Halloween Costume ideas 2015

मुस्लिमांना शिक्षा घडवून आणण्यासाठी कोर्टावर आय.बी.चा दबाव

सोलापूर (शोधन सेवा) - आय.बी. वर ब्राह्मणी विचारसरणीचा पगडा आहे. ब्राह्मणवादी लोक आय.बी. आणि मीडियाच्या मदतीने आपल्याला हवे तसे निर्णय करून घेतात. पंतप्रधानांना वर्तमानपत्र वाचायचा वेळ नसतो. रोज सकाळी पंतप्रधान निघण्याच्या पूर्वी २० मिनिटे आय.बी.च्या निर्देशकांसाठी राखीव असतात. त्यावेळेत ते देशातील परिस्थिती पंतप्रधानांना सांगत असतात. आय.बी. जे सांगते प्रधानमंत्र्यांना तेच माहिती असते. आय.बी.ने २००३ ते २००८ या दरम्यान देशभरात घडलेल्या बॉम्बस्फोटामध्ये जाणून बुजून मुस्लिम तरूणांना गोवले. त्यांना माहित होते की, हे स्फोट ब्राह्मणवाद्यांनी केलेले आहेत. तरी परंतु, मुद्दामहून मुस्लिम तरूणांना गोवले गेले व कोर्टाने जेव्हा त्यांना निर्दोष सोडायला सुरूवात केली तेव्हा आय.बी.ने कोर्टावर दबाव टाकून निर्दोष मुस्लिम तरूणांना शिक्षा घडवून घेतली. अनेक तरूण जे बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी नव्हतेच त्यांनाही गोवण्यात आले. त्यांचे लोकेशन कुठे होते हे तपासण्यास आलेले नाही. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचे निकालपत्र मी वाचलेले आहे. व माजी खात्री झालेली आहे की, कोर्टाने आय.बी.च्या दबावाखाली चुकीच्या पद्धतीने मुस्लिम तरूणांना शिक्षा दिलेल्या आहेत. सगळ्यात मोठे उदाहरण तर पुण्याच्या जर्मन बेकरीचे आहे. त्यात अगोदर भटकल नावाच्या एका तरूणाला गोवण्यात आले. पण तो त्यावेळेस एका लग्न समारंभात होता पुण्यात नव्हता, या व्हीडीओमुळे सिद्ध झाल्याने हिमायत बेगला त्यात अडकविण्यात आले. त्याला शिक्षाही करण्यात आली. ही गोष्ट अलाहिदा उच्च न्यायालयाने त्याला आरोपमुक्त केले. एकंदरित मुस्लिमांना शिक्षा घडवून आणण्यासाठी आय.बी. कोर्टावरसुद्धा दबाव आणण्यात यशस्वी झाल्याचा आरोप माजी पोलीस महानिरिक्षक एस.एम. मुश्रीफ यांनी येथे केला.
    सोलापूरच्या रंगभवन येथे ऍड. गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने ’लोकशाही, संविधान आणि न्यायसंस्थेसमोरील आव्हाने’ या विषयावर   मंगळवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती  बी.जी. कोळसे पाटील, पत्रकार निरंजन टकले, प्रेम हनवते, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक एम.आय. शेख, सुलतान शेख, पत्रकार कलीम अजीम, समीउल्लाह शेख, प्रा. इ.जा. तांबोळी, इस्माईल सय्यद आदींची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाची सुरूवात वृक्षाला पाणी देवून करण्यात आली. प्रेम हनवते लिखित आणि सय्यद शहा वायज अनुवादित ’छत्रपती शिवाजी महाराज के मुस्लिम सिपेहसालार’ या उर्दू पुस्तकाचे आणि प्रा. डॉ. इ.जा.तांबोळी, इस्माईल सय्यद व सरफराज शेख संपादित ’मौलाना अबुल कलाम आझाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
    मुश्रीफ पुढे बोलताना म्हणाले, भारताचा यापूर्वी खरा इतिहास लिहिला गेला नाही. कारण मनुविचारणसीत तो लिहिण्याची ताकद इतरांमध्ये नव्हती. आज खरा इतिहास लिहिला जात असताना तो देशद्रोह ठरविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र हा खरा इतिहास सर्वांपर्यंत न पोहोचता ज्यांना माहित आहे, त्यांच्यापर्यंतच पोहोचतो. संविधानाची अंमलबजावणी कशी होते हे पाहण्याची जबाबदारी न्यायसंस्थेवर आहे. मात्र त्या संस्थेवरही आज दबाव वाढत असल्याची खंत एम.एम.मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.    यावेळी बी.जी. कोळसे पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानातून सर्वांचा उद्धार होईल अशी अपेक्षा होती. मात्र संविधानाची आज एक टक्काही अमलबजावणी होत असलेली दिसत नाही. उलट धर्मांशी युती साधून भांडवलदार फोफावले आहेत. ही युती धोकादायक आहे. आज खरे चालत नाही. खरे बोलणाऱ्याला देशद्रोही ठरविले जाते. ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला त्यांचे वंशज आज सत्तेत आहेत. ते वास्तव जनतेला जगात राहू न देता काल्पनिक जगात जगायला सांगत आहेत. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले संविधान दिसत नाही. शिक्षणाचे व्यापारीकरण करा असे संविधानात कुठेच सांगितले नसताना देखील ते सर्रास केले जात आहे. नवी अर्थनीती देशातील मुठभर श्रीमंतांच्या सोयीची बनली आहे. पंतप्रधान विदेशात जावून देश विकत आहेत. न्यायमुर्ती ईश्‍वराच्या खालोखाल असतात. चार न्यायमूर्ती जनतेच्या न्यायालयात आले. कारण न्यायसंस्थेने आज जनतेच्या डोळ्यावरच पट्टी बांधली असल्याने न्यायदानात पारदर्शकता दिसत नाही, हे दुर्देव आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई भावा-भावासारखे राहत असल्याने हे दिवस आले आहेत. त्यामुळे डोक्याने काम करा, असे आवाहनही कोळसे पाटील यांनी केले. यावेळी पत्रकार निरंज टकले म्हणाले, ऍड. गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरने समाजासमोर सत्य इतिहास आणण्याचे जे काम सुरू केले आहे. ते कौतुकास्पद आहे. मी यांच्या कामाने भारावून गेलो आहे. सरफराज शेख लिखित सल्तनते खुदादाद पुस्तक वाचल्यानंतर मी अवाक झालो. या पुस्तकातील सत्यता यातील संदर्भ, घटनाक्रम आणि योग्य मांडणी दाखवून देतात. एक स्टोरी बनविण्यासाठी मला हजारो कागदपत्रे जमा करता-करतांना अश्रम परिश्रम घ्यावे लागले. सरफराजला एवढं मोठं संदर्भासहित पुस्तक लिहिण्याला किती परिश्रम घ्यावे लागले असतील याचा अंदाजही बांधता येत नाही. माझी जिथे-जिथे गरज पटेल त्यावेळी सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज द्यावा मी सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.  यावेळी न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सविस्तर माहितीही यावेळी सांगितली.

गाजीयोद्दीन रिसर्च सेंटर यंदा १२ पुस्तकांचे प्रकाशन करणार : मुजीब काजी
प्रसिद्ध साहित्यिक, लेखक ऍड. गाजीयोद्दीन साहेबांनी समाजाला दिशा देईल, अशी ग्रंथसंपदा लिहून ठेवली. त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे लेखन करून समाजाला एकरूप करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. त्यांचा ऐतिहासिक वारसा आणि त्यांचे पुढे नेण्यासाठी २०१५ मध्ये ऍड. गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरची स्थापना केली. त्याच्यानंतर दुर्मिळ अशा 10 हजारांच्या जवळपास ग्रंथाची खरेदी सेंटरने केली. हे ग्रंथ इंग्रजी, मराठी, फारसी, हिंदी, मराठी भाषेतील आहेत. रिसर्च सेंटरची प्रकाशन संस्था आहे. त्या संस्थेद्वारे विविध नवी दृष्टीकोण करणाऱ्या साहित्याची निर्मिती सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून २०१७ मध्ये सल्तनते खुदादाद टिपु सुलतानवर आधारित या पुस्तकाचे लेखन सरफराज शेख यांनी केले. एका वर्षात ४ हजार प्रति खपल्या. ७ हजाराची प्रति विकल्या गेल्या. तसेच भारतीय लेखन विपर्यास, मुसलमान,  मुस्लिम राज्यकर्त्यांचा इतिहासाचे लेखन सुरू आहे. मुस्लिम समाजाच्या इतिहासाला काही विषमतावादी इतिहासकारांनी विकृतपणे, खोटेनाटी मांडनी करून बदनामी व समाजात दुही पसरविण्याचे काम केले. त्यामुळे समाजासमोर खरा इतिहास आणणे गरजेचे आहे. मराठीतील प्रेम हणवते लिखित छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मुस्लिम या पुस्तकाचे ’ छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम सिपेहसालार’ या नावाने उर्दूत २२ वर्षीय युवक वाय.एस. शेख यांनी भाषांतर केले. तसेच इ.जा. तांबोळी आणि इस्माईल सय्यद, सरफराज शेख संपादित मौलाना अबुल कलाम आझाद या दोन पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. २०१८ मध्ये जवळपास १२ पुस्तकांचे प्रकाशन गाजीयोद्दीन रिसर्च सेंटर करणार आहे. यामध्ये बाबर चिकित्सक दृष्टीकोण, मध्ययुगीन मुस्लिम विद्वान, तली-तुली कुतुबशाही उर्दू वाचावी, इब्राहीम आदीलशाहाच्या नवरसनामाची देवनागरी लिप्याअंतरी या वर्षी आणण्याचा प्रस्ताव असल्याचेही मुजीब काजी म्हणाले. अलाउद्दीन खिल्जी यांचा राज्य प्रशासन आणि धर्म, अबु फजलचा अकबरनामा, नुरूद्दीन जहांगीर यांच ’कुजुक जहांगीरी’चे मराठी भाषांतर आणि अमीर खुस्त्रो यांच आत्मचरित्रही आम्ही मराठीमध्ये आणणार असल्याचे ते म्हणाले. मध्ययुगीन मुस्लिम राज्यकर्त्यांचे धार्मिक धोरण यावरही पुस्तक काढण्यात येणार आहे. तसेच हैद्राबादचे शेवटचे सातवे निजाम उस्मानअली यांच्या निवडक भाषणांचा ग्रंथ, औरंगजेबाचे दक्षिणेतील प्रशासन यावरही लेखन सुरू असल्याचे ते म्हणाले. मुस्लिम राज्यकर्त्यांचा इतिहासातून अनुल्लेख याविषयावर डिसेंबर अखेरपर्यंत एक ग्रंथ प्रकाशित करणार आहोत. एपीजे अब्दुल कलामांचे स्वप्न होते की २०२० पर्यंत भारत महासत्ता बनवाचं. तर आम्हीही ते स्वप्न मनात बाळगले असून इतिहासाच्या माध्यमातून गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरतर्फे २०२०पर्यंत ४० ग्रंथ प्रकाशित करणार आहोत. जे दिशादर्शक ठरणार आहेत. ते सत्यावर आधारित असतील. त्याचे ठोस पुरावे सादर करण्यात येतील. तसेच फारसी, उर्दू भाषाचे प्रभुत्व करणारे लोक कमी करणार आहेत. फारसीचे जतन करण्यासाठी आम्ही ५० हजार कागदपत्रे संकलित करून याच्या मूळ प्रत बनवून त्याच्या डिजीटल प्रतिही बनविणार आहोत, जेणेकरून ते सर्व सुरक्षित राहील. तसेच मोगल काळातील फारसी ग्रंथांच्या त्याच भाषेत डिजीटल प्रतही बनविणार आहोत. तसेच २०२५ पर्यंत मुस्लिम राज्यकर्त्यांच्या इतिहासाचे पुनरावलोकन करणार आहोत. त्यासाठी आपली फार मोठी गरज आहे. मन जुळली तर देश आपोआप जुळेल. या देशकार्यासाठी तुमची आम्हाला जेव्हा-जेव्हा गरज पटेल तेव्हा तुम्हाला आवाज देवू आपण सर्व प्रकारचे आम्हाला सहकार्य कराल,  अशी आमची भावना आहे.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साहिल शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऍड. गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरचे अध्यक्ष समिउल्लाह शेख, उपाध्यक्ष राम गायकवाड, सचिव ऍड. महिबूब कोथिंबीरे, सरफराज शेख, इ.जा.तांबोळी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget