Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)

(२६८) शैतान तुम्हाला दारिद्र्याचे भय दाखवितो व लज्जास्पद कार्यपद्धतीचे अवलंब करण्यास प्रोत्साहन देतो, परंतु अल्लाह तुम्हाला आपली क्षमा आणि कृपेची आशा देतो. अल्लाह फार उदार व विवेकशील आहे.
(२६९) तो ज्याला इच्छितो त्याला विवेक प्रदान करतो, आणि ज्याला विवेक लाभला त्याला खऱ्या अर्थी मोठी दौलत लाभली.३०९ या गोष्टीपासून केवळ तेच लोक बोध घेतात जे विवेकशील आहेत.
(२७०) तुम्ही जे काही खर्च केले असेल आणि जो काही नवस केला असेल, अल्लाहला त्याचे ज्ञान आहे आणि अत्याचाऱ्यांचा कोणीही सहाय्यक नाही.३१०     (२७१) जर तुम्ही आपले दान जाहीररीत्या द्याल तर हेदेखील चांगले आहे परंतु जर गुप्तरीत्या गरजूंना द्याल तर हे तुमच्यासाठी अधिक उत्तम आहे.३११ तुमचे बरेचसे दोष या वर्तनाने नाहीसे होतात३१२ आणि जे काही तुम्ही करता अल्लाहला सर्व परिस्थितीत त्याचे ज्ञान आहे.


३०९)     बुद्धीविवेक (हिकमत) म्हणजे खरी जाण आणि निर्णय शक्ती आहे. येथे सांगितले गेले आहे की ज्या माणसाकडे बुद्धीविवेकची संपत्ती असेल तो कधीही शैतानाने दाखविलेल्या मार्गावर चालणार नाही तर त्या खुल्या सरळमार्गाने जाईल जो मार्ग त्याला अल्लाहने दाखविला आहे. शैतानाच्या संकुचित दृष्टिकोनाच्या चेल्यांसाठी आपली संपत्ती संभाळून ठेवणे आणि प्रत्येक वेळी  जास्तच कमविण्याची त्याला चिंता लागून राहाते. परंतु ज्यानी अल्लाहकडून बुद्धीविवेकाचा गुण प्राप्त केला त्यांच्या दृष्टीने ही मुर्खता आहे. तो ओळखून असतो की आपल्या गरजापूर्ती नंतरची शिल्लक राहिलेली रक्कम स्वखुशीने आणि मन मोठेकरून भलाईच्या कामात खर्च करावी. पहिली व्यक्ती संभवत: या अल्पकालीन जीवनात दुसऱ्याच्या तुलनेत जास्त सुखसंपन्न असेल. परंतु मनुष्यासाठी हे जगातील जीवन पूर्ण जीवन नाही तर वास्तविक जीवनाचा हा एक अत्यल्प भाग आहे. या अत्यल्प भागासाठीच्या सुखसंपन्नतेसाठी जो मनुष्य शाश्वत जीवनाचा विनाश खरेदी करतो, तो तर वास्तवत: महामुर्ख आहे. बुद्धिमान व्यक्ती तोच आहे जो या अल्पशा ऐहिक जीवनाच्या संधीचे सोने करतो आणि थोड्याशाच रकमेने आपले शाश्वत जीवनाचे यश सुनिश्चित करण्याची व्यवस्था करतो.
३१०)     खर्च मग तो अल्लाहच्या मार्गात केलेला असेल की सैतानाच्या मार्गात किंवा नवस अल्लाहसाठी मागितला असेल किंवा अल्लाहव्यतिरिक्त इतरांसाठी, या दोन्ही स्थितीत अल्लाह मनुष्याच्या हेतू व मानसिकतेला आणि भावनेला चांगल्याप्रकारे जाणतो. ज्यांनी त्याच्यासाठी खर्च केला व त्याच्याचसाठी नवस केला तर ते त्याचा मोबदला प्राप्त करतील.परंतु ज्या अत्याचारींनी शैतानाच्या मार्गात खर्च केला आणि नवस मागितला, त्यांना अल्लाहचा कोप होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. "नवस' म्हणजे मनुष्य आपल्या एखाद्या इच्छापूर्तीनंतर एखादे सदाचार करण्याचा संकल्प करतो. जे करणे त्याला अनिवार्य नसते. ही इच्छा हलाल (वैध) असेल आणि अल्लाहजवळ इच्छापूर्त मागितली  असेल  आणि  इच्छापूर्तनंतर  मनुष्याने  प्रण  करण्याचा  निश्चय  केलेला  असतो  तो  फक्त  अल्लाहसाठीच असतो. अशाप्रकारचेच (प्रण) नवस अल्लाहसाठी आणि अल्लाहच्या आज्ञापालनसाठी असते. याचे पूर्ण करणे पुण्यकर्म ठरते. जर असे नसेल तर असे नवस करणे अपराध आहे आणि त्याचे पूर्ण करणे हे कोप होण्यास कारणीभूत ठरते.
३११)     जो सदका (दान पुण्य) अनिवार्य असेल त्याचे जाहीररीत्या देणे योग्य आणि उत्तम आहे. आणि जो सदका देणे अनिवार्य नाही त्याला प्रकट न करणे अधिक चांगले आहे. हाच नियम सर्व कर्मांसाठी लागू आहे. अनिवार्य (फर्ज) कार्यास जाहीररीत्या करणे उत्तम आहे आणि अनिवार्य नसलेले (नफील) प्रकट न करता करणे अधिक चांगले आहे.
३१२)     अप्रकटरीत्या एखादे सदाचार करण्याने मनुष्याच्या मनात आणि चारित्र्यायात सुधार येत राहातो. त्याचे चांगले गुण अधिक वृद्धीगंत होतात आणि अवगुण नष्ट होत जातात. हेच कार्य त्याला अल्लाहजवळ इतके प्रिय बनवते की त्याच्या कर्मनोंदीतील लहानसहान अपराधांना माफ केले जाते. अल्लाह माणसाच्या या गुणविशेषांकडे पाहूनच त्याला माफ करतो.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget