Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)

(२६४) ....असे लोक आपल्याठायी दान देऊन जे पुण्य कमवितात, त्यापासून त्यांच्या हाती काहीही लागत नाही आणि अश्रद्धावंतांना (विद्रोहीना) सरळ मार्ग दाखविणे हा अल्लाहचा शिरस्ता नव्हे.३०५ (२६५) याउलट जे लोक आपली संपत्ती केवळ अल्लाहची मर्जी संपादन करण्याकरिता पूर्ण मानसिक धैर्य व संतोषाने खर्च करतात त्यांच्या खर्च करण्याचे उदाहरण असे आहे जसे एखाद्या पठारावर एक बाग असावी, जर जोरदार वृष्टी झाली तर दुपटीने फळे यावीत व जरी जोराची वृष्टी झाली नाही तरीसुद्धा केवळ एक हलकासा तुषारदेखील त्याकरिता पुरेसा व्हावा.३०६ जे काही तुम्ही करता ते सर्व अल्लाहच्या दृष्टीत आहे. (२६६) तुम्हापैकी कोणी हे पसंत करतो काय की त्याच्याजवळ खजूर आणि द्राक्षे आणि सर्व प्रकारच्या फळांनी बहरलेली हिरवीगार बाग कालव्यांनी सिंचित असावी आणि ती ऐन वेळी एका जोरदार वावटळीच्या माऱ्यात सापडून उद्ध्वस्त व्हावी ज्या वेळेस तो स्वत: वृद्ध झाला असेल आणि त्याची अल्पवयीन मुले या वेळेस काही योग्यतेची नसतील?३०७ अशाप्रकारे अल्लाह आपल्या गोष्टी तुमच्यासमोर स्पष्टपणे समजावून सांगतो कदाचित तुम्ही मनन चिंतन करावे. (२६७) हे ईमानधारकांनो! जी संपत्ती तुम्ही कमविली आहे आणि जे काही आम्ही जमिनीतून तुमच्याकरिता उत्पन्न केले आहे, त्यापैकी उत्कृष्ट भाग अल्लाहच्या मार्गात खर्च करा. असे होता कामा नये की त्याच्या मार्गात देण्याकरिता निकृष्टतम प्रतीची वस्तू निवडण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, वास्तविक पाहता तीच वस्तू जर एखाद्याने तुम्हाला देऊ केली तर तुम्ही ती घेणे मुळीच पसंत करणार नाही याखेरीज की तुम्ही ते स्वीकारण्यात डोळेझांक कराल. तुम्ही समजून असावे की अल्लाह निरपेक्ष आहे आणि सर्वोत्तम गुणांनी तो संपन्न आहे.३०८


३०५)     येथे द्रोही (नकार देणे) पासून तात्पर्य कृतघ्न आणि नकार देणारा आहे. जो मनुष्य अल्लाहने दिलेल्या देणग्यांना अल्लाहच्या मार्गात अल्लाहची प्रसन्नताप्राप्तीसाठी खर्च करण्याऐवजी जगाला खूश करण्यासाठी खर्च करतो किंवा उपकार दर्शवून दानपुण्य करतो; असा मनुष्य अल्लाहचा कृतघ्न आणि द्रोही आहे. तो स्वत: अल्लाहची प्रसन्नता प्राप्तीची इच्छा बाळगत नाही तर अल्लाह त्यापासून निस्पृह आहे, की त्याला विनाकारण आपल्या प्रसन्नताप्राप्तीचा मार्ग दाखवावा.
३०६)     ""जोराची वर्षा'' म्हणजे ते दान पुण्य जे अत्यंत चांगल्या भावनेने आणि उत्तमरीतीच्या नीयतीने दिले जाते आणि ""हलकावर्षाव''पासून ते दान पुण्य आहे ज्याच्या मागे सद्‌भावनेचा जोर नसेल.
३०७) म्हणजे तुम्ही हे पसंत करत नाही की तुमची आयुष्याची कमाई एक अशा नाजुक वेळी बरबाद व्हावी जेव्हा तुम्ही त्यापासून फायदा घेण्यासाठी सर्वात जास्त गरजवंत आहात. अशा वेळी कमविण्याची क्षमता आणि वेळ निघून गेलेली असते. तेव्हा हे तुम्ही कसे मान्य करता की आयुष्यभर जगात काबाडकष्ट करून परलोकात तुम्हाला कळून चुकावे की जगातील तुम्ही केलेले काबाडकष्ट सर्व निष्फळ होते. जे काही तुम्ही जगासाठी कमविले होते ते सर्व जगातच मागे राहिले. परलोकजीवनासाठी तर तुम्ही जगात काहीच कमाई केली नाही, ज्याचे फळ तुम्हाला येथे मिळावे. येथे परलोकात तुम्हाला पारलौकिक जीवनासाठी नव्‌याने कमविण्याची संधी मिळणार नाही. पारलौकिक जीवनासाठी कमाई करण्याची संधी फक्त या जगात आहे. येथे तुम्ही ऐहिक जीवनात पारलौकिक जीवनाचा ध्यास (परलोकध्यास) सोडून दिला आणि आयुष्यभर या जगाचाच ध्यास केला आणि आपले सर्व सामर्थ्य जगाचे फायदे कमविण्यासाठीच खर्च केले तर आयुष्याचा शेवट झाल्यानंतर स्थिती काय होईल? तिथे परलोकात तर अशा माणसाची स्थिती त्या वृद्धासारखी होईल ज्याची आयुष्यभराची कमाई आणि जीवनाचा आधार एक बगीचा होता, परंतु ठीक म्हातारपणातच ती बाग जळून खाक होते. आता तर तो वृद्ध ती बाग लावू शकत नाही. त्या वृद्धाची संततीसुद्धा आपल्या वृद्ध पित्यास मदत करण्यास असमर्थ आहे.
३०८) स्पष्ट आहे की जो स्वत: उच्च श्रेणी गुणधारक असेल तो अवगुण धारकांना पसंत करत नाही.अल्‌लाह स्वयम्‌ अतिदानशील आहे आणि आपल्या सृष्टीवर सततचा दानशीलतेचा वर्षाव करणारा आहे. अशा स्थितीत   कसे संभव आहे की त्याने तंगदृष्टी, असंयमी, धैर्यहीन आणि दुष्ट चारीत्र्याला पसंत करावे?­

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget