Halloween Costume ideas 2015

नांदेड येथे महिलांचा एल्गार; सीएए, एनसीआरचा निषेध

Nanded
नांदेड (शोधन सेवा)
केंद्र शासनाने नागरिकत्व संशोधन कायदा आणि एनआरसीच्या माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. हा कायदा नागरिकांच्या मुलभूत हक्काविरूद्ध आणि संविधानाच्या आत्म्याविरूद्ध आहे. असे म्हणत नांदेड येथे सर्वधर्मीय महिलांनी निषेधमोर्चा काढीत भव्य सभा घेतली. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
    नांदेड येथे काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. त्यामध्ये हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. त्यानंतर रविवारी देगलूर नाका भागातील मदिनतुल उलूम शाळेच्या मैदानावर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चातील महिलांच्या हाती विविध घोषणांचे फलक लावले होते. लाठी-गोली सरकार नहीं चलेगी, विद्यार्थ्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही, नागरिकत्व संशोधन कायदा मागे घ्या, इस देश में एकता का राज चलेगा अशा घोषणा देण्यात आल्या. विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले. यावेळी उज्वला पडळकर, सुप्रिया गायकवाड, मुब्बशरा खान, आलेमा आयेशा फातेमा, अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर, डॉ. अर्शिया कौसर, डॉ. करूणा जमदाडे, सय्यदा साहिबा तनवीर, अ‍ॅड. ज्योती चंदनशिवे, आमीन कलीमुद्दीन, जोहरा बेगम, सय्यदा फाकेरा तनवीर, अर्शी फातेमा, मदिना खानसह हजारोंच्या संख्येने महिलांची निषेध सभेत उपस्थिती होती.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget