Halloween Costume ideas 2015

जमाअतच्या मोहिमेत सर्वभाषीय कवींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे- ‘इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी’ या जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या वतीने राबविल्या गेलेल्या मोहिमेअंतर्गत ‘इदारा अदब इस्लामी’ (इस्लामी साहित्य संघ, ठाणे) च्या साहाय्याने एक बहुभाषीय कवी संमेलन सायं. ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत, मराठी ग्रंथालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आले.
    कवी विदेह महाराज, न. ब. सिंह, त्रिलोचन सिंग अरोरा, उमेश मिश्रा, उमाकांत वर्मा, लक्ष्मण दुबे आणि कवयित्री शिल्पा सोनटक्के यांनी हिंदी व मराठी भाषेत तर कवी शमीम अब्बास, इरफान जाफरी, एजा़ज हिंदी, उबेद आ़जमी, डॉ.वफा सुल्तानपुरी, नश्तर मालिकी, जावेद नदीम यांनी उर्दू भाषेत आपआपल्या मधूर रचना सादर केल्या. या संमेलनात अतिथी म्हणून अनंत तरे (शिवसेना), असदुल्लाह खान (संचालक अ. ख. हाईस्कूल आणि ज्युनि. कॉलेज, अ‍ॅडव्होकेट बि. एल. सिंह उपस्थित होते.
कवी न. ब. सिंह नादान यांनी संमेलनाची सुरुवात केली...
‘‘एकता फिर हमारी चाहिए, दूर होंगी दिलों से ऩफरतें,
मोहब्बत की खुमारी चाहिए।’’
कवी उमेश मिश्रा यांनी ‘शांती, प्रगती, मुक्ती’ शीर्षकाने आपल्या कवितांची सुरूवात केली...
‘‘शांति प्रगति मुक्ति से सजी इस काव्य मह़िफल में,
सजे सब ख्वाब मैं अपने सपने छोड़ जाऊंगा।’’
‘‘जाती धर्म का ना हो झगडा भाई बंधू का नाता रहे,
हम सब एक हा भारत वासी कंठ हमारा दाता रहे।’’
कवी डॉ. वफा सुल्तानपुरी यांनी देशातील आजच्या युवकांमध्ये विविध विचार जे पेरण्यात येत असल्याबद्दल म्हटले...
‘‘एहसास के सिनो मीन जलन देख रहा हुँ
शोलो मे झुल्स्ता मे वतन देख रहा हुँ’’....
कवी उमाकांत वर्मा यांनी एका सुंदर गजलचे पठण केले,
‘‘गीता के हो श्लोक या कुरआन की आयत
दोनों के ही सारांश बदलते नहीं देखा’’...
कवी विदेह महाराज यांनी आपल्या विशिष्ट शैलीत एकात्मतेवर अतिशय चांगली कविता सादर केल्या...
‘‘न मस्जिद की बात हो न शिवालयों की बात हो
मेरे जवान बेरो़जगार है पहले निवालों की बात हो।’’
‘‘आप योग करे न करें, लेकिन समय मिलने पर
एक दूसरे का सहयोग जरूर करें।’’
नंतर उबेद आ़जमी यांनी अतिशय उत्तम शायरीचे पठण केले,
‘‘दीवार उठाने की तिजारत नहीं आयी,
दिल्ली में रहे और सियासत नहीं आयी।
दिल सबका भला कर के गुमनाम है अबतक,
इस शख्स के हिस्से में शोहरत नहीं आयी।’’
पुढे मुंब्रा येथील कवी इरफान जाफरी यांनी आपल्या वेगळ्या शैलीत फार सुंदर शायरी ऐकवली तर एजा़ज हिंदी म्हणाले,
‘‘इस दौरे कयामत में हर पल इंसान बदलते रहते हैं,
ये दुनिया है, इस दुनिया में सुल्तान बदलते रहते है।’’
शेवटी संमेलनाचे अध्यक्ष प्रसिध्द कवी जनाब जावेद नदीम तसेच इतर कवींनी आपल्या कवितांचे पठण केले.
    यानंतर सैफ आसरे यांनी मोहीम ‘शांती प्रगती मुक्तीसाठी इस्लाम’चा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की ‘‘या देशात अशी शांती आपण निर्माण करू या की पुरूष तर सोडा समाजातील सर्वांत दुर्बल घटक समजली जाणारी स्त्री जर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एकटी प्रवास करीत असेल तर तिच्या मनात अल्लाहशिवाय कोणतीही भीती असता कामा नये अथवा न अब्रू लुटण्याची भीती असावी वा न तिचे सामान चोरी जाण्याची! आणि प्रगती म्हणजे फक्त काही टक्के भारतीयांची प्रगती नव्हे, तर समाजातील अंतिम वंचित आणि गरीबाच्या घरात जगण्याच्या मूलभूत सोयी पोहचल्या पाहिजेत आणि त्या मिळत नसल्यामुळे आज आत्महत्या करून जीवन संपवावे लागत आहे. यापासून मुक्ती मिळावी. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा पंतप्रधान ते समाजातील प्रत्येक माणूस आपल्या कर्माबाबत स्वत:ला अल्लाहसमोर जबाबदार समजेल. यामुळेच समाजात न्यायाची स्थापना होऊ शकेल. आपल्या देशात धर्म-नास्तिकता, जातपात आणि इतर समस्यांमुळे निर्माण झालेल्या द्वेषपूर्ण वातावरणास स्नेह व प्रेमामध्ये परिवर्तित करणे शक्य व्हावे यासाठी ही मोहीम राबावण्यात येत आहे. आपण सर्वांनी जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या या प्रयत्नात सहकार्य करा. चला आपण सर्व मिळून या देशात न्याय, शांती प्रस्थापित करू या. शांतीशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही.’’
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget