Halloween Costume ideas 2015

अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(७८-७९) बनीइस्राईलपैकी ज्या लोकांनी कुफ्र (अर्धम)चा मार्ग अवलंबिला ते दाऊद (अ.) आणि मरयमपुत्र येशू यांच्या वाणीद्वारे धिक्कारले गेले कारण ते दुराचारी झाले होते व मर्यादा- भंग करू लागले होते. त्यांनी एकमेकाला अपकृत्यापासून परावृत्त करण्याचे सोडून दिले होते.१०२ वाईट आचरण होते त्यांचे, जे त्यांनी अंगीकारले.
(८०) आज तुम्ही त्यांच्यात पुष्कळसे असे लोक पाहता जे (श्रद्धावंतांच्या विरोधात) अश्रद्धावंतांचे समर्थन व त्यांच्याशी मैत्री करतात. निश्चितपणे अत्यंत वाईट शेवट आहे त्यांचा, ज्याची  तयारी त्यांनी स्वत: आपल्यासाठी केली आहे. अल्लाह त्यांच्यावर क्रोधित झाला आहे आणि ते चिरस्थायी यातना भोगणारे होत.
(८१) जर खरोखर हे लोक अल्लाह व पैगंबर आणि त्या गोष्टीला मानणारे असते, जी पैगंबरांवर अवतरली होती तर कस्रfप (श्रद्धावंतांविरूद्ध) अधर्मींना त्यांनी आपले मित्र बनविले  नसते.१०३ पण त्यांच्यापैकी तर बहुतेक लोक अल्लाहच्या आज्ञाधारकतेच्या बाहेर निघाले आहेत.
(८२) तुम्हाला श्रद्धावंतांविरूद्ध शत्रुत्वात जास्त कठोर यहुदी व अनेकेश्वरवादी आढळतील आणि श्रद्धावंतांच्या मित्रत्वांत ते लोक अधिक जवळ असल्याचे आढळतील ज्यांनी सांगितले होते  की आम्ही खिश्चन आहोत, हे अशा कारणास्तव की त्यांच्यात उपासना-मग्न विद्वान व विरक्त साधू आढळतात आणि त्यांच्यात अहंकार नाही.
(८३) जेव्हा ते ही वाणी ऐकतात जी पैगंबरावर अवतरली आहे तेव्हा तुम्ही पाहता की सत्याची ओळख पटल्यामुळे त्यांचे डोळे अश्रूंनी भिजतात. ते अनायासे उद्गारतात, ‘‘हे पालनकर्त्या, 
आम्ही श्रद्धा ठेवली, आमचे नाव ग्वाही देणाऱ्यांमध्ये लिही.’’
(८४) आणि ते म्हणतात, ‘‘का म्हणून आम्ही अल्लाहवर श्रद्धा ठेवू नये आणि जे सत्य आमच्यापर्यंत आलेले आहे ते का   मान्य करू नये, जेव्हा आम्ही अशी इच्छा बाळगतो की
आमच्या पालनकर्त्याने आम्हाला सदाचारी लोकांत समाविष्ट करावे?’’
(८५) त्यांच्या या कथनामुळे अल्लाहने त्यांना असा स्वर्ग प्रदान केला ज्याच्या खालून कालवे वाहतात व ते तेथेच सदैव राहतील. हा मोबदला आहे उत्तम आचरण करणाऱ्यां लोकांकरिता,
(८६) ज्यांनी आमच्या संकेतवचनांना मान्य करण्याला नकार दिला व त्यांना खोटे लेखले, ते नरकास पात्र आहेत.
(८७) हे श्रद्धावंतांनो, ज्या शुद्ध वस्तू अल्लाहने तुमच्यासाठी वैध (धर्मसंमत) केलेल्या आहेत, त्या निषिद्ध ठरवू नका१०४ ....


१०२) प्रत्येक राष्ट्र आणि लोकसमुदायाचा बिघाड काही मोजक्या लोकांनी सुरु केलेला असतो. राष्ट्राचा सामूहिक आत्मा जिवंत असेल तर जनमत आणि जनसंमती या बिघडलेल्या  माणसांना डोके वर काढू देत नाही. ते दबून राहतात कारण जनाधार त्यांच्या बाजूने नसतो. परिणामत: राष्ट्र जीवनात सामूहिकरित्या बिघाड होत नाही. परंतु राष्ट्र या माणसांकडे दुर्लक्ष  करू लागते तेव्हा चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या त्या लोकांची िंनदा करण्याऐवजी, त्यांना दुराचारांपासून रोखण्याऐवजी समाजजीवनात बिघाड निर्माण करण्यासाठी मोकळे सोडून दिले  जाते.अशा स्थितीत हळूहळू तो बिघाड जो काही माणसांपुरता मर्यादित होता तो सर्व समाजात पैâलावतो. हेच बनीइस्राईलींच्या बिघाडाचे व विनाशाचे मूळ कारण होते. आदरणीय पैगंबर  दाऊद आणि इसा (अ.) यांच्या तोंडून जो धिक्कार बनीइस्राईलवर केला गेला त्यासाठी पाहा बायबलचे पुस्तक भजन संहिता, अध्याय १० व ५०, मत्ती, अध्याय २३ :
१०३) म्हणजे जे लोक अल्लाह, पैगंबर आणि ईशग्रंथाला मानणारे आहेत त्यांना स्वभावत: अनेकेश्वरवादींच्या मुकाबल्यात त्या लोकांशी अधिक सहानुभूती असते जे धर्माच्या बाबतीत  मतभेद तर ठेवतात परंतु अल्लाह, पैगंबर व ईशग्रंथाला मानणारे असतात. परंतु हे यहुदी विचित्र प्रकारचे ग्रंथधारक आहेत जे एकेश्वरत्व आणि अनेकेश्वरत्वाच्या लढाईत खुल्लमखुल्ला  अनेकेश्वरवादींच्या बरोबरीने आहेत. पैगंबरांना मानणे अथवा न मानण्याच्या लढाईत ते स्पष्टपणे विद्रोही लोकांच्या बाजूने राहातात. तरीसुद्धा ते विना संकोच आणि विना लज्जा दावा ठोकतात की आम्ही अल्लाह, पैगंबर आणि ईशग्रंथाला मानणारे आहोत.
१०४) या आयतीत दोन गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. पहिली म्हणजे एखाद्या गोष्टीला हराम व हलाल ठरविणारे स्वत: बनू नका. हलाल (वैध) तेच आहे जे अल्लाहने हलाल  केले आहे आणि हराम (अवैध) तेच आहे जे अल्लाहने अवैध ठरविले आहे. आपल्या अधिकारात एखाद्या हलाल गोष्टीला हराम ठरवू नका, अन्यथा अल्लाहचे आदेशपालन करणारे न  होता मनाच्या आदेशांचे पालन करणारे ठराल. दुसरी गोष्ट म्हणजे खिस्ती पादरी, िंहदू योगी, बौद्ध भिक्षु आणि प्राच्यविद्संतासारखे संन्यास आणि रूपास्वादनापासून विरक्तीची वृत्ति  स्वीकारू नका. धार्मिक प्रवृत्तीच्या चांगल्या स्वभावी लोकांत ही भावना नेहमी आढळते की मन आणि शरीराच्या हक्कांची पूर्तता करण्यास हे लोक आध्यात्मिक विकासात अडथळा  समजतात. त्यांच्या मते स्वत:ला कष्ट देणे, आपल्या मनाला सुखस्वादापासून वंचित ठेवणे तसेच जगाच्या जीवनसामग्रीपासून दूर राहाणे हे पुण्यकर्म आहे. अल्लाहचे सान्निध्य याशिवाय प्राप्त् केले जाऊ शकत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या साथीदारांपैकी काही लोक असे होते ज्यांच्यात ही मनोवृत्ती होती. एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांना माहीत झाले  की त्यांच्या काही साथीदारांनी प्रतिज्ञा केली की दररोज रोजा ठेवू, रात्री झोपणार नाही व रात्रभर भक्ती करू, मांस व तूप खाणार नाही आणि पत्नींजवळ जाणार नाही. यावर पैगंबर  मुहम्मद (स.) यांनी एक व्याख्यान दिले, ``मला अशा गोष्टींचा आदेश दिला गेला नाही. तुमच्या शरीराचा तुमच्यावर हक्क आहे. रोजाही ठेवा आणि खा, प्या. रात्री इबादत करा आणि  झोपसुद्धा घ्या. मला पाहा मी झोपतो व इबादतसुद्धा करतो. मी रोजाही ठेवतो आणि ठेवतसुद्धा नाही. मी मटन खातो व तूपसुद्धा खातो. म्हणून जो माझ्या पद्धतीला पसंत करीत नाही  तो माझ्याशी नाही'' पुढे सांगितले, ``या लोकांना काय झाले आहे की त्यांनी स्त्रियांना आणि चांगल्या खाण्याला, झोपेला, सुगंधाला आणि ऐहिक सुखांना आपल्यासाठी हराम (अवैध)  ठरविले आहे? मी तुम्हाला तर ही शिकवण दिलेली नाही की तुम्ही सन्यासी आणि पादरी बनावेत. माझ्या धर्मात (जीवनपद्धतीत) स्त्रियांपासून, मांस खाण्यापासून दूर राहाण्यास  सांगितले गेले नाही आणि संन्यास व ब्रह्मचर्यसुद्धा नाही. इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी माझ्या येथे रोजा (उपवास) आहे. संन्यासी वृत्तीचे सर्व लाभ येथे जिहादमध्ये प्राप्त् होतात.  अल्लाहची भक्ती करा, दुसऱ्याला त्याचा भागीदार बनवू नका. हज आणि उमरा करा. नमाज कायम करा व जकात द्या आणि रमजानचे रोजे ठेवा तुमच्या पूर्वीच्या लोकांचा विनाश याचमुळे झाला की त्यांनी इंद्रियदमन वर्तन अवलंबिले होते. त्यांनी स्वत:वर सक्ती केली तेव्हा अल्लाहनेही त्यांच्यावर सक्ती केली. हे त्यांचेच अवषेश आहेत जे मठात आणि  खानकाहात आढळतात.'' याचविषयी काही कथनांद्वारा माहीत होते की एका सहाबी (साथीदार) विषयी ऐकले होते की बऱ्याच कालावधीपर्यंत ते आपल्या पत्नीजवळ गेले नव्हते आणि  रात्रंदिवस भक्तीत मग्न आहेत. तेव्हा त्यांना बोलावून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला की आता आपल्या पत्नीकडे जा. त्यांनी सांगितले मी रोजा ठेवला आहे. पैगंबर मुहम्मद  (स.) यांनी यावर आदेश दिला की रोजा सोडा आणि जा. माननीय उमर (रजि.) यांच्या काळात एक स्त्रीने तक्रार केली की माझे पती दिवसभर रोजा ठेवतात, रात्र भर भक्ती करतात  आणि माझ्याशी संबंध ठेवत नाही. माननीय उमर (रजि.) यांनी प्रसिद्ध काझी काब बिन सौहेल अज़दी यांना या दाव्यासाठी नियुक्त केले. त्यांनी निर्णय दिला की या माणसाला तीन  रात्रीसाठी भक्ती करण्याचा अधिकार आहे. परंतु चौथ्या रात्री मात्र अनिवार्यपणे त्याच्या पत्नीचा हक्क आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget