Halloween Costume ideas 2015

भांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया

वेश्यावृत्ती व्यवसायाची पद्धत नेहमीच चालत आलेली आहे़ परंतु, मानवी इतिहासाला या व्यवसायाची नेहमीच लाज वाटते़ या व्यवसायाला समाजातील सर्वांची स्वीकृती कधीच लाभली नाही़ परंतु, या पुरोगामी जमान्याचे वैशिष्ट्ये हे आहे की यामध्ये कोणताही व्यापार किंवा व्यवसाय छुप्या पद्धतीने केला जात नाही़ या कायदेशीररित्या लायसेंसधारक कंपन्या आहेत, ज्या आपल्या देशात टॅक्स देतात़ त्या स्टॉक मार्केटमध्ये रजिस्टर्ड आहेत़ आपले शेअर्स विकतात आणि दर तिमाहीला आपल्या झालेल्या फायद्याच्या हिशोब प्रकाशित करतात़
    आपापल्या देशात त्यांचा व्यवसाय रितसर कायदेशीर व्यवसाय आहे़ त्यांना तेथील समाजात पूर्ण प्रतिष्ठा आणि लोकप्रियता लाभली आहे़ ज्या देशात या व्यवसायाला परवानगी दिली जात नाही, साम्राज्यवाद त्यांना उद्धट, मूर्ख, असभ्य, मागासलेला, मध्ययुगीन अशी शिवी देतो़ स्त्रियांचा अपमान आणि शोषणाचा यापेक्षा निकृष्ट स्वरूपाचा परिचय मानवी इतिहासाला आहे काय? जगभराच्या वर्तमानपत्रात गेल्या काही वर्षांपासून कॅनडाच्या एका न्यूज चॅनेलची मोठी चर्चा आहे़ त्या न्यूज चॅनलचे न्यूज रीडर (बातमी देणारे) आणि रिपोर्टर (वार्ताहर) हे दोन्ही अर्धनग्न अवस्थेत बातम्या वाचतात़ या गोष्टी यशस्वी व्यापाराच्या स्वरूपात केस स्टडीच्या म्हणून व्यापार समीक्षा वर्तमानपत्रामध्ये सादर केल्या जात आहेत, कारण या कंपनीने प्रगती फार वेगात केली आहे़  हा यशस्वी व्यापाराचा भांडवलवादी समज! बुरख्याची पद्धत अशा यशस्वी व्यापाराचे मूळ छाटून टाकते म्हणून साम्राज्यवादाचे बुरख्याला जन्मापासून शत्रुत्व आहे़ तो आपल्या सर्व शक्तींना एकत्र करून जगाला समजावून सांगत आहे की बुरखा स्त्रियांची गुलामी आहे आणि बुरखा एवढे मोठे पाप आणि नुकसानकारक गोष्ट आहे की ही पद्धत बंद करण्यासाठी नागरिक हक्कांचा बळी देण्याचा व्यवहारही वाईट समजला जात नाही. स्त्रियांचे स्वातंत्र्य हे आहे की त्यांना डोक्यापासून पायापर्यंत विवस्त्र करून विकले जावे ! मागील दशकामध्ये सार्‍या जगात वेश्यावृत्ती, वेश्याव्यवसाय आणि देहव्यापारास कायदेशीर मान्यता दिली जावी, अशी एक चळवळ सुरू झाली होती़ म्हणून या व्यवसायास वेश्यावृत्ती उद्योग असे नाव देण्यात आले़ दलाल देहविक्री व्यापारी बनले़ वेश्यालये कंपन्यांच्या स्वरूपात रजिस्टर्ड होऊ लागली आणि हे उघड आहे की लाचार स्त्रिया परिस्थिती किंवा जुलूमाने गांजल्या गेलेल्या होत्या, त्या नाईलाजाने विकाऊ वस्तू म्हणजेच भोग्य वस्तू बनल्या़ म्हणून न्यूझिलँडमध्ये कायदेशीर वैधता प्राप्त झाल्यानंतर हा उद्योग वार्षिक 25 टक्क्याने प्रगती करू लागला आणि नेदरलँडच्या पूर्ण अर्थव्यवस्थेच्या 5 टक्के हा व्यवसाय पसरला आहे़ न्यूझिलँड आणि ऑस्ट्रेलिया (विक्टोरिया प्रांत) मध्येसुद्धा यासारखीच परिस्थिती आहे़ काही देशात स्त्रियांच्या काही लोकसंख्येच्या 1.5 टक्के व्यवसाय देहविक्री व्यापारात बदलला आहे आणि सहा प्रांतात तर एकूण घरगुती उत्पादनाच्या (जीडीपी) 14 टक्के या व्यवसायातून प्राप्त होतो़ या देशामध्ये त्या कंपन्यांच्या अनेक संघटना आहेत़ त्यांची कॉर्पोरेट कार्यालये आहेत़ व्यापारी-पत्रिका आणि वर्तमानपत्रातील व्यापार पृष्ठावर त्यांचा फायदा - तोटा यांचा हिशोब प्रकाशित होतो़
 नेदरलँडमध्ये वेश्यालय असोसिएशन म्हणजेच या कायदेशीरदृष्ट्या तशाच संस्था जशा बहुतेक देशांमध्ये ‘चेम्बर्स ऑफ कॉमर्स’ असतात़ ही संस्था पूर्ण निर्लज्जपणाने वेबसाईट बनवून काम करीत आहे़ न्यूझिलँडमध्ये, तेथील सरकारी आकडेवारीनुसार 383 देहविक्री व्यापार कंपन्या आणि 5032 सेक्स वर्कर्समधील निम्म्यापेक्षा अधिक ‘सेक्स’ बिझनेसचे कायदेशीर कर्मचारी आहेत़ न्यूझिलँडमध्ये या व्यापाराचे रजिस्ट्रेशन, ऑडिट, इन्स्पेक्शन इत्यादीची कायदेशीर सरकारी व्यवस्था अस्तित्वात आहे़ जणूकाही स्त्रियांच्या शरीराचा व्यापार तितका शिष्टाचारसंमत, वैध आणि मान्यताप्राप्त आहे़ जितका पार्ले बिस्कीट, टेक्स्ट किंवा लुईस फिलिपचा शर्टसचा व्यापार, चामड्यापासून बनविलेल्या फरकोट नापसंद होऊ शकतात, कारण त्यामुळे जनावरावर अत्याचार होतो तथापि जित्याजागत्या महिलांवर होणार्‍या जुलूमांची कोणी विचारपूस करीत नाही़
या मोठ्या उद्योगाव्यतिरिक्त आजच्या जगात अशा लोकांचीही काही कमतरता नाही, जे पैशासाठी आपल्या पत्नींना अनोळखी पुरूषाच्या शयनकक्षामध्ये पाठवितात़ आपल्या देशामध्ये हा व्यवसाय केवळ अशिक्षित गरीब लोकांत नाही तर उच्चशिक्षण घेतलेल्या मोठ्या कंपन्यांत काम करणारे श्रीमंत आणि शहरातील मोठ्या हुद्यावर काम करणार्‍यांमध्येही सर्वसामान्य झाला आहे़    

(क्रमशः)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget