Halloween Costume ideas 2015

बाल लैंगिक अत्याचाराकडे डोळसपणे बघण्याची गरज

- शेख फातेमा बशीर (मुंब्रा)
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या कसूर परिसरात एका जैनब नावाच्या 7 वर्षाच्या गोंडस चिमुकलीवर अत्याचार करून तिला ठार करण्यात आले़  ही घटना मानवतेला लाजविणारी घटना आहे. तीसरी वर्गात शिकणारी ही मुलगी मक्तबमध्ये कुरआन शिकण्यासाठी घरातून निघते आणि तीन दिवसानंतर तीचे प्रेत एका कचराकुंडीत सापडते़  तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे लक्षात येते. विकृत माणसाच्या वासनेने या मुलीचे प्राण घेतले. ही अशा प्रकारची अपवादात्मक घटना नाही तर कसूरच्या आसपासच्या परिसरात अशाच एकूण 8 मुलींचे बळी गेल्याचे लक्षात आले. या संदर्भात महत् प्रयासाने दोन लोकांना अटक करण्यात आली त्यापैकी एकाचे डीएनए या मुलींशी जुळले आणि त्याच्यावर दहशतवाद विरोधी कोर्टामध्ये खटला सुरू झाला. यातील आरोपी चाईल्ड पॉर्नोग्राफी (बाल लैंगिक चित्रफिती) पाहण्याच्या सवयीचा होता,असे समोर आले आहे आहे. ही आपल्या शेजारच्या देशातील घटना म्हणून दुर्लक्ष करण्यासारखी परिस्थिती नाही.
    आज आपण आपल्या देशांतर्गत परिस्थितीकडे पाहिले तर असे लक्षात येईल की शाळा, कार्यालये आणि घर देखील सुरक्षित नाही़  आपल्या देशातही बलात्कार आणि लैंगिक शोषण एक नित्यनिमाणे घडणार्या घटना बनल्या आहेत. लैंगिक शोषण, अपमानास्पद वागणूक, बालिकांशी क्रुरतेचे अपमानास्पद खेळ मानवतेला विनाशाच्या जवळ आणून ठेवलेले आहे़ 
    नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या जानेवारीत  महिला अत्याचारांची 147 प्रकरणे नोंदविली गेली होती़  याच्या पलीकडे जावून पाहता आपल्या देशात दररोज 92 महिलांवर बलात्कार होतो आणि आपली राजधानी दिल्लीत दररोज अशा सहा प्रकरणांची नोंद होते़  2017 मध्ये महिला अत्याचारांच्या 11 घटना अशा घडल्या, ज्यामध्ये नातेवाईक आणि मित्र सहभागी होते़  आज लैंगिक अत्याचारांच्या बाबतीत लहान मुलींपासून 60 वर्षाच्या वृद्धेपर्यंत कोणीही वासनांध लोकांच्या हल्ल्याला बळी पडत आहेत.          
    आज आम्ही पाहतो बलात्कारासारख्या गंभीर गुन्हा करणारा व्यक्ती उघडपणे फिरत आहेत़  त्याचा परिणाम असा होत आहे की, आणखी कोणती तरी स्त्री त्यांच्या वासनेला बळी पडत आहे. बलात्कार पीडित मुलींचे जीवन किती कठीण असते हे अनेक पीडित मुलींनी केलेल्या आत्महत्यांवरून लक्षात येईल. अनेकवेळा तर पुरूष स्वतःच बलात्कारानंतर पीडितेला मारून टाकतात. आश्चर्य म्हणजे जे पुरूष स्त्रीच्या शरीराशी खेळत असतात ते हे सत्य विसरून जातात की आपणसुद्धा एका स्त्रीच्या शरीरातूनच जन्म घेतलेला आहे.
    निरागस जैनबसाठी सगळ्याकडून हेच बोलण्यात येत आहे की, तिच्यावर अत्याचार करणार्या गुन्हेगाराला फाशी किंवा वेदनादायक शिक्षा देण्यात यावी. जर प्रत्येक देशाला स्त्रीयांवरील अत्याचार दूर करावयाचा असेल तर इस्लामिक कायद्यानुसार गुन्हेगारांना शिक्षा देण्याची पद्धत सुरू करावी.  तरच जैनब सारख्या चिमुकलीचे जीवन आणि निर्भयासारख्या मुलीचे जीवन वाचवू शकू. इस्लाममध्ये स्त्री विरोधी गुन्ह्यांना अत्यंत जबर शिक्षेची तरतूद आहे. ज्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसू शकेल. अशा शिक्षा दिल्या गेल्या तरच अपप्रवृत्तीचे लोक स्त्रीयांवर हात टाकण्यापूर्वी हजार वेळेस विचार करतील. स्त्रीयांची छेडछाड केल्यास सार्वजनिक ठिकाणी फटके मारण्याची व बलात्कार केल्यास सार्वजनिक ठिकाणी संगसार करण्याची अर्थात दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा इस्लाम सुचवितो. यामागे  कुठलीही क्रुरता नाही तर एक विचार आहे. तो विचार काय आहे हे समजून घेण्यासाठी शरियतमध्ये दिलेल्या इस्लामी शिक्षेच्या तरतुदींचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.    
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget