Halloween Costume ideas 2015

गुन्हा घडण्यासाठी मनुष्य नाही त्याची मानसिकता जवाबदार -मनोज पाटील

भिवंडी-
समाजात घडणाऱ्या कुठल्याही गुन्ह्यासाठी माणूस कधीच जवाबदार नसतो, तर गुन्हा घडण्यामागे त्याची त्या वेळेची मानसिकता जवाबदार असते. गुन्हा घडला म्हणून एखाद्या माणसाला किंवा समाजाला जवाबदार धरणे चुकीचे आहे, असे मत जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या ‘शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी इस्लाम' या अभियाना दरम्यान भिवंडीत आयोजित कार्यक्रमात मनोज पाटील (डीसीपी, भिवंडी) यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला कुरआनचे पठण करून त्याचा अनुवाद सादर करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी आणि इतर समाजबांधवांना त्याचा अर्थ समजावून सांगण्यात आला. भिवंडीत एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७० टक्के लोक मुस्लिम असून ते विविध प्रांतांतील आहेत. तसेच हे शहर संवेदनशील मानले जाते. त्यामुळे या कार्यक्रमाला सतर्कतेच्या दृष्टीने प्रशासनाचे बारीक लक्ष होते. मात्र जेव्हा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश सांगण्यास सुरूवात झाली त्या वेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला!
या वेळी कार्यक्रमासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तौफीक असलम उपस्थित होते. त्यांनी या वेळी जमाअतचे कार्य, अभियानाचे महत्त्व आणि जमाअतच्या काही सामाजिक कार्यांची माहिती दिली.
जमाअतच्या कार्यकत्र्यांनी भिवंडीचे डीसीपी मनोज पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली त्या वेळी त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की अशा कर्यक्रमांनी एकसंघ देशाची निर्मिती होईल. आपला देश आहे एकसंघ आहे, मात्र काही समाजकंटकांमुळे त्याला गाळबोट लागते. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आहेत. मात्र अशा कार्यक्रमांमुळे समाजातील ऐक्य कायम राहून पोलिसांनादेखील मदत होणार आहे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget