Halloween Costume ideas 2015

आचरणाशिवाय आवाहन : प्रेषितवाणी (हदीस)

    माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी मेराजच्या रात्री काही लोकांना पाहिले की त्यांचे ओठ आगीच्या कातरीने कापले जात होते. मी जिब्रिल (अ.) यांना विचारले की हे कोण लोक आहेत? जिब्रिल (अ.) म्हणाले की हे पैगंबरांच्या जनसमुदायाचे भाषण करणारे लोक आहेत. हे लोकांना पुण्यकर्म आणि ईशभिरूतेचा आदेश देत होते आणि स्वत:ला विसरत होते.’’ (हदीस : मिश्कात)
    माननीय हरमला (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हटले, ‘‘आपण मला कोणती गोष्ट करण्याचा आदेश देत आहात?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘सदाचाराने वागा आणि दुराचारापासून अलिप्त राहा आणि पाहा, तू सभेतून उठून बाहेर गेल्यानंतर तुझी लोकांनी चांगल्या गुणवैशिष्ट्यामुळे आठवण करावी असे तुला वाटत असेल तर तू स्वत:मध्ये चांगली गुणवैशिष्ट्ये निर्माण कर आणि तुझ्या गैरहजेरीत लोक तुझ्या बाबतीत काही म्हणतील जे तुला आवडत नाहीत, त्यापासून स्वत:ला अलिप्त ठेव.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीरकण : लोकांनी आपली चांगल्या गुणवैशिष्ट्यामुळे आठवण करावी, असे मनुष्याला वाटत असेल तर त्याने तसलीच कामे करावयास हवीत आणि लोकांनी आपली वाईट गुणवैशिष्ट्यांमुळे आठवण करावी असे मनुष्यास वाटत नसेल तर त्याने अशा वाईट गुणवैशिष्ट्यांपासून दूर राहिले पाहिजे.
    एका मनुष्याने माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांना म्हटले,
    ‘‘मला दीनचे काम करायचे आहे. सत्कर्म करण्यास सांगू इच्छितो आणि दुष्कर्म करण्यापासून रोखू इच्छितो.’’ ते म्हणाले, ‘‘तुम्ही त्या स्तरापर्यंत पोहोचला आहात?’’ तो म्हणाला, ‘‘होय, आशा आहे.’’ इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘कुरआनच्या तीन आयती तुम्हाला अपमानित करतील याची तुम्हाला भीती वाटत असेल तर अवश्य दीनचे काम करा.’’ तो म्हणाला, ‘‘त्या कोणत्या आयती आहेत?’’ इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, पहिली आयत ही आहे–
    ‘‘तुम्ही लोकांना सत्कर्माचा आदेश देता आणि स्वत:ला विसरता?’’ (अल बकरा)
    इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘या आयतीवर चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे काय?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’
    दुसरी आयत ही आहे–
    ‘‘तुम्ही ती गोष्ट का सांगता जी स्वत: करीत नाही?’’
    इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘या आयतीवर चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे काय?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’
    आणि तिसरी आयत ही आहे–
    शुऐब (अ.) आपल्या जनसमुदायाला म्हणाले, ‘‘ज्या वाईट गोष्टींपासून मी तुम्हाला रोखतो, त्या हिरिरीने स्वत: कराव्यात अशी माझी इच्छा नाही. (तर मी त्यांच्यापासून खूप दूर राहीन. माझ्या कथनी व करणीमध्ये तुम्हाला फरक आढळणार नाही.)’’ (सूरह हूद)
    इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘या आयतीवर चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे काय?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’ तेव्हा इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘जा, अगोदर तुम्ही स्वत:ला सत्कर्माचा आदेश द्या आणि दुष्कार्म करण्याची मनाई करा. हे दीनचा काम करणाऱ्याचे पहिले लक्ष्य आहे.’’ (हदीस)
स्पष्टीकरण : हा मनुष्य स्वत:ला विसरला होता आणि दुसऱ्यांना दीनच्या गोष्टी सांगण्याची हौस बाळगत होता. माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांनी योग्य सद्यस्थितीचा अंदाज लावून चांगला सल्ला दिला.

  माननीय उसामा बिन जैद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एक मनुष्य अंतिम निवाड्याच्या दिवशी आणला जाईल आणि आगीत पेâकला जाईल. त्याच्या आतड्या आगीत बाहेर निघून पडतील. मग त्या आगीत अशाप्रकारे घेऊन फिरेल जसे गाढव आपल्या चक्कीभोवती फिरतो. तेव्हा दुसरे नरकवासी लोक त्याच्याजवळ जमा होतील आणि विचारतील की हे अमक्या, ही तुझी काय अवस्था आहे? तू तर आम्हाला जगात पुण्यकर्म करण्यासाठी सांगत होतास? आणि दुष्कर्म करण्यापासून रोखत होतास? (असे पुण्यकर्म करूनसुद्धा तू येथे कसा काय आलास?) तो मनुष्य म्हणेल की मी तुम्हाला पुण्यकर्म करण्यास सांगत होतो आणि स्वत: त्यांच्या जवळदेखील जात नव्हतो आणि दुष्कर्मांपासून तुम्हाला रोखत होतो मात्र स्वत: करीत होतो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget