Halloween Costume ideas 2015

‘शोधन’च्या लेखनजिहादास सलाम!

    इस्लाम : शांती, प्रगती आऑिण मुक्तीसाठीचा एकमेव मार्ग’ हा प्रा. हाजी फातिमा मुजावर यांचा लेख वाचला. त्यांनी लिहिले आहे, ‘‘आम्ही सर्व भारतीय, भारतात हिंदू मंदिरांमध्ये परमेश्वराला आळवतो, मुसलमान मसजिदींमध्ये संभाषण करतो, खिस्त चर्चमध्ये परमेश्वराला हाक मारतो, शीख गुरूद्वारामध्ये प्रार्थना करतो, पण हे सर्व संपल्यावर मंदिरातून मशिदीतून गुरूद्वारातून विंâवा चर्चमधून जो माणूस बाहेर पडतो तो हिंदू नाही, मुसलमान नाही, खिस्ती नाही, शीख नाही, तो फक्त भारतीय आहे, माणूस आहे हे इस्लाम शिकवतो.’’
    प्रा. फातिमा यांचे हे तत्त्वज्ञान राष्ट्रवाद अर्थात भारतीयतेला धर्मापेक्षाही सर्वोच्च स्थान देणारे आहे. ते देशाच्या संविधानानुसारच आहे. धर्म आणि राष्ट्र दोन भिन्न संकल्पना असल्याचे भारतीय घटना सांगते. हिंदुत्ववादी ही संकल्पना मोडून हिंदुत्वाला राष्ट्रीयत्व (भारतीयत्व) शी जोडण्याचा अथक काथ्यावूâट करीत आहेत. हे राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असून धर्माधर्मात तेढ व संघर्ष निर्माण करणारे आहे. इस्लाममध्ये राष्ट्रवाद नसला तरी परिस्थितीनुसार मुस्लिम देशांनी राष्ट्रवाद स्वीकारला आहे. नागरीकत्व, भौगोलिक सीमा, चलन, परराष्ट्र धोरण, ध्वज व संविधान आदी बाबीत त्यांची विविधता याचे उदाहरण आहे. राष्ट्रवाद काळाची व जगाची गरज बनली असून मुस्लिम राष्ट्रांचीही ती अपरिहार्यता झाली आहे. इस्लाम धर्म मनुष्याला मुस्लिम बनवू इच्छितो, त्याला अडान्ी व मार्गभ्रष्ट ठेवू इच्छित नाही. इस्लाममध्ये माणुसकी आहे, पण अतिरेकी राष्ट्रवाद नाही.
    एक मुस्लिम प्रसंगानुसार धार्मिक व राष्ट्रीय बनू शकतो, जसे त्याच्या धर्मस्थळावर जेव्हा हल्ला केला जातो तेव्हा तो ‘मुस्लिम’ होऊन प्रतिकार करतो आणि जेव्हा त्यांच्या देशावर हल्ला केला जातो तेNहा तो एक ‘राष्ट्रीय’ होऊन प्रतिकार करतो. लोक मुसलमानांना मूर्खासारखे प्रश्न विचारतात, ‘‘तुम्ही आधी भारतीय आहात की आधी मुस्लिम आहात?’’ याचे उचित उत्तर हे असू शकते की सध्या तो दोन्हीही म्हणजे मुस्लिम व भारतीय आहे. तो प्रथम काय आहे तो काळ, प्रसंग आणि परिस्थितीच दाखवेल. माझ्या या मताशी कदाचित अनेक सहमत नसतीलही, पण मला वाटते यापेक्षा उचित उत्तर मध्यममार्ग नसावा कारणयात इस्लाम आणि राष्ट्रीयता दोघांची बूज राखली जाते, हे मात्र खरे!
    ‘इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग’ हा विशेषांक आवडला. साहित्यिकांनी चांगले लेख लिहिले. कुरआन आणि हदीस ग्रंथांत शांती, प्रगती आणि मुक्तीविषयक अनेक आयती व हदीस आहेत त्यांना उद्धृत करणे आवश्यक होते, तसा प्रयत्न फार कमी लेखक महाशंयांनी केला. ‘शोधन’च्या लेखनजिहादास सलाम!
- निसार मोमीन,
पुणे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget