धुळे (हुसैन गुरुजी)- कोणताही धर्म द्वेष-मत्सर करण्याची शिकवण देत नाही. बारतीय राज्यघटना बंधुभाव व समतेवर आधारित असून सर्वांना अधिव्यक्ती स्वातंत्र्य, शोषणापासून संरक्षण देते. देशाच्या संविधानाने प्रत्येकाला त्याच्या धर्माप्रमाणे आचरम, प्रचारासह सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार प्रदान केले आहेत. परुंत ९९ टक्के लोक स्वत:च्या दायित्वाचे विस्मरण होऊन केवळ हक्कांसाठी आग्रही असतात, असे मत अमळनेर येथील अॅ़ड. रियाजुद्दीन काझी यांनी व्यक्त केले. येथील सर्वधर्म संघाच्या २७ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम सेंट अॅन्स कॅथॉलिक चर्चच्या प्रांगणात झाला, त्या वेळी अॅड. काझी बोलत होते. गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंग अध्यक्षस्थानी होते. फादर विल्सन रॉड्रिग्ज, वेदशास्त्री डॉ. गजानन पाठक, प्राचार्य व्ही. के भदाणे, प्रा. डॉ. कृष्णा पोतदार, शेख हुसैन गुरुजी, रतनचंद शहा, डॉ. क. उ. सिंघवी, मधुकर शिरसाट, डॉ. मोहम्मद सलीम अन्सारी, सरबजित चिमा, जयश्री शहा, सुधाकर बेंद्रे, डॉ. विजयचंद्र जाधव, श्याम पाटील, अप्पा करंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी बर्वे कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनींची सर्वधर्म प्रार्थना झाली. कवी शंकर पवार यांनी सर्वधर्म संघाचे गीत सादर केले. अॅड. काझी म्हणाले की, देशात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात, ही राज्यघटनेची किमया आहे. हिंदू, जैन, बौद्ध, शीख, इस्लाम, खिस्ती, यहुदी, पारशी हे सर्व प्राचीन, ऐतिहासिक धर्म आहेत. धर्माचा अभिमान जरूर बाळगा, परंतु अन्य धर्मांचाही आदर करा. या वेळी जागतिक शांततेसाठी प्रतीक्षा सोनवणे, अॅड. ललिता धोबी, आफरीन अन्सारी, आयेशा सिद्दीकी, होली चाइल्डच्या राजन चिमा, दीपश्री सदाशिव, सविता पठार, सरिता अजमेरा यांनी प्रार्थना सादर केल्या. महेजबीन अखलाक अहमदने देशभक्तीपर गीत सादर केले. डॉ. सलीम अन्सारी यांनी ‘हम एक थे, हम एक है, हम एक रहेंगे’ हे गीत म्हटले. होल्डी चाइल्ड स्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘शहिदों को सलाम’ ही नाटिका सादर केली. फरीद शेखने ‘ऐ मेरे प्यारे वतन’ या गीताद्वारे वर्धापन दिनाचा समारोप केला.
प्राचार्य एम. एम. चिमा यांनी प्रास्ताविक केले. प्रणाली सावंत यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय कल्याणकर यांनी आभार मानले. अॅड. एम. एस. पाटील, अशोक बागूल, राम जाधव, सुनीता शिंदे, सुषमा नायर आदींनी संयोजन केले.
प्राचार्य एम. एम. चिमा यांनी प्रास्ताविक केले. प्रणाली सावंत यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय कल्याणकर यांनी आभार मानले. अॅड. एम. एस. पाटील, अशोक बागूल, राम जाधव, सुनीता शिंदे, सुषमा नायर आदींनी संयोजन केले.
Post a Comment