पावडर, लिपीस्टिक, फाउंडेशन्स, पॉलिश, शॅम्पू, डी़ओ़, कन्डीशनर, वॅक्स इत्यादी उत्पादने स्त्रियांना विकली जातात़ फक्त अमेरिकेमध्ये 8 अब्ज डॉलरच्या कॉस्मेटिक्सची (सौंदर्य प्रसाधने) विक्री होते़ या रकमेच्या तीन चतुर्थांश भागाद्वारे (6 अब्ज डॉलर) जगातल्या सर्व अशिक्षित लोकांना शिक्षण देण्याची व्यवस्था करता येऊ शकते़ ही सौंदर्य प्रसाधने बनविणार्या भांडवलदारांना स्त्रियांचे आरोग्य आणि त्यांच्या प्राणांची असुरक्षितता यांच्याशी काही देणे घेणे नसते़
अमेरिकेहून येणार्या वस्तूंची कोणतीही परीक्षा किंवा तपास न करता त्या आपल्या देशात स्वीकारल्या जातात़ अमेरिकेमध्ये सौंदर्यप्रसाधनांची परीक्षा करण्याचे आणि त्यांचा आरोग्यावर होणार्या प्रभावाचा शोध घेण्याचे कोणतेही तंत्र अस्तित्वात नाही़ फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन, जी औषधांची परीक्षा व तपास करते तिच्या कार्यक्षेत्रात ही उत्पादने (सौंदर्य प्रसाधने) येत नाहीत आणि त्यांची परीक्षा आणि तपास करण्याची कोणतीही वैकल्पिक व्यवस्था नाही़
अमेरिकेचीच एक संस्था इ़डब्ल्यू़ जी़ च्या अहवालानुसार या सौंदर्यप्रसाधनांमध्ये कित्येक विषारी घटक असतात़ एवढेच नसून कॅन्सर निर्माण करणारे रासायनिक पदार्थसुद्धा त्यात आढळले आहेत़
या संस्थेने अमेरिकेच्या निरनिराळ्या शहरांतील तरूण मुलीचे सर्वेक्षण केले, त्यानुसार त्या मुलींच्या रक्तात आणि लघवीमध्ये सौंदर्यप्रसाधनात उपयोग केले जाणारे विषारी रासायनिक घटक (मस्कस, पॅराबेन्स, ट्रिकलोसन, पॅथालेटस) असून या घटकामुळे कॅन्सर होतो, तसेच हार्मोन्समधील बदल असे गंभीर रोग निर्माण करतात़ या मुली दररोज सरासरीने 17 सौंदर्य प्रसाधने वापरत असत. त्यांच्या शरिरात हार्मोन्स परिवर्तन करणारे सरासरी 13 रासायनिक घटक आढळून आले आहेत़ हे रासायनिक घटक, तारूण्यात हार्मोन्समध्ये परिवर्तन, मानसिक आरोग्य, जननक्षमता, हाडे वाढणे यासारख्या बाबींवर प्रभाव पडतो़
अमेरिकेच्याच एका दुसर्या संस्थेने ग्राहकांच्या मार्गदर्शनासाठी हानिकारक रासायनिक घटकांनी बनलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा एक डेटाबेस तयार केला आहे़ या डेटाबेसमध्ये ज्या कंपन्यांची नावे आहेत त्यात ले ऑरेल, प्रॉक्टेट अँड गॅम्बल, कॉम्बी आयएनसी इ. यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे, त्यांची उत्पादने आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर विकली जातात़

Post a Comment