Halloween Costume ideas 2015

आवाहन व प्रचारकार्याचे महत्त्वाचे नियम : प्रेषितवाणी (हदीस)

    माननीय अली (रजि.) यांनी सांगितले, ‘‘मनांत काही ओढी व इच्छा असतात आणि कधीकधी त्या बोलणे ऐकण्यासाठी तयार असतात आणि कधीकधी त्यासाठी तयार नसतात तेव्हा लोकांच्या मनांत त्या ओढींमध्ये प्रवेश करा आणि तेव्हाच आपले मत व्यक्त करा जेव्हा त्या ऐकण्यासाठी तयार असतात. कारण मनाची स्थिती अशी आहे की जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीबाबत विवश केले जाते तेव्हा ते आंधळे बनते (आणि सांगितलेली गोष्ट अमान्य करतो).’’ (हदीस : किताबुल खिराज, इमाम अबू यूसुफ)
    `माननीय अली इब्ने अबू तालिब (रजि.) यांनी सांगितले, ‘‘लोकांना (आपल्या भाषण व धर्मोपदेशाद्वारे) अल्लाहच्या कृपेपासून निराश न करणारा, अल्लाहची अवज्ञा करण्यासाठी त्यांना सूट न देणारा आणि अल्लाहच्या कोपापासून त्यांना निर्भय न बनविणाराच उत्तम धर्मपंडित आहे.’’ (हदीस : किताबुल खिराज)
स्पष्टीकरण : अशा पद्धतीने भाषण करणे की ज्याच्या परिणामस्वरूप लोक आपल्या मुक्ती व अल्लाहच्या कृपेपासून निराश व्हावेत, हे योग्य नाही आणि लोकांना अल्लाहची दया व कृपाळूपणा आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आरोग्याचा चुकीचा अर्थ सांगून सांगून त्यांना अल्लाहच्या अवज्ञेसाठी धाडसी व बहादूर बनविले जाणे हेदेखील चुकीचे आहे. योग्य पद्धत अशी आहे की दोन्ही पैलू स्पष्ट करावेत जेणेकरून निराशा व निर्भय निर्माण होऊ नये.
‘दीन’ची सेवा करणाऱ्यांसाठी शुभवार्ता
    माननीय मुआविया (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘माझ्या जनसमुदायात अल्लाहच्या ‘दीन’चे रक्षण करणारा एक समूह असेल. जे लोक त्यांचा विरोध करतील ते अल्लाहचा निर्णय येईपर्यंत त्यांना नष्ट करू शकणार नाहीत आणि हे ‘दीन’चे रक्षक लोक आपल्या त्याच स्थितीत कायम राहतील.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘माझ्या जनसमुदायात सर्वाधिक माझ्यावर प्रेम करणारे काही लोक असे असतील जे नंतर येतील. आपले कुटुंबिय आणि आपल्या संपत्तीसह मला पाहण्याची त्यांच्यापैकी प्रत्येकाची इच्छा असेल.’’ (हदीस : मुस्लिम)
    माननीय अमर बिन औफ (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘इस्लाम धर्म सुरूवातील लोकांसाठी अनोळखी होता आणि तो पहिल्यासारखा अनोळखी झाला तर अनोळखींसाठी शुभवार्ता असेल आणि हे ते लोक आहेत जे माझ्यानंतरच्या लोकांनी बिघडविलेल्या माझ्या पद्धतींना जिवंत करण्यासाठी उठतील.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : इस्लामचा प्रसार सुरू झाला तेव्हा तो अनोळखी होता, त्याला लोक  ओळखत नव्हते. मग पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या साथीदारांच्या एकसारख्या प्रयत्नांमुळे त्याला प्रभुत्व व सामथ्र्य लाभले आणि त्याला लोकांनी मान्य केले. मग हळूहळू तो जगासाठी अनोळखी होईल आणि त्या युगात जे लोक ‘दीन’ला जिवंत करण्यासाठी उठतील ते अनोळखी होतील. अशा लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी शुभवार्ता दिली आहे.
कृतज्ञता
    खरे पाहता प्रत्येक मुस्लिमामध्ये कृतज्ञता हे गुणवैशिष्ट्य असणे आवश्यक आहे, परंतु जे लोक या बिघडलेल्या वातावरणात ‘दीन’ला (इस्लाम धर्माला) जिवंत करण्यासाठी उठतील त्यांनी ही शिदोरी प्रत्येक वेळी आपल्याजवळ बाळगणे गरजेचे आहे. कृतज्ञतेची वास्तविकता अशी आहे की मानवाला वाटते अल्लाहने माझ्याशी असा व्यवहार केला की जगात येण्यापूर्वी पोटाच्या खळग्यात हवा आणि खाद्यपदार्थ पाठविले. मग जेव्हा जगात आलो तेव्हा त्याने माझे पालनपोषणाची विविध प्रकारे व्यवस्था केली, मी अगदी लाचार व विवश होतो, वाचा नव्हती की हात-पायही नव्हते. मग माझ्या पालनकत्र्याने माझे संगोपण केले, माझ्या शरीराला शक्ती प्रदान केली, विचार करण्याची, समजण्याची आणि बोलण्याची क्षमता दिली. मग आकाश व जमिनीची संपूर्ण मशीन माझ्यासाठी निरंतर चालवत आहे जेणेकरून मला अन्न-पाणी व हवा मिळावी. एकीकडे आपल्या विवशता व दुर्बलतांना पाहतो आणि दुसरीकडे अल्लाहचा कृपावर्षाव पाहतो तेव्हा त्याच्या मनात आपल्या उपकारकत्र्याचे प्रेम जागृत होते, तेव्हा त्याच्या तोंडातून प्रशंसेचे वाक्य बाहेर पडते आणि शरीरातील सर्व शक्ती स्वामीला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याच्या प्रसन्नतेच्या मार्गात धावण्यासाठी खर्ची पडते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget