Halloween Costume ideas 2015

धार्मिक आधारावर संविधानविरोधी कायदे सरकार आणत आहे : तिस्ता सेटलवाड

मोमीनपूरा, पुणे (वकार अहमद अलीम) 
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य घडविण्याचा... या शब्दांनी सुरूवात होणारे भारताचे संविधान, देशातील व्यक्ती केंद्रस्थानी मानून, स्वातंत्र्य आणि समतेची कास धरणारा एक जीवंत दस्तावेज आहे. भारतीय घटनेच्या नागरिकत्व तरतुदीमध्ये स्पष्ट शब्दात लिहलंय की, कोणत्याही व्यक्तीबरोबर धर्म, जात, वंश, लिंग, समुदाय आणि भाषा, या निकषांच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. पण आता केंद्रातील संघप्रणीत भाजपा सरकार, भारतीय संविधानाच्या या मुलभूत तत्वांना पायदळी तुडवित आहे. पहिल्यांदाच देशाचे नागरिकत्व देताना व नाकारताना धर्माचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे संबंध देशात याविरूद्ध सर्व धर्मीय, सर्व जातीय लोकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. धार्मिक आधारावर संविधानविरोधी कायदा एनआरसी, सीएए, एनपीआर भाजप सरकार आणित आहे, त्याला सर्वांनी एकजुटीने संविधानानुसार विरोध केला पाहिजे, असे अत्यंत अभ्यासपूर्ण आवाहन देशातील एक निर्भिड समाज कार्यकर्ती तथा सिटीझन फॉर जस्टीस अ‍ॅण्ड पीसच्या प्रमुख तिस्ता सेटलवाड यांनी कले आहे.
    पुणे येथील मोमीनपुरा चौकी परिसरात 12 जानेवारी रोजी एनपीआर, एनआरसी, सीएए विरोधी, संविधान सन्मान सभेचे आयोजन ऑल मोमीनपूरा युथ फ्रेंड्स सर्कल, पुणे यांनी केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश बी.जे. कोळसे पाटील होते. मंचावर शिख धर्माचे मोहनदरसिंह खंडोरी, लोकायत पूणेचे प्रमुख निरज जैन, सर्वजीत बनसोडे आदि उपस्थित होते.
    यावेळी तिस्ता सेटलवाड म्हणाल्या की, मोदी सरकार बेरोजगारी, महागाई आदी महत्त्वाच्या अंमलबजावणीमध्ये सपशेल फेल झाली आहे. देशातील लोकांचे लक्ष दूसरीकडे वळविण्यासाठीच असे असंवैधानिक कायदे भाजप सरकार आणीत आहे. जगातील एकाही देशाने नागरिकता नोंदणीच्या कागदपत्रात धर्माचा संबंध असलेला एकही दस्तावेज पारित केला नाही. देशातील 42 टक्के लोकांकडे स्वतःच्या जन्मदाखल्याचे कागदपत्रे नाहीत, 75 टक्के लोकांकडे जीवन बिमा एलआयसी पॉलीसी नाही. देशात सर्व प्रथम आसाममध्ये नागरिकता नोंदणी सुरू झाली. त्यासाठी 52 हजार सरकारी अधिकार्‍यांनी काम केले निष्पन्न काय? देशाचे भूतपूर्ण राष्ट्रपती फखरूद्दीन अली अहमद यांचे संपूर्ण कुटुंबिय घुसखोर ठरले. कारगील युद्धाचा, वीरचक्र सन्मानित, ज्याने भारतीय सैन्यात 34 वर्षे देशसेवा केली. त्यांना घुसखोर ठरवून, डिटेंशन सेंटर (अमानवीय छळछावणी) मध्ये डांबण्यात आले. एनपीआर म्हणजेच एनआरसी असून त्याचा सर्वांनी एकजुटीने संवैधानिक मार्गानेच विरोध करावा, असे आवाहन तिस्ता यांनी केले. यावेळी सर्वजीत बनसोडे म्हणाले, देशात दंगली घडविण्याचा षडयंत्र रचले गेला आहे. मोदी आणि अमित शहा यांनी देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. प्रधानमंत्री सारख्या उच्च पदावरील व्यक्ती म्हणते ” कपडे देखकर आंदोलन करनेवालों की पहचान होती है” यातून त्यांचा हेतू स्पष्ट होतो.  शायर तनवीर गाझी म्हणतात, ”फिरका परस्तों को वो, माबुद लगता है, हमारी आँख को तो वो, बारूद लगता है” एनसीआरसाठी आपल्या आई-वडिलांचे जन्म, काळ स्थळाची आवश्यकता आहे, 1974 पूर्वीच्या दस्तावेजाची सक्ती होणार आहे, यावर चुटकी घेताना बनसोडे म्हणाले, ” मोदीजी आपके डिग्री के काग़जात अभीतक नहीं मिले, आपके मंत्री स्मृती इराणी की डिग्री (बोगस) के का़ग़जात भी अभीतक नहीं मिले.” तो सर्वसामान्य नागरिकों को 1971 के पहले के कागजात कहाँ से मिलेंगे? इतिहासात, छत्रपती शिवाजी महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे ”सत्याची आवाज” दाबण्याचा प्रयत्न. झालेला आहे. बरे आहे! दिवाळी मुसलमानांचा सण नाही. अन्यथा आरएसएसवाले म्हणाले असते, ” मुसलमानांची मुले बॉम्ब फोडण्याची प्रॅक्टिस करत आहेत. आपले अभ्यासपूर्ण मनोगताचा समारोप बनसोडे यांनी प्रसिद्ध शायर, राहत इन्दोरी यांच्या एक शेरने केली, मेरा जमीर, मेरा एतबार बोलता है, तू झूठ बडे शानदार तरीके से बोलता है.
    लोकायत पुणेचे प्रमुख आय.आय.टी. खडगपूरचे विद्वान, निरज जैन यांनी आरएसएस आणि भाजपाच्या विचारसरणीचा पर्दाफाश करताना सांगितले की, गोहत्या, मॉब लिचिंग आदी अनेक प्रकारे एक मानसिकता तयार केली जात आहे, अ‍ॅन्टी मुस्लिम ”मुस्लिम विरोधी” हे हिंदूच्याही बाजूने नाहीत. स्वातंत्र्य मिळण्याअगोदर म.गांधी, पंडित नेहरू, मौ. आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहील असे घोषित केले होते. पण 1942 साली, बॅरिस्टर जीना यांचा मुस्लिम लीग आणि वि.दा. सावरकर यांचा ’हिंदू महासभा’ यांनी मिळून, प्रांतीक सरकार चालविले होते.
    संघ भाजप धर्माचा उपयोग केवळ सत्ता प्राप्तीसाठीच करतो, असे घणाघात करताना, निरज जैन म्हणाले, 2014 नंतर केवळ पाच वर्षात देशातील अब्जाधीशांची संख्या, 2014 साली- 19 तर 2020 साली - 56 इतकी झाली आहे. या काळात कॉर्पोरेट स्ट्रक्चरचे 20 लाख कोटी रूपये कर्ज माफी झाली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे 28 लाख कोटी रूपये, टॅक्स फ्री करण्यात आले आहेत. देशातील सर्वसामान्य जनता बेरोजगारी, महागाई, शेतकर्‍यांची आत्महत्या आदि ज्वलंत प्रश्‍नांसंबंधी उठाव करू नये म्हणूनच केंद्र सरकार असे विवादास्पद, संविधान विरोधी कायदे आणत आहे. यावेळी शीख समाजाचे मोहनदरसिंह खंडारी, मौलाना अलीम, शिंदे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सभेला अतोनात गर्दी होती, महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. घोरपडे चौकात जागा अपूरी पडल्याने, शेजारच्या चौकात, गल्लीत, साईट स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती. अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने रात्री 10 पर्यंत सभा चालली. पुणे पोलिसांचेही चांगले सहकार्य मिळाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऑल मोमीनपूरा, युथ फ्रेंड्स सर्कल, पूणे यांची शेकडो तरूण कार्यकर्ते, अतिशय श्रम घेतले म्हणूनच सभा अत्यंत यशस्वी झाली.
    अध्यक्षीय समारोप करताना, माजी न्यायमूर्ती बॅरिस्टर बी.जे. कोळसे पाटील म्हणाले,“मुस्लिम तो एक बहाना है,
दलित, ओबीसी नशाना है. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, मनुस्मृती प्रणीत वर्णव्यवस्था कायम ठेवायची आहे म्हणून इतर हिंदूंना ताब्यात ठेवायचं आहे, देशातील प्रसारमाध्यम (प्रिंट आणि विद्युत) एखादा दुसरा अपवाद वगळता देशद्रोही आहेत. नरेंद्र मोदी सारखे खूनी आणि अमित शहा सारखे तडीपार लोक, देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्री पदावर कसं काय बसू शकतात? असा रोखठोक सवाल विचारीत माजी न्यायमूर्ती म्हणाले, आसाममध्ये (एनसीआर) राष्ट्रीय नागरिकता नोंदणी फसली म्हणून सीएए (सिटीझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट) म्हणजेच नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणला. त्यापेक्षा खतरनाक कायदा म्हणजे एनपीआर (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्री) नरेंद्र मोदी यांनी स्वतःची बायको सांभाळू शकले नाही, देश काय सांभाळणार? असा यक्षप्रश्‍न टाकीत, बॅरिस्टर कोळसे पाटील म्हणाले, ”मुठभर बांडगूळ सोडून समस्त देशवासियांसाठी हे नवीन कायदे घातक आहेत. संघाला मनुस्मृतीनुसार वर्णव्यवस्था हवी आहे, देशातील समस्त नागरिकता, डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार समानता हवी आहे. संविधान मनुस्मृती को जलाता है, इसलिए संघीष्ट संविधान को जलाते हैं” एनपीआर, एनसीआर अँड सीएए हे देशाला पुन्हा गुलाम बनविण्यासाठी आणले जात असल्याचा घणाघात करून, माजी न्यायमूर्तींनी आपले सडेतोड विवेचन पूर्ण केले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget