Halloween Costume ideas 2015

शारीरिक परिवर्तनातून 30 अब्ज डॉलर्सची उलाढाल

शारीरिक परिवर्तनाच्या कामात एक खूप मोठा उद्योग कार्यरत आहे. या उद्योगात वार्षिक 30 अब्ज डॉलर्सची उलाढाल होते आणि त्यात दोन लाख सर्जन काम करीत आहेत. फक्त अमेरिकेमध्ये 13 अब्ज डॉलर्सचा नफा या उद्योगातून मिळविला जातो.
    असंख्य जाहिराती, वर्तमानपत्रे, महिला नियतकालिके यामध्ये ’विशेषज्ञ’ सौंदर्य वाढविण्यासाठी मोफत सल्ला देण्याचे सदर चालवितात. स्त्रियांना आणि मुलांना समजावून सांगतात की त्या त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग बदलू शकतात आणि आपल्या स्वप्नातले शरीर धारण करून त्याचे मालक बनू शकतात. एक विशेष प्रकारे गुंतागुंतीची सर्जरी अब्डॉमिनोप्लास्टी करून पोटाचा आकार बदलला जातो; ब्लेफेरोप्लास्टी सर्जरी करून पापण्यांना अतिरिक्त प्लॅस्टिकचा उपयोग करून नवीन रूप दिले जाते. स्तनांना ब्रेस्ट इम्प्लांट मॅस्टोपेक्सी आणि नितंबाची बट्ट इम्प्लांट मध्ये सिलिकॉन भरून त्यांचा आकार वाढविला किंवा कमी केला जातो. नाक, कान आणि चेहरा यांची रचना अनुक्रमे रिनोप्लास्टी, आक्टोप्लास्टी, रायटीडेक्टॉमी करून बदलली जाते. शस्त्रक्रिया करून आतडी आणि जठर यांचा आकार कमी (बॅरिस्टीक सर्जरी) केला जातो, जेणेकरून खाणे कमी व्हावे आणि वजन कमी व्हावे. धोकादायक लेसर किरणांच्या साह्याने त्वचेचा पदर बदलला जातो. ओठ, गाल, हनुवटी आणि कपाळसुद्धा बदलता येते.
    सार्‍या पश्‍चिमी जगात, विशेषकरून उत्तर अमेरिकेत शरीराच्या अत्यंत नाजूक अवयवांची शस्त्रक्रिया सुद्धा फार सर्वसामान्य झाली आहे. असंख्य टी.व्ही. सीरियल आणि महिला नियतकालिके आकर्षक लिंगाची प्रेरणा देतात आणि महिला आणि मुली आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची वेदनादायक चिरफाड करण्यासाठी आनंदाने समोर येतात. अमेरिकेच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी या सर्जरीविरूद्ध इशारा दिला आहे. परंतु, असे असूनसुद्धा फक्त अमेरिकेत दरवर्षी हजारे स्त्रिया या प्रकारच्या शस्त्रक्रिया करू घेतात. भारतातसुद्धा ही प्रवृत्ती वेगाने वाढत आहे.
    या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आरोग्य बिघडविल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. कॉस्मेटिक सर्जरी आणि बॉडी मॉडिफिकेशन (शारीरिक परिवर्तन) च्या या स्पर्धेत डॉक्टर स्वतः त्रासलेले आहेत.
    ब्रिटिश प्लास्टिक सर्जनांची ’बापस’ने एका आपल्या अहवालात, चुकीचे मार्गदर्शन करणार्‍या जाहिरातींबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या संघटनेचे म्हणणे आहे की, महिला नियतकालिकांमध्ये मॉडेलच्या सहाय्याने असे शारीरिक परिवर्तन खास करून स्तनाच्या रचनेत आणि आकारात परिवर्तन दाखविले जातात, जे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने अशक्य आहे. भोजनाच्या छोट्याश्या वेळेत चेहर्‍याच्या रचनेत परिवर्तन, त्रासाशिवाय कमरेच्या आकारात बदल अशा जाहिराती आणि खोट्या कथांद्वारा तरूण मुलींना त्या धोकादायक शस्त्रक्रियेच्या निर्णयासाठी तयार केलेे जाते, तेव्हा या सर्व शस्त्रक्रिया फारच गंभीर शस्त्रक्रिया आहेत आणि केवळ अनिवार्य झाल्या तर या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
    भांडवलशाही साम्राज्याने लक्षावधी स्त्रिया आणि कमी वयाच्या मुलींच्या शरीरास आणि त्यांच्या आरोग्यास आपल्या नफ्याचे साधन बनविले आहे. इ.सन. 2002 मध्ये ए.बी.सी. चॅनेलने ”एक्सट्रिम मेकओव्हर’ नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये सामान्य स्त्रिया आपल्या शरीरात परिवर्तन करण्याच्या इच्छेने समोर येतात. त्यांच्यावर दीर्घ शस्त्रक्रिया केल्या जातात. शस्त्रक्रियेनंतर त्या आणि त्यांचे नातेवाईक आपापले अनुभव सांगतात. शस्त्रक्रियेद्वारा त्यांच्या शरीराच्या प्रत्येक अवयवात बदल केले जातात. अशा तर्‍हेने शारीरिक यंत्राच्या प्रत्येक अवयवांचे इच्छित डिझाइन तयार होऊ शकते. एक कुरूप स्त्री डेल्स विलियम्स हिने चॅनेलविरूद्ध दावा दाखल केला की चॅनेलच्या पथभ्रष्ट करणार्‍या पद्धतीमुळे तिच्या बहिणीचा प्राण घेतला आहे. हा शो बघितल्यानंतर आपले डोळे, दात आणि स्तनामध्ये परिवर्तन केल्याबद्दल वेल्स लज्जित झाली. चॅनेलच्या डॉक्टरांनी तिला भरोसा दिला की तिचे परिवर्तन सुंदर बनविले जाईल. नंतर चॅनलने आपल्या कार्यक्रमानुसार वेल्सच्या बहिणीकडून, तिच्या कुरूपतेसंबंधी तिच्या नातेवाईकांकडून निवेदन करवून घेतले. (ऑपरेशननंतर त्याच प्रकारच्या सौंदर्यासंबंधी निवेदन करवून घेतले जाते.) आणि जेव्हा चॅनेलचे डॉक्टर तिला सुंदर बनवू शकले नाहीत तेव्हा बिचारी बहीण आपल्या कटु टीकेसह दुःखी होऊन तिने आत्महत्या केली.
    इ.स. 2006 मध्ये केवळ अमेरिकेतच एक कोटी 10 लाख (1.1. कोटी) सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. म्हणजे अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 3.5 टक्के लोकांनी फक्त एका वर्षात या शस्त्रक्रिया करवून घेतल्या आहेत. या शस्त्रक्रिया करवून घेणार्‍यांमध्ये 90 टक्के स्त्रियाच असतात. आपल्या देशातसुद्धा जवळजवळ 500 कोटी रूपयांचा हा व्यवसाय आहे.
    ज्या स्त्रिया सौंदर्य आणि फॅशनसाठी सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियेसारख्या अत्यंत घातक गोष्टीसाठी तयार होत नाहीत त्यांच्यापासून फायदा करून घेण्यासाठी भांडवलशाही साम्राज्याजवळ दूसरे सुलभ प्रकारसुद्धा अस्तित्वात आहेत.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget