ज्याप्रमाणे एखादा व्यावसायिक वा धनवान एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवतो आणि कालांतराने त्यातून अधिकाधिक पैसे कमावतो तद्वत कित्येक राजकारणी धर्म, जात, पात, पंथ, प्रांत, वंश, लिंग, अर्थ शोषित आदी कारणांना हेरून गोतावळा जमवतात. त्याचा कारवाँ बनतो, संघटना तयार होते. त्यातून एखादा राजकीय पक्ष आपोआप जन्माला येतो.
जागोजागीचे विकास सम्राट, गरिबों का मसिहा, दलितों का बेटा-बेटी, जनतेचा जाणता राजा, जातीपातीचा कैवारी, विशिष्ट जातपातीचा उद्धारक, आर्थिक शोषितांचा नेता, सामाजिक, आर्थिक, धार्मिक वा अन्य प्रादेशिक कारणांमुळे पृथक झालेल्या समाज समूहाचा तारणहार बनून पक्षनेता होतो. प्रसारमाध्यमांत अशा नेत्यांचा करिष्मा बनतो. त्याच्या नेतृत्वाखाली, एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा कारभार सुरू होतो. त्यातील एम.डी. म्हणजे मालक व पदाधिकारी म्हणजे संचारक यांच्या मर्जीप्रमाणे वा सल्ल्यानुसार पक्ष कार्यकत्र्यांच्या नेमणुका होतात.
कधी कधी या पदानुसार नेमणुकांना पक्षांतर्गत निवडणुका संबोधले जाते. अर्थात अशा नेमणुका कुठेही व केव्हाही होतात. उदा. कधी केंद्रात (दिल्लीत) तर कधी राज्यात होत असतात. कधी केंद्रीय मंत्री तर कधी राज्यात मुख्यमंत्री होतो, एखादा नकोसा झाला तर राज्यपालपदावर बोळवण होते.
अशा या पक्षधुरिणींचा कारभार एखाद्या प्रायव्हेट लिमिटेडसारखा चालतो. त्याचा परिपाक वशिलेबाजी, भ्रष्टाचारमध्येहोतो. म्हणून तर एखादा नेता दोषी ठरत असेल तर त्याला पक्षाच्या पदावर नेमू नये, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे आलेल्या एका याचिकेसंदर्भात आला आहे.
दोषी व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असेल तर त्याला पक्षाचे पदाधिकारी नेमू नये, असा विचार चालला आहे. त्या संबंधीची दुसरी सुनावणी सहा आठवड्यांनंतर होणार आहे. राजकारण्यांचा धंदा या मुद्यांचा त्यात कस लागणार आहे.
- ज्ञानेश्वर भि. गावडे, फोर्ट, मुंबई.

Post a Comment