Halloween Costume ideas 2015

महाराष्ट्र शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - मराठा सेवा संघ

येवला (शकील शेख)-
मंत्रालयात शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या व छळवणूक प्रकरणी राज्य सरकारवर ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा’ दाखल करण्यात यावा, यासाठी मालेगाव येथे नायब तहसीलदार बोरसे यांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील आहेत. त्यांची औष्णिक प्रकल्पात ५ एकर जमीन सरकारद्वारे संपादित करण्यात आलेली होती. मात्र त्यांना त्या मोबदल्यात फक्त ४ लाख रुपये इतकीच भरपाई देण्यात आली होती. या जमिनीत ६०० आंब्याची झाडे होती.
इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत त्यांना कमी भरपाई मिळाली आहे, असे लक्षात आल्यावर त्यांनी गेल्या ३ महिन्यांपासून संबंधित तलाठी, प्रांत, तहसीलदार, विद्युत विभाग आणि मंत्रालयाकडे पाठपुरावा करूनदेखील योग्य दखल घेण्यात आलेली नव्हती.
सरकारच्या चुकीच्या धोरनांमुळे महाराष्ट्रात हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. हे पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी बाब आहे. मंत्रालयात धर्मा पाटील यांची सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे छळवणूक झालेली आहे.
निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, महानगरप्रमुख नितेश जगताप, जिल्हा समन्वयक रमेश निकम, संकेत पाटील, आकाश ठाकुर, महेश डोंगरे, सागर बोरसे, विशाल कचवे, बबलू पाटील आदि उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget