सीमा देशपांडे
7798981535
लील बोधकथा ही एका विचारवंताने लिहिलेली आहे त्यांचे नाव डॉ. विन डायर आहे. ही कथा अतिशय मनोरंजक व आपल्या अप्रत्यक्ष व सर्जनशील दृष्टिकोणातील विचारांना उत्तेजीत करणारी आहे व आपल्या नैसर्गिक अंतरंग भावनांचा बोध करुन देणारी आहे. ही कथा प्रत्येकासाठी एक आश्चर्यकारक बोध आहे. खासकरुन त्या लोकांसाठी जे एका ईश्वरावर विश्वास ठेवतात आणि त्या लोकांसाठी पण जे एका ईश्वरावर विश्वास ठेवत नाहीत. डॉ. विन डायर ह्यांनी एक सुंदर उदाहरण मांडले आहे जे मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाला सादर करते.
उदाहरण- एका मातेच्या पोटात दोन जुळे मुले असतात
पहिल्याने विचारले: काय तुझा प्रसवनंतरच्या जीवनावर विश्वास आहे का?
दुसरा म्हणाला: असे का विचारतोस? मला वाटते,प्रसवनंतर नक्कीच काहीतरी असावे. कदाचीत आपला जन्म एक परिक्षा देण्यासाठी तयार झाला असावा व त्यासाठी आपण इथे आलो असू.
पहिला म्हणाला: तुझे बोल तर मला अगदी मुर्खपणाचे व व्हाय्यात वाटतात.
दुसरा म्हणाला: मला माहित नाही परंतु माझे अंतर्मन मला वारंवार हिच जाणिव करुन देत आहे कि, आपल्या पुढील जन्मात इथल्यापेक्षा जास्त प्रकाश असेल. कदाचित आपण आपल्या हाताने जेवू, स्वत:च्या पायावर चालू. याविषयी आपल्याला इथे काही संवेदना असतील ज्या आपल्याला आत्ता कळत नसाव्यात किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करत असू.
पहिला म्हणाला: तुझे हे विचार अगदी अर्थहीन आहेत. पायावर चालणे अशक्य आहे आणि मुखाने खाणे तर अगदी हास्यास्पद आहे! एकिकडे पाहिल्यास गर्भाशयात आपणास नाभीद्वारे पोषण पुरविले जाते आणि दुसरीकडून पाहिल्यास नाभीची लांबी लहान असते. म्हणजेच डिलिवरी नंतरचे आयुष्य तार्किकद्रष्ट्या वगळलेले बरे आणि ते अशक्यच आहे.
दुसरा फार आग्रहाने म्हणाला: मला वाटते, काहितरी जरुर आहे. पुढचे आयुष्य आपण जे अनुभवतोय त्यापेक्षा खूप-खूप वेगऴे असावे आणि त्यावेळेस आपल्याला आईच्या नाभीची आवश्यकता पण नसावी.
पहिला हसत म्हणाला : मुर्खपणा! डिलिवरीनंतर जर पुन्हा आयुष्य असेल तर आजपर्यंत जे मृत्यु पावले ते पुन्हा का या धरतीवर परत नाही आले? डिलिवरी नंतरचे आयुष्य हे आपले अंतिम जीवन आहे. उलट, डिलिवरी नंतर काही नसतं, फक्त काळोख व शांतता असते आणि त्यानंतर जीवन शुन्य होवुन जाते. अशा रितीने आपण कुठेही जात नाही.
दुसरा म्हणाला: - मला माहित नाही पण निश्चितपणे ईश्वर आपली व आपल्या आईची काळजी घेईल आणि अखेरिस आपल्याला त्याच्याकडेच परत जायचे आहे.
पहिला म्हणाला: आई? काय तू वास्तविकपणे विश्वास ठेवतोस कि तू पुन्हा आईला भेटशील? तो हसत म्हणाला जर आईचे अस्तित्व असेन तर ती कुठे आहे ? त्याचप्रमाणे ईश्वर कुठे आहे? जेणेकरुन तो आपणा सर्वांची पुन्हा भेट घालेन.
दुसरा म्हणाला: ईश्वर आपल्यामध्ये नाही तर आपल्याभोवती सर्वत्र आहे. त्याचा घेरा आपल्या चोहिकडे आहे. त्याच्याशिवाय आपले व या अथांग विश्वाचे अस्तित्व शुन्य आहे.
पहिला म्हणाला: मला तर असे कधीच दिसले नाही म्हणून हे तर्कसंगत आहे व त्याचे अस्तित्व कुठेही नाही.
दुसरा म्हणाला: कधीकधी जेव्हा तु एकांतात असशील तेव्हा एकदा तुझ्या सभोवतालच्या निसर्गाकडे व खुद स्वत:कडे नजर टाक आणि पहा. रात्र-दिवस याचे प्रबोधन, असंख्य ताऱ्यांनी भरलेले सुंदर आकाश, सूर्य ,चंद्र यांचे कार्य, विशिष्ट प्रमाणात पावसाची निर्मिती, झाडे, प्राणी, पशु, कृमी-किटक याची निर्मिती आणि मानवाची निर्मिती अजुन बरेच काही. काय हे मनुष्य सर्व निर्माण करु शकतो का? हे सूर्य ,चंद्र, तारे व सर्व निसर्ग ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे स्वत:चे काम शांतपणे पार पाडतात? मग काय मनुष्य ईश्वराच्या आज्ञेचे पालन करत आहे का? कारण जर हि सृष्टी असली असती व मनुष्य नसला असता तरिही या सृष्टीला काहिही फरक पडला नसता पण जर मनुष्य धरतीवर असला असता आणि हि सृष्टीही नसली असती तर तो जगु शकला असता का? जसे, हवा नसली असती तर तो श्वास घेवु शकला असता? तहानलेला मनुष्याला पाणी मिळाले नाही तर त्याचा जीव कासाविस होतो मग पाऊस पडला नसता तर त्याची तहान भागली असती का?, ही झाडे, प्राणी निर्माण केले नसते तर मनुष्य त्याच्या पोटाची भूक स्वत: भागवू शकला असता का? नाही ना ! कारण ईश्वराने ही सृष्टि मनुष्याच्या उपभोगण्यासाठी निर्माण केली आहे. मग मनुष्य त्याच्या निर्मात्याचा आज्ञाधारक बनला पाहिजे का त्याच्या निर्मितीचा? कदाचित मनुष्य सत्याकडे दुर्लक्ष करत आहे कारण ते अदृश्य आहे आणि असत्याकडे लक्ष केंद्रित करत आहे कारण ते दृष्टीत आहे.
जसे एकदा पाच मित्र सहलीला अगदी उत्साहाने निघतात मात्र अचानकपणे टिव्हीवरुन एक बातमी ऐकायला मिळते की त्यांच्या सहलीला जाणाऱ्या मार्गाने लागणारा पुल कोसळण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे त्या रस्त्यावरुन जाणे घातक आहे. ही बातमी ऐकताच त्यातील काही मित्र सहलीला जाण्याचा बेत रद्द करतात. मात्र त्यातील काही मित्र सहलीला जाण्याचा निर्णय घेतात कारण त्यांचे मत असते कि ही बातमी बनावट असू शकते आणि तसेपण पुलाची स्थिती आपण डोळ्याने थोडीना पाहीली आहे जेणेकरुन त्याच्यावर आपण विश्वास ठेवू. अश्या दृष्टीहीन बातमीवर विश्वास ठेवने मुर्खपणाचे लक्षण आहे. असे म्हणून त्यातील काही मित्र त्या मार्गाने जाण्याचे धाडस करतात. अचानकपणे दोन तासांनी एक बातमी कानावर पडते की त्या पुलावरुन जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात दोन तरुण मुले जखमी झाले व ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत आहे. ते दुसरे-तिसरे कोणी नसून तीच मुले होती ज्याना या बातमीची पुर्वसुचना त्यांना मिळाली असतानाही त्यावर विश्वास न ठेवता स्वत:चा शहानपणा केल्याची ही शिक्षा ते भोगत आहेत. आज त्या मुलांचे शरीर पुर्ववत होवु शकते का? किवा कोणते अवतार त्याला पुर्ववत करण्याचे धाडस करु शकते का?..जर आपण हिच बातमी माकडाला दिली असती वा नाही दिली असती तरी त्याने त्या पुलाच्या मार्गाने जाण्याचे धाडस केलेच असते पण आपण ह्याचे कारण सहजपणे समजू शकतो ईश्वराने त्याला हे समजण्याची क्षमता दिलीच नाही आहे कि काय चुक व काय बरोबर आहे. मात्र हि क्षमता मनुष्याला नक्कीच बहाल केली आहे. पण.
आज माणसाची स्थिती माकडासारखीच झालेली आहे त्याला म्हंटले की, तुम्हा-आम्हा सर्वांचा निर्माता एकच आहे. त्याच्याच मार्गाने जीवन व्यतित करा, कारण हे पृथ्वीवरील जीवन क्षणभंगुर आहे. खरे जीवन मृत्युनंतर आहे जे अथांग आहे. तेथे एकिकडे ह्या ऐहिक जीवनापेक्षा सुंदर जीवन आहे आणि दुसरीकडे अत्यंत ज्वालामुखीने भरलेले यातनामय ठिकाण आहे. स्वत:ला नरकाग्नीपासुन वाचव. अशी अदृश्य सत्याची पुर्वसुचना दिल्यास असंख्य लोक तुझ्यासारखे (पहिल्या मुलासारखे) विचार करतात !, जोपर्यंत आम्ही आमच्या डोळ्याने शारिरिकदृष्ट्या ईश्वराला पाहत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बनावट बातमीवर विश्वास का ठेवायचा? आम्ही काय मुर्ख आहोत का? ह्यांची स्थिती त्या मुलासारखी होवू नये जे अदृश्य सत्याला बनावट मानत होते व त्यांना कायमची शिक्षा भोगावी लागेन जिथुन त्यांना पुर्ववत होणे अशक्य असेन. तसेच काही लोक या संभ्रमात आहेत कि ईश्वर आपल्यामधेच आहे ..असे असले असते तर मनुष्याचा जन्म-मृत्यु त्याच्या हातात का नाही? असा विचार केला असता हा संभ्रम अर्थहीन वाटतो. तसेच, आजही काही तुरळक लोक अदृश्य सत्य मान्य करतात कारण ते ईश्वराने त्यांना प्रदान कलेल्या विवेकबुद्धिचा वापर करतात. जागरुक बुद्धी व संवेदनशील अंत:करण ज्या मनुष्यात असेल ते ह्या सृष्टीचे चिन्ह व मनुष्याचा जन्म व मृत्युचा खरा हेतू या अदृश्य सत्येवर सडेतोर उत्तर देते की आपणा सर्वांचा ईश्वर/निर्माता एकच आहे व त्याच्या आज्ञेचे पालन करुन कर्म करायचे आहे. शेवटी आपल्याला त्याच्याकडे परत जायचे आहे आणि स्वत:ला नरकाग्नीपासून वाचवायचे आहे. जे लोक या सत्याचा स्विकार करत नाहित ते स्वत:हून त्यांचे पुढील आयुष्य नरकात जाण्यास आमंत्रण देत आहेत. शेवटी पहिले मुल निरुत्तर झाले. कदाचित त्याच्या अहंकाराने त्याला निरुत्तर केले असावे पन त्याचे अंत:करणाने त्याला नक्कीच विचार करायला भाग पाडले असावे.
मित्रांनो! जरी ही एक बोधकथा असली तरी ती आपल्याला खऱ्या अदृश्य सत्याची आठवण करुन देत आहे. माझी तुम्हाला कळकऴीची विनंती आहे, आजही वेळ गेली नाही कृपा करुन सत्याचा स्विकार करा व स्वत: ला नरकापासून वाचवा. ईश्वर आपल्या सर्वांना हे सत्य स्विकारण्याची सदबुद्धी देवो! आमीन.

Post a Comment