Halloween Costume ideas 2015

स्नेह संमेलनातून समतेचा संदेश

कौसा-मुंब्रा (ठाणे)-
सावकारी कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे थांबवण्यासाठी इस्लामी धर्मतत्त्वांवर आधारित व्याजरहित अर्थव्यवस्था उपयुक्त ठरू शकेल, असे मत मुंब्रा-दिवा प्रभाग समितीचे उप-मुख्य स्वच्छता निरीक्षक डॉ. नाझीम काजी व्यक्त केले.
जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या ‘शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी इस्लाम' या मोहिमे अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील कौसा-मुंब्रा येथील महानगरपालिकेच्या शाळेत ठाणे महानगर पालिकेच्या मुंब्रा-दिवा प्रभाग समितीतील सफाई कर्मचाNयांसाठी एका स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी डॉ. काजी बोलत होते.
जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंब्राचे सचिव आणि कौटुंबिक सल्लागार प्रा.जावेद शेख आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की कुरआन हा ग्रंथ म्हणजे समस्त मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण ही संपूर्ण विश्वासाठी आहे. आपण सर्व आदम आणि हव्वा यांची संतती आहोत. म्हणून आपणा सर्वांमध्ये रक्ताचे नाते आहे.
इहलोक आणि पारलौकिक जीवनाविषयी सांगताना प्रा. शेख म्हणाले, ‘‘पारलौकिक जीवन सुखकर करण्यासाठी या पृथ्वीवरील आपल्या जीवनात सत्कर्म करायला हवीत, ईश्वर त्याचा मोबदला स्वर्गाच्या रूपात देईल.’’
विश्वातील सर्व मनुष्यजातीच्या सुख, शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी त्यांनी या प्रसंगी अल्लाहकडे प्रार्थना केली.
जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंब्राचे सैफ आसरे यांनी उपस्थितांना मोहिमेचा परिचय करून दिला. तसेच जमाअतची ध्येय-धोरणे आणि कार्याची ओळख करून दिली. अब्दुस्सलाम मलिक यांनी व्याजरहित कर्जपद्धतीवर आधारित राहत सहकारी संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती श्रोत्यांना करून दिली.
या कार्यक्रमाला स्वच्छता निरीक्षक परदेशी आणि मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी उपस्थित होते. या स्नेह संमेलनात ‘शांती, प्रगती आणि मुक्ती’ या संकल्पनेवर दोन ध्वनीचित्रफीतीही दाखवण्यात आल्या. सरतेशेवटी उपस्थित मान्यवर आणि श्रोत्यांचे रफीकभाई यांनी आभार मानले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget