Halloween Costume ideas 2015

ईश्वरी आदेशानुसार जीवन व्यतीत केल्यासच मुक्ती

मुंबई (नाजीम खान) - प्रत्येक सजीवास मिळालेले जीवन त्याचे नसून अल्लाहकडून मिळालेले आहे. या भौतिक जीवनात कसे रहावे, जगावे, वागावे यासाठी अल्लाहने प्रेषितांना जगात पाठविले, त्यांच्यावर ग्रंथ अवतरण केले. हजरत मुहम्मद सल्ल. 1 लाख 40 हजार प्रेषितांमधील अंतीम प्रेषित आहेत. त्यांच्यावर दिव्य कुरआनचे अवतरण झाले. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी कुरआनच्या आदेशानुसार संपूर्ण जीवन व्यतीत केले. 1450 वर्षापूर्वी अरबस्थानात इश्वरी आदेनशानुसार जीवन जगणारा एक जीवंत समाज तयार केला. अल्लाहचे आदेश व अंतीम प्रेषित ह. मुहम्मद सल्ल. यांचे मार्गदर्शन केवळ मुस्लिमासाठी नसून, समस्त मानवजातीसाठी आहे. ईश्वरी आदेशानुसार जीवन व्यतीत केल्यासच मानवांची मुक्ती शक्य असल्याचे मत वकार अहमद अलीम यांनी येथे व्यक्त केले.
    मुंबई येथील क्रॉफर्ड जवळील बुद्धविहारात, जमाअत इस्लामी हिंद, महमंदी रोड शाखेच्या वतीने इस्लामः शांती, प्रगती, मुक्ती या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जमाअतचे महमंद रोड शाखेचे स्थानिक अध्यक्ष ताहेरअलीखान यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. बुद्धविहारचे अध्यक्ष धर्मेंद्र डी लाखन, दादा गोलसकर, अलका जाधव, स्नेहल कांबळे यांचीही विशेष उपस्थित होती. प्रारंभी बुद्धविहाराचे पदाधिकारी दिपक जाधव यांनी जमाअतच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
शोधनचे माजी निवृत्त कार्यकारी संपादक तथा व्यवस्थापक वकार अहमद अलीम म्हणाले, देशाने, जगाने आज विस्मयकारक भौतिक प्रगती साधलेली आहे. पण त्याचवेळी मानवी समाजाची नैतिक पातळी अत्यंत खालावली आहे. जगातील प्रत्येक भूभागात लढाया, खून, मारामरी, भ्रष्टाचार व गरीबांना, महिलांवर अत्याचार भेसुमार वाढला आहे. भौतिक, प्रगती बरोबरच नैतिक प्रगती नसेल तर मानवी समाज पशुहून जास्त हिंसक बनतो. माणसांना माणसांशी प्रेमाने, बंधुत्वाने जोडणारा पूल म्हणजेच धर्म होय. ईश्वराने माणसाचे लौकीक व पारलौकीक जीवनाच्या यशस्वीतेसाठी, प्रेषितांना विशेष ज्ञान देवून, जगात पाठविले, त्यांच्यावर ईश्वरी ग्रंथाचे अवतरण केले. मृत्यू अटळ असून, प्रत्येक मानवाला अंतीम जीवनातील प्रत्येक क्षणाचा (कर्माचा) हिशोब द्यावा लागणार आहे. त्यानुसार स्वर्ग आणि नरक त्याला ईश्वराकडून प्राप्त होणार आहे असे सांगून अलीम यांनी आवाहन केले की मृत्युमुळे मुक्ती मिळत नाही. तर ऐहिक जीवनात ईश्वरी आदेशानुसार वर्तन केल्यासच त्याला मुक्ती मिळणार आहे.
    यावेळी दिपक जाधव  म्हणाले, एकमेकांच्या धार्मिक संकल्पना, वैचारिक देवाण-घेवाणीमुळे गैरसमज दूर होतात, दोन वर्षापूर्वी जमाअतच्या मुहंमदअली शाखेतर्फे शांती आणि मानवता या मोहिमेअंतर्गत याच बुद्धविहारात एक सुंदर कार्यक्रम झाला होता. म्हणून बुद्धविहार पदाधिकार्यांनी आजच्या कार्यक्रमास परवानगी दिली. बंधुत्वाचे नाते निर्माण करणाचा जमाअत प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. दक्षिण मुंबई युथ विंगचे सचिव अताउल्लाहखान यांनी ’शांती, प्रगती व मुक्ती’ मोहिमेची रूपरेषा स्पष्ट करून, व्यापक जनसंवाद करण्यासाठीच आपआपसातील गैरसमज दूर करून बंधुत्वाचे नाते दृढ करण्यासाठीच ही मोहिम असल्याचे स्पष्ट केले.
    बुद्धविहाराचे ज्येष्ठ पदाधिकारी विठ्ठल जाधव म्हणाले, वैचारिक देवाण-घेवाणीमुळेच आपआपसातील गैरसमज दूर होतात. शांती, प्रगती आणि मुक्ती हे विषय केवळ एका धर्मापुरते मर्यादित नाहीत तर समस्त मानवजातीशी निगडीत असे विषय आहेत. आजच्या चर्चासत्रामुळे या संबंधी इस्लामचा दृष्टीकोण सर्वच वक्त्यांनी अतिशय उत्कटपणे सांगितल्याने, आपआपसातील संबंध दृढ होण्यास निश्चित मदत होणार असल्याचे विठ्ठल जाधव यांनी सांगितले.
    जमाअतचे मोहम्मदअली शाखेचे स्थानिक अध्यक्ष ताहीरअली खान म्हणाले, इस्लाम हा सलाम पासून तयार होतो. सलाम म्हणजे शांती. म्हणजेच इस्लामच्या नावातच शांती आहे. आज मीडियाद्वारे काही राजकीय, सामाजिक संस्था, खोडसळपणाने इस्लामला दहशतवादाशी जोडतात ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. जगातील सर्व मानव ही एकाच माता व पित्याची संतान असल्याचे कुरआन आयातींद्वारे स्पष्टीकरण देवून ताहेरअली खान म्हणाले, सर्व मानवजात आपआपसात भाऊ-बहीण आहेत. त्यांचा आपापसात रक्ताचे नाते आहे. मानवी समतेचा इस्लामचा इतका उदात्त सिद्धांत प्रेषित ह. मुहम्मद (स.) 1410 वर्षापूर्वी जगासमोर केवळ मांडलाच नाही तर प्रेम, समता व बंधुताने परिपूर्ण असा जीवंत समाज प्रेषित्वाच्या केवळ 23 वर्षात निर्माण करून, जगासमोर एक आदर्श निर्माण केला. न्यायाशिवाय सत्य, सत्याशिवाय समाजात शांती निर्माण होणार नाही, असे खान यांनी सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरात पुरूष, महिला, तरूण, तरूणींसह ज्येष्ठ नागरिकांनीही मोठी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुद्धविहारच्या पदाधिकार्यांनी अथक परिश्रम घेतले.   बामसेफचे पदाधिकारी सुनील धोत्रे यांनी उद्बोधक सुत्रसंचालन केले. यावेळी शोधनचा इस्लाम, शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी हा विशेषांक व जमाअतचे फोल्डर्स कार्यालयीन सचिव नाजीम खान यांनी वितरीत केले.
                                                                                                                                 
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget