Halloween Costume ideas 2015

अनेकत्वात अशांती तर एकत्वात शांती - डॉ. भागवत गुरूजी

चिंचवड (वकार अहमद अलीम) - शांती ही मानसिकतेमध्ये आहे तर प्रगती ही ऐहिकता आहे. मुक्ती ही अध्यात्मिकता आहे. आपले दुःख, पिडा, विकारांवर रामबाण उपचार आहे का? ज्यावेळेस आपले चित्त आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी लागते, तीच खरी शांती असते. अनेकत्वाने अशांती निर्माण होते तर एकत्वाने शांती निर्माण होते, असे भावपूर्ण उद्गार गुरूकुल विद्याभवनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भागवत गुरूजी यांनी काढले.    
    जमाअत-ए-इस्लामी हिंद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे शाहुनगर येथील धम्मचक्र विहारात मंगळवार 16 जानेवारी  रोजी सायंकाळी ’इस्लाम, शांती, प्रगती व मुक्ती’ या विषयावरील आयोजित परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जमाअत-ए-इस्लामी हिंदचे केंद्रीय प्रचार व प्रसार विभागाचे सचिव मौलाना मुहम्मद इक्बाल मुल्लासाहेब तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रनिर्माण जनपरिषद महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष पी.आर. सोनवणे उपस्थित होते. प्रास्ताविक जमाअतचे महाराष्ट्र सचिव इम्तियाज शेख यांनी केले. ते म्हणाले, मोहिमेचा उद्देश हा व्यापक प्रमाणात जनसंवादाद्वारे वैचारिक देवाण-घेवाण करणे असून, ऐहिक व पारलौकीक जीवन सकल मानवांचे सफल व्हावे असे इम्तियाज शेख यांनी सांगितले. त्यांनी मोहिमेचे स्वरूप व हेतू स्पष्ट केला.
    न्याय, समता, बंधुता तथा स्वतंत्रता हे भारतीय संविधानाचे सार असून त्याद्वारेच राष्ट्राची एकता आणि अखंडता निर्माण करण्याचे ध्येय संविधानकर्त्यांनी ठेवले होते, असे मार्मिक टिपण करू, शांती आणि मुक्तीपेक्षा प्रगती या विषयावर अधिक भर देत पी.आर सोनवणे म्हणाले, जगातील 180 देशात मानवी निर्देशांकामध्ये ह्युमन इंडेक्समध्ये भारत 131 व्या स्थानावर आहे. पहिल्या 10 स्थानावरील देशांनी मानवतेसाठी बरेच काही केले आहे तर 100 च्या वरील देशांनी मानवतेसाठी काहीच केले नसल्याची जळजळीत टिकाही सोनवणे यांनी केली. शांती, प्रगती मृत लोकांसाठी नसून ते जीवंत माणसांसाठी असल्याचेही ते म्हणाले. जगातील सुमारे साडे सात अब्ज मानवी लोकसंख्या एकाच आई-बाबाची संतान असून, त्यातील एकाचाही जन्म वा मृत्यू, व्यक्तीच्या इच्छेनुसार झालेला नाही. तर या सृष्टीचा एकमेव निर्माणकर्ता, पालनकर्ता अल्लाकडूनच जन्म व मृत्यू येत असतो. मानवाच्या सुखसोईसाठी निर्मात्याने सूर्य, चंद्र, पर्वत, ढग, पाणी, हवा, पीके, धान्य, फळे यांची निर्मिती केली. पण माणसाची निर्मिती मात्र स्वतःसाठी केली. मानवाच्या ऐहिक व पारलौकीक सफलतेसाठी ह. आदम (अ.) हे प्रथम प्रेषित तर अंतिम प्रेषित ह. मुहम्मद (सल्ल.) यांना पृथ्वीवर पाठविले. अल्लाहने प्रेषितांवर आपल्या ग्रंथाचे अवतरण केले. अंतिम प्रेषितांवर, अंतिम ग्रंथ कुरआन अवतरण करून, समस्त मानवजातीचे मार्गदर्शन केले. त्यानुसार मानवाने आचरण केल्यास शांती, प्रगती व मुक्ती शक्य आहे, असे मत जमाअतचे प्रसार व प्रचार विभागाचे सचिव मौ. इक्बाल मुल्लासाहेब यांनी अध्यक्षीय समारोप व्यक्त केले.
    यावेळी विविध समाज घटकातील महिला, पुरूष,   सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उत्कृष्ट सुत्रसंचालन अजीमोद्दीन शेख यानी केले.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget