Halloween Costume ideas 2015

पहेल फाऊंडेशनतर्फे ‘नशे के खिलाफ आवाज उठाए’ कार्यक्रमाचे आयोजन

भांडुप-सोनापूर (मुंबई)- (मलिक अकबर)
‘पहेल फाऊंडेशन’च्या वतीने ‘नशे के खिलाफ आवाज उठाए’ या शीर्षकाखाली मुंबई येथील भांडुप-सोनापूर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात अनेक मान्यवरांसह मोठ्या प्रमाणात महिला व पुरुषांनी हजेरी लावली होती.
    कार्यक्रमाची सुरूवात कारी मुस्तकिम यांच्या कुरआन पठणाने करण्यात आली आणि त्याचा अर्थ समजावून सांगताना मौलाना म्हणाले की, ईश्वराने दारू व यासारख्या इतर व्यसनांच्या आहारी जाण्यास मनाई केली आहे. यानंतर ‘माय मुंब्रा’ या संस्थेचे संचालक अब्दुल रऊफ लाला यांनी आपल्या विशिष्ट शैलीत पालकांना उद्देशून सांगितले की, त्यांनी आपल्या पाल्यांचे हावभाव, वागणूक, घरात व बाहेरील व्यवहार अशा बाबींवर बारकाईने लक्ष देऊन त्यांच्या मनातील विचलता लक्षात घेऊन वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे योग्य मार्गदर्शन करावे. त्यांना असे वाटता कामा नये की माझे पालक माझ्यापासून दुरावत आहेत. या उलट त्यांना पालकांसारखा कोणीच  शुभचिंतक नाही असे वाटणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी मौलवी लोकांनाही उद्देशून अशी विनंती केली की, प्रत्येक शुक्रवारी नमाज पठणाआधी जर आपल्या समाजातील युवकांना आपण या व्यसनांसंबंधी भय निर्माण करून व्यसनमुक्तीचे आवाहन केले तर ही परिस्थिती आटोक्यात आणण्यास सिंहाचा वाटा ठरेल. तसेच त्यांनी आपले असे मत प्रकट केले की, जर पोलीस यंत्रणेने याबाबत ठोस पाऊल उचलल्यास समाजातून ही नशेची लत संपुष्टात येऊ  शकते. मात्र आपणही यासाठी त्यांच्या मदतीला असणे गरजेचे आहे. जसे, त्यांच्याकडे आपण तक्रारी नोंदविणे, योग्य वेळी योग्य ठिकाणी काय घडत आहे ते त्यांच्या निदर्शनास आणून देणे वगैरे.
    यानंतर ‘पहेल फाऊंडेशन’चे सचिव तन्वीर अहमद यांनी आपल्या फाऊंडेशनचा परिचय देताना सांगितले की, गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या या संस्थेच्या माध्यमाने समाजसुधारासाठी तटस्थ राहून समाजातील बिघाड, दुरवस्था, वाईट कृत्य यासारख्या समस्यांपासून सुटकारा प्राप्त व्हावे म्हणून वक्तृत्व स्पर्धा, कौशल्यप्राप्त विद्यर्थ्यांना पारितोषिक वितरण व आजव्यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजात बदल घडविण्यास प्रयत्नशील असतो.
यानंतर मुंबईचे प्रसिध्द मनोरूग्ण विशेषज्ञ डॉ. युसूफ माचिसवाला यांनी व्यसनासंबंधी निरनिराळ्या प्रकारच्या रोगांबाबत व त्यांच्यासंबंधी उपचारांबाबत मार्गदर्शन करीत सांगितले की मुलांच्या रोजच्या वागणुकीत काही बदल घडत आहे का, हे लक्षात आल्यावर समजावे की ही सुरूवात आहे. त्यानुसार आपण त्याच्या तळापर्यंत पोचणे गरजेचे आहे. व्यसनाच्या आहारी गेल्याची खात्री पटल्यास सर्वप्रथम त्याच्या उपचाराबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की सुरूवातीलाच उपचार झाल्यास त्या युवकाला हमखास व्यसनमुक्ती लाभू शकते. याखेरीज व्यसनी व्यक्तीने कितीही मोठा टप्पा गाठला असला तरी विलंबाने का होईना मात्र त्याचा उपचार होणे संभव आहे. शिवाय डॉक्टर साहेबांनी यासंबंधीच्या उपचारासाठी वेगवेगळ्या रूग्णालयांची व चिकित्सकांची माहितीही दिली.  शेवटी त्यांनी व्यसनासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन पालकांना निश्चिंत केले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यसनमुक्तीवर आधारित शेवटी ‘से नो टू ड्रग्ज’ या एकांकिकेद्वारे पालकांना संदेश देण्यात आला. या नाटकाला प्रेक्षकांनी चांगले प्रतिसाद दिला. या नाटकाचे मार्गदर्शक राजेंद्र तिवारी होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिसरातील समाजसेवक व मान्यवर मुहम्मद उमर खान हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबिर मुस्तफाबादी यांनी उत्तमरित्या पार पाडले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष नसीम हाश्मी, तन्वीर अहमद, अ.सलाम समानी, मोहम्मद शफीक, मलीक अकबर, मंजूर पठाण व डॉ. इफ्तेखार अहमद यांचे सहकार्य लाभले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget