सा. शोधनचा ‘इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी’ हा विशेषांक वाचनीय असून सजावट मोहक अशीच आहे. जनाब एम. आय. शेख यांचे तीन तलाक लेखासंदर्भात दोन शब्द सादर आहेत. सदर लेखांत तीन तलाक हा शब्द एकाच वेळी तीन तलाक असा शब्द अपेक्षित असावा, असे वाटते. मात्र तो तसा लिहिला गेलेला आढळून येत नाही. खात्री करून जरूर तर दुरुस्ती व्हावी. शेख साहेबांचा लेख वाचण्यात आनंद येत असतो. त्यात अभ्यास असतो, सामाजिक हित केंद्रबिंदू असण्याबरोबरच जिज्ञासा आणि धाडसही असते. त्यांच्या धाडसाचे कौतुकच. असेच धाडस पेâरोजा तसबीह यांच्या लिखाणात असते. या द्वयींच्या धाडसाबाबत माझे मत यापूर्वीही व्यक्त केले आहे. कारण आज सत्य आणि धाडसाचीच वानवा अधिक. मला येथे हे नमूद करणे भाग आहे की एम. आय. शेख वा पेरोजा तसबीह यांचे लिकाणाची समीक्षा माझ्यासारख्या एखाददुसरे पुस्तक वाचणाऱ्याने करणे म्हणजे लहान तोंडी मोठा घासच. परंतु त्यामुळे ज्ञानात पडलेल्या भरीसाठी आभार!
-. ब. अ. मोडक (९९३०९८६९६४)
-. ब. अ. मोडक (९९३०९८६९६४)
Post a Comment