पुणे (शोधन सेवा) - संदेश लायब्ररी द्वारा सोमनाथ देशकर लिखित ’स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान’ या ग्रंथाचे प्रकाशन 5 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या असेम्ब्ली हॉल, आजम कॅम्पस येथे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. रफिक सय्यद, समीर शेख, पुस्तकाचे लेखक सोमनाथ देशकर, मौलाना निजामुद्दीन, मौलाना रजीन अश्रफ, डॉ. रफिक सय्यद पारनेरकर आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी संदेश लायब्ररीद्वारे प्रकाशित केल्या जात असलेल्या साहित्याची प्रशंसा केली. ’स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान’ हा ग्रंथ सर्व देशबांधवांसाठी दिशादर्शक असा आहे. खरा इतिहास समाजासमोर येणे गरजेचे असल्याचेही यावेळी मान्यवर म्हणाले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, काही मुठभर लोकांनी तेलाच्या अर्थकारणातून हातात शस्त्र घेऊन एकमेकांना गोळ्या घालण्यास सुरूवात केली. आणि शांतीचा ध्वजवाहक इस्लाम अल्पावधीतच बदनाम झाला. इस्लाम म्हणजे हिंस्त्र लोकांचा धर्म अशी प्रतीमा तयार करण्यात माध्यमांनी मोठी भुमिका अदा केली. हे सर्व एका आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग होता. कारण तेलाच्या मोबदल्यात अमेरिका आणि रशियासारख्या मातब्बर देशांनी लढणार्या मुस्लिमांच्या दोन्ही गटांना शस्त्रास्त्र पुरविली. एवढेच करून ते थांबले नाहीत तर प्रत्यक्षात त्यांनी खाडीमध्ये आपली सेना उतरविली आणि अनेक देश बेचिराख करून टाकले. आकाशातून सातत्याने होणारा बॉम्ब वर्षाव जमीनीवरून होणारे सैनिकांचे हल्ले यांना तोंड देण्यासाठी मग ज्यांनी प्रतिकाराचा मार्ग स्वीकारला त्यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भारतातील मुस्लिमांच्या भोवतीही संशयाचे वातावरण तयार झाले. भारतातील मुस्लिम इथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत. त्यांचा अनादर करू नका, असे दिल्लीत येवून सांगण्याची पाळी बराक ओबांमावर आली. हा सगळा प्रकार गैरसमजातून निर्माण झाला, असेही नाही. त्या लोकांनी मुस्लिमांच्या निष्ठेला आव्हान दिले. ज्यांनी कधीच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीमध्ये फूट पडू नये, यासाठी सर्वांनीच मिळून काम करण्याची आवश्यकता आहे, असे ही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आवाहन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment