Halloween Costume ideas 2015

निकाह (विवाह) : प्रेषितवाणी (हदीस)

वरीलप्रमाणे निकाहच्या वेळी ‘ख़ुतबा’ (प्रवचन) चे पठण केले जाते. या ठिकाणी याचे उद्धरण करण्याचा उद्देश असा की निकाह फक्त आनंदाचे नाव नसून ते एक वचन आहे जे एक  पुरुष आणि एक स्त्रीच्या दरम्यान निश्चित करण्यात येते की ‘‘आम्ही दोघे जीवनभराचे जोडीदार आणि सहाय्यक बनलो’’ आणि हे वचन देताना अल्लाह आणि मानवजाती दोघांना  साक्षीदार बनविले गेले आहे आणि निकाहच्या प्रवचनातील आयती या गोष्टीकडे स्पष्टपणे इशारा करतात की जर हे वचनात पती अथवा पत्नीकडून एखादा बिघाड निर्माण करण्यात   आला आणि त्यास योग्य प्रकारे पार पाडण्यात आले नाही तर अल्लाहचा राग त्याच्यावर भडकेल आणि त्याला नरकाची शिक्षा दिली जाईल. या तीन्ही आयतींमध्ये ईमानधारकांना  सांगण्यात आले आहे आणि अल्लाहच्या रागापासून स्वत:चा बचाव करण्याची ताकीद देण्यात आली आहे. या आयतींचा अनुवाद पुढीलप्रमाणे आहे–
(१) हे ईमानधारकांनो! अल्लाहच्या कोपापासून वाचण्याची पूर्ण काळजी घ्या, आणि मरेपर्यंत अल्लाहचे आज्ञापालन करा.
(२) लोकहो, आपल्या पालनकत्र्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याचे जोडपे बनविले आणि या एकाच जोडप्यापासून समस्त  पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर  राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.
(३) हे ईमानधारकांनो, अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा आणि नेहमी सत्य व रास्त बोला. अल्लाह तुमचे आचरण सुधारील आणि तुमच्या अपराधांना क्षमा करील. ज्याने अल्लाह  आणि त्याचा पैगंबर (मुहम्मद स.) यांच्या आज्ञा पाळल्या त्याने मोठे यश प्राप्त केले. (हदीस : तिर्मिजी)

महर (स्त्रीधन)
माननीय उकबा बिन आमिर यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अटींपैकी ती अट पूर्ण करण्यालायक आहे ज्याद्वारे तुम्ही स्त्रियांच्या अब्रूचे मालक बनला  आहात.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय उमर बिन खत्ताब (रजि.) यांनी सांगितले, ‘‘हे लोकहो! स्त्रियांना मोठमोठा महर बांधू नका, कारण जगातील मोठेपणा व प्रतिष्ठेची वस्तू असते आणि अल्लाहच्या दृष्टीने  सदाचाराचे कार्य घडते तेव्हा त्याचे श्रेय सर्वांत अधिक पैगंबर मुहम्मद (स.) यांना जाते. परंतु पैगंबर (स.) यांनी १२ औकिया (तत्कालीन चलन) पेक्षा अधिक (महर ठरवून किंवा अदा  करून) कोणा स्त्रीशी विवाह केला असेल, अथवा मुलींपैकी एखाद्या मुलीचा विवाह केला असेल, हे मला आठवत नाही.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
माननीय उमर (रजि.) ज्या गोष्टीची मनाई करीत आहेत ते अशी आहे की लोक घराण्याच्या प्रतिष्ठेच्या गर्वामुळे मोठमोठा महर निश्चित करतात, तो अदा करण्याची त्यांची ऐपत नसते आणि मग तो त्याच्या गळ्यातील फास बनतो. म्हणूनच माननीय उमर (रजि.) मुस्लिम घराणी व वस्त्यांना अशाप्रकारच्या फुशारकीपासून मनाई करतात आणि साधेपणाची   शिकवण देतात आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनाचा आदर्श नमुना सादर करतात. एक ‘औकिया’ म्हणजे साडे दहा तोळे चांदी. स्वत: पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सामान्यत:  ज्या स्त्रीशी विवाह केला अथवा आपल्या मुलींचा विवाह करविला त्यापेक्षा अधिक महर (स्त्रीधन) पैगंबरांनी कधी निश्चित केला नाही. हे मुस्लिम जनसमुदायासाठी एक बोलके उदाहरण   आहे. यापेक्षा खूपच जास्त असलेला उम्मे हबीबा यांचा महर हब्शचे सम्राट नज्जाशीने निश्चित केलेला होता आणि त्यानेच तो अदा केला होता, या विवाहाचा गाजावाजा करण्यात आला नव्हता.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget