Halloween Costume ideas 2015

संविधानाप्रति जागरूकता अन् आवड निर्माण करणे आवश्यक

नागपूर (एम.ए. रशिद)
आज देशभरात दोन प्रकारची आंदोलन सुरू आहेत. एक आंदोलन संविधानाच्या रक्षणासाठी, त्याच्या मुल्यांना जोपासण्यासाठी, ती कायम राहण्यासाठी सुरू आहे. तर दूसरे संविधानाच्या मुल्यांवर हल्ला करून त्याला तोडण्याचा प्रयत्न करणार्‍यांकडून ही होत आहे. या परस्परविरोधी आंदोलनात जानकार आणि देशप्रेमी व्यक्तीला संविधानाच्या रक्षणासाठी, त्याच्या मुल्यांची जोपासणा करण्यासाठी जी आंदेालन सुरू आहे त्यात सहभागी व्हावे. खरे तर संविधान काय आहे किंवा संविधानाची मुल्ये काय आहेत, याची जागरूकता वाढण्यासाठी, संविधानाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी  संविधानावर आधारित  निबंध लेखन व स्पर्धा आयोजित करणे गरजेचे आहे. या स्पर्धांमधून युवकांत आपल्या संविधानाबद्दल आदर निर्माण होऊन ते संविधानाच्या रक्षणासाठी, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असे मत जमाअत इस्लामी हिंद नागपूरचे सदस्य डॉ. नुरूल अमीन ख्वाजा यांनी येथे व्यक्त केले.
    फोरम फॉर डेमोक्रेसी कम्युनल एमिटी च्या वतीने  ’संविधान’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूर विभागातून निबंध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठीचा बक्षिस वितरण कार्यक्रम जाफर नगर, टीचर्स कॉलोनीच्या मर्कज़ हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी सीएए , एनपीआर व  एनआरसीवर चर्चासत्रही पार पडले. मंचावर जगजीत सिंह (अंध श्रद्धा निर्मूलन समिति), मिलिंद पाखले (आंबेडकर वादी विचारक) व एफडीसीएचे सचिव ए.एच. फारूकी उपस्थित होेते.
    एफडीसीएची स्थापना देशात सांप्रदायिक सौहार्द वाढविण्यासाठी झाली आहे. याची माहिती देतांना सचिव ए.एच. फारूकी म्हणाले, या मंचच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या हायस्कूल, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांतील पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये ’कॉन्स्टिट्यूशन आफ इंडिया, इट्स इंर्पोटेंस, नेसेसिटी आणि चैलेंजेस फेसिंग इट’ या विषयावर मराठी, इंग्रजी आणि उर्दू भाषेमध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.    
    जगजीत सिंह(अंध श्रद्धा निर्मूलन समिति) म्हणाले, भारत देश जात- पातीवरून नाहीतर विविधेतील एकता आणि एकात्मेमुळे जगात ओळखला जातो. मी स्वतः आपल्या धर्माच्या कॉलममध्ये भारतीय लिहितो. परंतु, आता जात-पातच्या नागरिकतेच्या कॉलम गडद झाला असून, देशाकरिता जास्त संकट बनून पुढे आल्याचे दिसून येत आहे.
    मिलिंद पाखले (आंबेडकर वादी विचारक) यांनी एनपीआरवर आपले मत मांडताना सांगितले कि, देशवासियांकरिता ही अत्यंत किचकट आणि शंका उत्पन्न करणारी प्रक्रिया आहे. यामुळे लोकं घाबरून गेली आहेत. बलात्कार, शेतकरी आत्महत्या , बेरोज़गारी , गरीबी दूर करण्यासारख्या मुद्यांवर देशवासियांना मुक्ती मिळवून द्यायची गरज आहे.
  नितिन चौधरी(ओबीसी संगठन प्रमुख) म्हणाले, देशाच्या संविधानाला आम्हा सर्वांनी वाचायला पाहिजे. सीएए, एनआरसी, एनपीआर संविधान विरोधी आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यांना संविधान ची  एक-एक प्रत सुध्दा देण्यात यायला पाहीजे, असेही त्यांनी सूचविले. तसेच देशाच्या  संविधानाला बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सोबती मौलाना हसरत मोहानींसह घटनासमितीच्या सद्यांनी  कठोर परिश्रम करून तयार केले आहे. म्हणून या संविधानाला देशवासियांनी वाचायला पाहीजे. त्याला समजून त्याचा  सम्मान करायला पाहीजे. हे  संविधान ज्याने देशांतील प्रत्येक नागरिकाला एक समान अधिकार दिले आहेत. दुर्भाग्याने याला बदलविण्याचे भयंकर षड्यंत्र सुरू असल्याचे दिसत आहे. याविरुध्द संपूर्ण देशवासियांनी उभे होण्याची गरज आहे. देशाचे संविधान तोडणार्‍याविरूद्ध संविधानाची सुरक्षा करणार्‍या लोकांना शेवटपर्यन्त लढण्याची आवश्यकता आहे. हे आंदोलन तेव्हा पर्यन्त सुरू राहील जेव्हा पर्यन्त संविधान विरोधी सीएए, एनआरसी आणि एनपीआर मागे घेतले जात नाही. यावेळी डीआरबी सिंधु महाविद्यालय नागपूरच्या विशाखा रमेश पिहुलकर यांना मराठी भाषेत, सोनाली सागराम यांना इंग्रजी भाषेत तर राका आइमा अब्दुल बासित ला उर्दू भाषा मधे प्रथम बक्षिस च्या स्वरूपात प्रत्येकाला  5000 रूपपये बक्षीस दिले. लेमदनो पाटिल महाविद्यालय मंडल नागपूरला इंग्रजी भाषेत, आशना याकूब कुरेशी ला उर्दू भाषेत द्वितीय पुरस्कार च्या स्वरूपात रुपए 3000 देण्यात आले. उर्वरित प्रतिस्पध्यांना प्रोत्साहनपर  1000 रूपये व सन्मानपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन अजहर खान यांनी केले. निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, एफसीएचे पदाधिकारी उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget