(७६) त्यांना सांगा, काय तुम्ही अल्लाहला सोडून त्याची उपासना करता जो तुमच्या नुकसानीचाही अधिकार बाळगत नाही की फायद्याचाही नाही? वास्तविक पाहता सर्वांचे ऐकणारा व सर्वकाही जाणणारा तर अल्लाहच आहे.
(७७) सांगा, ‘‘हे ग्रंथधारकांनो, आपल्या धर्मामध्ये नाहक अतिरेक करू नका आणि त्या लोकांच्या कल्पनांचे अनुसरण करू नका, जे तुमच्या अगोदर स्वत: पथभ्रष्ट झाले व बहुतेकांना ज्यांनी पथभ्रष्ट केले आणि सन्मार्गापासून भरकटले.’’१०१
(७७) सांगा, ‘‘हे ग्रंथधारकांनो, आपल्या धर्मामध्ये नाहक अतिरेक करू नका आणि त्या लोकांच्या कल्पनांचे अनुसरण करू नका, जे तुमच्या अगोदर स्वत: पथभ्रष्ट झाले व बहुतेकांना ज्यांनी पथभ्रष्ट केले आणि सन्मार्गापासून भरकटले.’’१०१
१०१) संकेत आहे त्या पथभ्रष्ट लोकसमूहांकडे ज्याच्याकडून खिश्चनांनी चुकीच्या धारणा आणि असत्य पद्धती स्वीकारल्या, विशेषत: युनानच्या तत्त्वज्ञानीकडून. इसा मसीह (अ.) यांचे प्रारंभीचे अनुयायी बहुतांशी त्या सत्यतेच्या अनुकूल होते ज्याचे अवलोकन त्यांनी आपल्या स्वत:च्या डोळयांनी केले होते आणि ज्याची शिकवण त्यांना त्यांच्या मार्गदर्शकाने व उपदेशकाने दिली होती. नंतरच्या खिस्ती समुदायाने एकीकडे इसा मसीह (अ.) यांच्या श्रद्धा आणि प्रतिष्ठेत अतिशयोक्ती करून आणि दुसरीकडे शेजारच्या लोकसमुदायांच्या अंधविश्वास आणि तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन आपल्या धारणेचे अतिशयोक्तीपूर्ण दार्शनिक (तत्त्वज्ञानी) अर्थ काढले आणि एक अगदी नवा धर्म तयार करून टाकला. या नव्या धर्माचा आणि इसा मसीह (अ.) यांच्या मौलिक शिकवणींचा लांबचा संबंधसुद्धा राहिला नाही. याविषयी स्वत: एक खिस्ती धार्मिक विद्वान (रेव्हरंड चार्लस् एंडरसन स्काट) यांचे कथन अगदी स्पष्ट आणि योग्य आहे. इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या चौदाव्या आवृत्ती ``येशू मसीह'' (Jesus Christ) विषयी त्यांनी दीर्घ लेख लिहिला आहे. ``पहिल्या तीन इंजिल (बायबल) मत्ती, मरकुस व लुका यात कोणतीच अशी बाब सापडत नाही ज्यावरून हे स्पष्ट व्हावे की या इंजिलाना लिहिणारे येशूला मानवाव्यतिरिक्त आणखी काही समजत होते. स्वत: मत्तीमध्ये याचा उल्लेख बढईचा पुत्र याने करतो आणि त्या जागेचा उल्लेख करतो जिथे पॅथरसने त्याला `मसीह' मान्य केल्यानंतर त्याची एके ठिकाणी निंदा केली. (मत्ती १६:२२) लुकामध्ये सापडते की सुळावरच्या घटनेनंतर येशूचे दोन शिष्य इम्माऊसकडे जातांना त्याचा उल्लेख याप्रकारे करतात, ``तो अल्लाह आणि समस्त समुदायाजवळ कर्म आणि कथनात सामथ्र्यवान पैगंबर होता.'' (लुका २४ : १९) पुढे तो लिहितो, येशू स्वत:ला एक पैगंबर म्हणत असे हे इंजिलातील अनेक लेखांतून स्पष्ट होते. उदा. ``मला आज, उद्या आणि परवा आपल्या मार्गावर चालणे आवश्यक आहे कारण हे संभव नाही की पैगंबर जेरूसलेम बाहेर ठार केला जावा.'' (लुका १३:२३) येशू आपला उल्लेख मुख्यत्वे ``आदमची संतती'' असा करत असे. परंतु स्वत:ला येशूने ``अल्लाहची संतती'' असे म्हटले नाही. पुढे लिहिले आहे, पिन्तेकुस्त पर्वच्या वेळी पॅथरसचे हे शब्द ``एक मनुष्य जो खुदाकडून आला आहे.'' येशूला या स्थितीत प्रदर्शित करतात ज्यात त्याला त्याचे सहकारी पाहात होते आणि जाणत होते. इंजिलांद्वारा माहीत होते की येशू बालपणापासून तरूणावस्थेपर्यंत स्वाभाविकपणे शारीरिक आणि मानसिक विकासाच्या टप्प्यातून वाढला गेला होता. त्याने कधीही सर्वज्ञ होण्याचा दावा केला नाहीच तर त्याच्याशी इन्कार केला आहे. वास्तवात येशूच्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित असण्याचा आणि सर्वज्ञ होण्याचा दावा जर केला तर हा त्या पूर्ण कल्पनेविरुद्ध ठरेल जी आम्हाला इंजिलमधून सापडते. मसीहला सर्वशक्तिमानसुद्धा समजण्याची शक्यता इंजिलमध्ये सापडत नाही. तेथे याचे संकेत मिळत नाही की तो अल्लाहशी निरपेक्ष होऊन स्वतंत्रपणे काम करीत होता. याविरुद्ध येशू नेहमी प्रार्थना करीत असे आणि असा शब्दप्रयोग नेहमी करीत असे की, ``हे अरिष्ट प्रार्थनेशिवाय आणखी कोणत्याच मार्गाने टळू शकत नाही.'' हे याचे स्पष्ट संकेत आहे की येशू मसीहचे अस्तित्व अल्लाहवरच आश्रित होते.'' यानंतर हा लेखक पुढे लिहितो, ``तो सेंट पॉल होता ज्याने जाहीर केले की `उचलून घेणे' या घटनेच्या वेळी या उचलण्याच्या प्रक्रियेच्या माध्यमाने येशूला संपूर्ण अधिकारांसोबत `इब्नुल्लाह' (अल्लाहचा पुत्र) च्या पदावर जाहीररित्या आसनस्त करण्यात आले. याचे निर्णय आता घेतले जाऊ शकत नाही की काय तो प्रारंभाचा खिस्ती समुदाय होता किंवा सेंट पॉल ज्याने मसीह इसा (अ.) यांना प्रभुची उपाधी धार्मिक अर्थाने दिली. शक्य आहे हे कृत्य पूर्वउल्लेखित समुदायाचे असू शकेल. परंतु यात संशय नाही की सेंट पॉलने प्रभुच्या उपाधिला पूर्णत्व दिले. त्याने नंतर प्रभु यहुवह (अल्लाह) चे सर्व गुणविशेष ``प्रभु येशू मसीह' पैगंबर इसा (अ.) यांना लावले इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका एका दुसऱ्या लेखात (Christianity) मध्ये रेव्हरंड जॉर्ज विल्यियम नॉक्स मसीही चर्चच्या मौलिक धारणेविषयी लिहितो, ``त्रि एक परमेश्वरत्व'' (त्रिमूर्ती) चा वैचारिक दावा युनानी आहे आणि यहुदी शिकवणींचा त्यात समावेश केला आहे. अशाप्रकारे हे एक विचित्र मिश्रण आहे. धार्मिक विचार तर बायबलचे आणि साकार झाले एका अनोळखी तत्त्वज्ञानात! ``बाप, बेटा आणि पवित्र आत्मा यहुदींच्या तत्त्वज्ञानांची निर्मिती आहे.'' याचविषयी इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा आणखी एक लेख `चर्चचा इतिहास' (Church Histroy)सुद्धा वाखणण्या सारखा आहे, ``तिसऱ्या शतकात अंताच्या अगोदर मसीहला तर सार्वजनिकरित्या `वाणी'चे दैहिक प्रकटीकरण मान्य केले गेले तरी अनेक खिश्चन असे होते जे येशू मसीहला प्रभु मानण्यास तयार नव्हते. चौथ्या शतकात या समस्येवर घोर विवाद झाला ज्यात चर्चचा पाया ढासळू लागला. शेवटी इ.स. ३२५ मध्ये नीकियाच्या कौन्सिलने मसीहच्या प्रभु होण्याला विधिवत सरकारीरित्या मूळ मसीह धारणा म्हणून मान्यता दिली. मुलाच्या ईश्वर होण्याबरोबर आत्म्याची खुदाई म्हणजे ईश्वर होणे मान्य केले गेले. या श्रद्धेला बातिस्मा घेते वेळी उच्चर करण्यास अनिवार्य ठरविले. धार्मिक प्रतीकांमध्ये बापबेटे या दोघांबरोबर पवित्र आत्म्यालासुद्धा स्थान देण्यात आले. अशा प्रकारे ट्रिनिटीमध्ये इसा मसीहविषयी जी धारणा प्रस्थापित केली; त्याचा परिणाम हा झाला की त्रिदेवत्व (Trinity) ची
धारणा मूळ मसीही धर्माचे (खिस्ती धर्म) एक अभिन्न अंग बनली.
खिस्ती धर्मशास्त्रीच्या या वक्तव्यांनी हे अगदी स्पष्ट होते की सुरवातीला ज्यामुळे खिस्ती लोक भटकले ती श्रद्धा आणि प्रेम यांची अतिशयोक्ती होती. याच अतिशयोक्तीच्या आधारावर येशू मसीह (इसा (अ.)) साठी प्रभु आणि अल्लाहपुत्रसारख्या शब्दांचा प्रयोग करण्यात आला. ईशगुण या त्रिदेवांशी जोडण्यात आले आणि प्रायश्चित्तची धारणा प्रबळ करण्यात आली. पैगंबर इसा (अ.) यांनी मात्र अशाप्रकारची शिकवण कधीच दिली नव्हती. तसेच त्यांच्या शिकवणीमध्ये या सर्व बाबींना अजिबात वाव नव्हता. नंतर जेव्हा खिश्चनांना तत्त्वज्ञानाने भुरळ पाडली तेव्हा आपली पूर्वीची चूक दुरुस्त करण्याऐवजी त्यांनी आपल्या धर्मगुरुंच्या चुकीच्या संकल्पनांना आणि उणिवांना झाकण्यासाठी तर्क देण्यास सुरवात केली. अशाप्रकारे इसा (अ.) यांच्या मौलिक शिकवणीकडे दुर्लक्ष करून फक्त तत्त्वज्ञानाच्या आणि तर्काच्या आधारावर व धारणांवर वैचरिक पूल बांधत गेले हीच ती मार्गभ्रष्टता आहे ज्याविषयी कुरआनने या आयतींमध्ये खिस्ती लोकांना सावध केले आहे.
Post a Comment