पिंपरी चिंचवड :
‘‘ईश्वराने जगाची निर्मिती ही मानव कल्याणासाठी केली आहे, मानवाने ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत केल्यास जीवनात शांती व निस्वार्थी भावनेने कार्य केल्यास प्रगती आणि दिव्य कुरआनात दर्शविलेला मार्ग आत्मसात केल्यास मानवाची प्रगती, जीवनात शांती व वाईट विचारातून मुक्ती मिळविता येते असे प्रतिपादन जमात ए इस्लामी हिंदचे वेंâद्रीय प्रचार प्रसार विभागाचे सचिव मौलाना मुहम्मद इक्बाल मुल्ला यांनी येथील परिसंवादात केले.
जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या वतीने ‘इस्लाम : शांती विकास व मुक्तीसाठी’ या शीर्षका अंतर्गत १२ जानेवारी ते २१ जानेवारी राज्यस्तरीय मोहीम राबवित आहे. या मोहिमे अंतर्गत दिनांक १६. ०१. २०१८ रोजी जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शाखेतर्पेâ आयोजित करण्यात आलेल्या भव्य परिसंवाद मौ. मुल्ला बोलत होते.
या परिसंवादाचे आयोजन चिंचवड येथील धम्मचक्र विहार शाहू नगर येथे करण्यात आले होते. या परिसंवाद कार्यक्रमप्रसंगी प्रमुख वक्ते गुरुकुल विद्याभवनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भागवत गुरुजी, राष्ट्र निर्माण जनपरिषद महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष पी. आर. सोनवणे साहेब, जमात ए इस्लामी हिंदचे वेंâद्रीय प्रचार प्रसार विभागाचे सचिव मौलाना मुहम्मद इक्बाल मुल्ला, प्रा. शेख अब्दुल रहेमान हे उपस्थित होते. या परिसंवादात ‘इस्लाम : शांती, प्रगती व मुक्तीसाठी’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन प्रमुख वक्त्यांकडून करण्यात आले.
आध्यात्मिकतेतून, मानवाच्या विचारातून आणि आचरणातून प्रगती व शांती तसेच वाईट प्रवूत्तीतून मुक्ती कशी मिळविता येते या विषयावर गुरुकुल विद्याभवनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भागवत गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या भारताचे संविधान व संविधानाचे महत्त्व आपल्या मार्गदर्शनात राष्ट्र निर्माण जनपरिषद महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष पी. आर. सोनवणे यांनी स्पष्ट करून सांगितले.
जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट चे सचिव इम्तियाझ शेख यांनी संस्थे चे कार्य व इस्लाम, शांती ,विकास व मुक्ती साठी या शीर्षकांतर्गत १२ जानेवारी ते २१ जानेवारी राज्यस्तरीय मोहीम राबवित असलेल्या मोहिमेचे महत्व आपल्या प्रास्तावने मध्ये स्पष्ट केले शांतीशिवाय कोणाची प्रगती होत नाही. त्यामुळे समाजात शांती नांदावी, एकमेकांबद्दल आदर वाढावा, सहिष्णुता नांदावी, समाजातील प्रत्येक घटकाची प्रगती व्हावी, एकमेकांबद्दल आदरभाव, प्रेम वाढावे यासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने या मोहिमेअंतर्गत विविध महाविद्यालये, रुग्णालये, जनजागृती रॅली काढल्या जात आहेत. नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती, निराशा घालविण्याचा प्रयत्न केला जात असून द्वेषभावनेचा विनाश करण्यात येत आहे, अशी माहिती जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेचे सचिव इम्तियाझ शेख यांनी दिली.
तसेच या मोहिमेला पिंपरी-चिंचवड शहरासह देशभरात सर्वच घटकांतील नागरिकांचा, बुद्धिजीवींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे समन्वयक अजिमोद्दीन शेख यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच विविध जातीधर्माचे असंख्य नागरिक उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Post a Comment