Halloween Costume ideas 2015

रक्ताचा तुटवडा पाहून घेतले शिबीर

Blood Donation Camp
नागपूर (डॉ. रशीद)
मेडिकल सर्विस सोसायटी आफ इंडिया नागपूर आणि इमामुल हिंद एज्युकेशनल वेलफेयर सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने टिपू सुलतान चौक संदेश नगर च्या हैदर अली ग्राउंड  स्थित राजगवई शाळेत रक्तदान शिबिराचेे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवक शफीक अहमद यांनी सांगितले कि, रुग्णांना रक्ताची अधिक आवश्यकता पाहून या शिबिरा चे आयोजन आकस्मिक रीतीने करण्यात आले. यावेळी 38 दात्यांनी रक्तदान केले.
     या प्रसंगी कार्पोरेशनच्या  चिकित्सकांद्वारे रुग्णांचे  निःशुल्क परीक्षण ठेवण्यात आले होते. याच माध्यमातून वक्ष एक्स-रे ची सुविधा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये 105 रुग्णांचे  परीक्षण केले गेले.
  शिबिरात इमामुल हिंद एज्युकेशनल वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष हाफिज अब्दुल बासित यांनी सांगितले कि, सोसायटी तर्फे रुग्णांकरिता 24 तास अ‍ॅम्ब्युलेंस ची निःशुल्क सेवा मागील 2 वर्षां पासून देण्यात येत आहे.
  या कॅम्पला यशस्वी बनविण्यासाठी मेयो हॉस्पिटल ची टीम, मेडिकल सर्विस सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चे डॉ. नईम नियाज़ी, क़ाज़ी शफीक अहमद, पाउलवाट महिला संगठनच्या अध्यक्षा प्रीति साखरे सहित रविकांता जनबंधु, कल्याणी डोंगरे वनमाला डोंगरे , शाळा  प्रबंधक रिजवानुल हसन, अहले बैत एजुकेशनल वेलफेयर सोसाइटी चे  अध्यक्ष अख्तर अशरफी, पीस फॉर ह्युमॅनिटी मल्टीपरपज सोसायटीचे  मौलाना अब्दुल कबीर फलाही यांच्या व्यतिरिक्त  शमीम एजाज, जलील अंसारी उमर खय्याम यांचे  महत्वपूर्ण योगदान राहिले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget