येवला- महाराष्ट्र पत्रकार संघाची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या बैठकीत येवला तालुका अध्यक्षपदी ‘न्यूज टुडे’चे प्रतिनिधी तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व मितभाषी व आपल्या लेखणीच्या बळावर संपूर्ण जिल्ह्यात आपला ठसा उमटवणारे पत्रकार अय्युब शाह यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष आनंद जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविदास बैरागी, उपाध्यक्ष डी. बी. कादरी आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष अय्युब शाह यांचा सत्कार करुन निवडीचे पत्र प्रदान केले. त्याचप्रमाणे कार्यध्यक्षपदी जयंत केंगे, भावराव वाळके, सरचिटणीसपदी बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्ष विलास कांबळे, संतोष आहेर, खजिनदार प्रशांत कळंके आदीची एकमताने निवड करण्यात आली, तर दिपक सोनवणे, मोहन कुंभारकर, विनोद पाटील, अनिल परदेशी, प्रविण खडांगळे, देवराम कदम, सचिन वखारे आदींची कार्यकारणीवर वर्णी लागली आहे. जिल्हा प्रतिनिधी म्हणून प्रसाद गुब्बी तर उत्तर महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून सय्यद कौसर यांना संधी मिळाली आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र वाघ, चंद्रकांत साबरे, प्रविण पहिलवान, विजयराव आहेर, शकील शेख, शाम तांबे, सलीम काजी, मोबिन शेख, संदीप पाबळे, प्रकाश साबरे आदींसह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. निवडीनंतर अय्युब शाह यांनी आपली प्रतिक्रिया देताना पत्रकाराच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देऊ व लवकरच तालुक्यतील पत्रकारांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करू, अशी ग्वाही दिली.

Post a Comment