Halloween Costume ideas 2015

अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(९०) ...आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.१०९ (९१) शैतानाची तर अशीच इच्छा आहे की दारू व जुगाराद्वारे तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचे  स्मरण व नमाजपासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टीपासून अलिप्त राहाल? (९२) अल्लाह व त्याच्या पैगंबराचे म्हणणे मान्य करा आणि अलिप्त राहा, परंतु जर तुम्ही अवज्ञा  केली तर हे समजून असा की आमच्या पैगंबरावर स्पष्टपणे आदेश पोहचविण्याची फक्त जबाबदारी होती.
(९३) ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि चांगले आचरण करू लागले त्यांनी पूर्वी जे काही खाल्ले व प्यायले त्यासाठी त्यांना (जबाबदार) धरले जाणार नाही, परंतु या अटीवर की भविष्यात त्यांनी  त्या गोष्टीपासून दूर राहावे ज्या निषिद्ध केल्या गेल्या आहेत आणि ईमानवर अढळ राहावे आणि सत्कार्य करावे, मग ज्या ज्या गोष्टींपासून प्रतिबंध केला जाईल त्यापासून दूर राहावे  आणि जो अल्लाहचा आदेश असेल त्याला मान्य करावे, मग ईशपरायणतेनिशी सद्वर्तन ठेवावे. अल्लाह सदाचारी लोकांना पसंत करतो.
(९४) हे श्रद्धावंतांनो, अल्लाह तुमची त्या शिकारीद्वारे कठोर परीक्षा घेईल जी अगदी तुमच्या हाताच्या व भाल्यांच्या माऱ्यात असेल, हे पाहण्यासाठी की तुमच्यापैकी कोण त्याला   अप्रत्यक्षरीत्या भितो, मग ज्याने या चेतावणीनंतरदेखील अल्लाहने ठरवून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन केले त्याच्यासाठी भयंकर दु:खदायक शिक्षा आहे.
(९५) हे श्रद्धावंतांनो, एहरामच्या (हजच्या परिवेशाच्या) स्थितीत शिकार करू नका,११० आणि जर तुमच्यापैकी कोणी जाणूनबुजून असे केले तर जो प्राणी त्याने ठार केला असेल तर  त्याला त्याच तोडीचा एक प्राणी पाळीव जनावरांपैकी भेट द्यावा लागेल ज्याची निवड तुमच्यापैकी दोन न्यायी व्यक्ती करतील, आणि ही भेट काबागृहास पोहचविली जाईल, तसे नसेल  तर या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून काही गरिबांना जेवू घालावे लागेल किंवा त्या प्रमाणात उपवास करावे लागतील१११ जेणेकरून त्याने आपल्या कर्माचे फळ चाखावे. पूर्वी जे काही  घडले ते अल्लाहने माफ करून टाकले, परंतु जर कोणी या कृत्याची पुनरावृत्ती केली तर त्याचा अल्लाह बदला घेईल, अल्लाह सर्वांवर वर्चस्व राखणारा आहे आणि बदला घेण्याचे सामर्थ्य राखतो.
(९६) तुमच्यासाठी समुद्रातील शिकार व तिचे भक्षण वैध करण्यात आले,११२ जेथे तुम्ही मुक्काम कराल तेथेसुद्धा ती तुम्ही खाऊ शकता आणि काफिल्यासाठी शिदोरी म्हणूनसुद्धा ती घेऊ  शकता परंतु खुष्कीवरील शिकार, जोपर्यंत तुम्ही एहरामच्या अवस्थेत आहात, तुम्हासाठी निषिद्ध करण्यात आली आहे. म्हणून दूर राहा त्या अल्लाहच्या अवज्ञेपासून ज्याच्यासमोर तुम्हा  सर्वांना गोळा करून हजर केले जाईल.


१०९) ....माननीय इब्ने उमर (रजि.) यांचे कथन आहे की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला, ``अल्लाहने धिक्कार केला आहे. १) दारूचा, २) तिच्या पिणाऱ्यावर, ३) तिला   पाजणाऱ्यावर, ४) तिला (दारूला) विकणाऱ्यावर, ५) तिला खरेदी करण्यावर, ६) तयार करणाऱ्यावर, ७) दारूला वाहून नेणाऱ्यावर, ८) तयार करून घेणाऱ्यावर, ९) त्या माणसावर  ज्याच्यासाठी वाहून नेली जात आहे.'' पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हा नियमसुद्धा सांगितला, ``ज्या गोष्टीच्या अधिक मात्रेमुळे नशा निर्माण होते त्याची थोडी मात्रासुद्धा हराम आहे.''  ज्याच्या एक भांड्याने (ग्लास) नशा निर्माण होते त्याला घोटभर पिणेसुद्धा हराम आहे.'' पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात दारूड्याला निश्चित शिक्षा नव्हती. जो कोणी या  अपराधामुळे धरून आणला जाई त्याला चपलाने, लाथेने, बुक्याने किंवा खजुरीच्या सोट्याने मारले जाई. जास्तीतजास्त चाळीस जखमा या अपराधासाठी त्यांच्या काळात केल्या जात असत.
माननीय अबू बकर (रजि.) यांच्या काळात चाळीस कोडे मारले जात. माननीय उमर (रजि.) यांच्या काळात प्रारंभी चाळीस कोड्यांचीच या अपराधासाठी शिक्षा होत असे. परंतु त्यांनी  पाहिले की लोक या अपराधापासून परावृत्त होत नाही तेव्हा त्यांनी सहाबा (रजि.) यांच्या सल्लयाने ऐंशी कोडे शिक्षा निश्चित केली. याच शिक्षेला इमाम मलिक, इमाम अबू हनीफा  आणि इमाम शाफई (रह.) याच शिक्षेला या अपराधासाठी योग्य समजत असे.पंरतु इमाम अहमद बिन हंबल (रह.) आणि दुसऱ्या कथनानुसार इमाम शाफई (रह.) चाळीस कोडे शिक्षा  योग्य समजतात आणि अली (रजि.)सुद्धा योग्य मानतात. शरियतनुसार इस्लामी राज्याची जबाबदारी आहे की दारूबंदी सक्तीने लागू करावी. माननीय उमर (रजि.) यांच्या काळात  बनीसकीफचे रूवैशीद नावाच्या व्यापाऱ्याचे दुकान जाळले गेले कारण तो लपून दारू विकत होता. एक पूर्ण गाव माननीय उमर (रजि.) यांच्या आदेशाने जाळून टाकला गेला. कारण तिथे  लपून दारू बनविली आणि विकली जात असे.
११०) शिकार मनुष्याने स्वत: केली किंवा दुसऱ्याला शिकारीसाठी मदत केली; या दोन्ही गोष्टी एहरामच्या स्थितीत हराम आहेत. एहराम बांधणाऱ्यासाठी शिकार मारली गेली असेल तर  ते खाणेसुद्धा त्याच्यासाठी अयोग्य आहे. परंतु एखाद्याने आपल्यासाठी शिकार केली असेल आणि त्यातील काही एहरामधारी मनुष्यास भेट दिली तर त्यास खाण्यामध्ये काही दोष नाही.  या सामान्य आदेशापासून पीडादायक आणि हिंसक जनावरांचा मामला वेगळा आहे. साप, विंचु, पिसाळलेला कुत्रा आणि हिंस्त्र पशुसारखे जनावरे जे माणसाला क्षति पोहचवितात, त्यांना एहरामच्या स्थितीत मारले जाऊ शकते.
१११) या गोष्टींचा निर्णय दोन न्यायनिष्ठ व्यक्तीच करतील की कोणत्या जनावरास ठार केल्यास किती गरीबांना (दीनदुबळे) जेवू घालावे किंवा किती रोजे ठेवावेत.
११२) कारण समुद्रयात्रेत कधी कधी साहित्य (शिदोरी) संपून जाते. अशा स्थितीत खाण्यापिण्यासाठी समुद्रातील जनावरांचीच शिकार करावी लागते. दुसरा पर्याय राहात नाही. म्हणून  समुद्री शिकार हलाल करण्यात आली आहे.
११३) अरबमध्ये काबागृहाचे महत्त्व एक पवित्र उपासनागृह म्हणूनच नाही तर त्याची केंद्रीयता आणि पावनतेमुळे ते स्थान पूर्ण देशाचे आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाधार बनलेले  होते. हज आणि उमरासाठी संपूर्ण देश या काबागृहाकडे आकर्षित होऊन येत असे. या संमेलनामुळे अरब लोकांत एकता निर्माण होत होती. वेगवेगळया कबिल्याचे आणि क्षेत्राचे लोक  आपसात सांस्कृतिक संबंध बनवित. काव्याच्या प्रतियोगीतांद्वारा त्यांच्या साहित्य आणि भाषेत विकास घडून येत होता आणि व्यापार उदिमांमुळे पूर्ण देशाची आर्थिक गरजपूर्तीता होत  होती. आदरणीय महिन्यांच्यामुळे अरबांना वर्षातील एकतृतीयांश काळ शांतीकाळ म्हणून प्राप्त् होत असे. याच काळात देशाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत ये-जा सुरक्षितपणे  होत होती. कुर्बानीच्या जनावरांची आणि इतर साहित्याची मोठी उलाढाल होत असे. कुर्बानीच्या जनावरांच्या गळयात पट्टा बांधलेला असे. त्याला पाहून कोणीही त्या जनावराची चोरी करत नसे की कत्तल करीत नसे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget