Halloween Costume ideas 2015

आता आम्ही आत्महत्या करणार नाही

- मझहर फारूकी (मुंबई)
मुंबईतील निराधार आणि सरकारी योजनेचे लाभार्थी वृद्ध जोडपे श्री नारायण लवाटे (88)आणि श्रीमती लवाटे (78) यांनी जीवनाला कंटाळून 21 डिसेंबर 2017 रोजी राष्ट्रपतींना आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी यासाठी अर्ज केला आहे.यावर जमाअते इस्लामीचे महाराष्ट्र अध्यक्ष तौफिक असलम खान यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली व मानवी जीवनाच्या मुल्याचे महत्व पटविले. ते म्हणाले की, तुम्ही आत्महत्या का करु इच्छित आहात? हे विचारल्यावर लवाटे यांनी सांगितले की, माझे वय 88 वर्ष आहे. आम्हाला संतान नाही आणि माझे भाऊबंद पण हयात नाहीत.आम्ही एकटेच आहोत.अशा परिस्थितीत न आम्ही समाजासाठी उपयोगी आहोत आणि न आजचा  समाज आमच्यासाठी उपयोगी आहे. आता आम्ही फक्त एक ओझे आहोत.एखादे आजारपण आले तर कोण आम्हांला बघणार? यापेक्षा चांगले कि आपले जीवन स्वतः संपवून टाकावे”
    इंजिनियर तौफिक असलम यांनी त्यांना समजवले कि जीवन व मृत्यू तर अल्लाह / ईश्वर निश्चित करतो.आपण कितीही प्रयत्न केले तरी त्या मृत्यू क्षणापूर्वी मृत्यू मिळणार नाही.मृत्यूनंतर अनंत जीवन आहे जे आपल्या कर्मानुसार मिळणार आहे. आदरपूर्वक ते लवाटेंना म्हणाले, तुमचे जर कोण नाही तर काय झाले? तुम्ही माझे मोठे भाऊ समजून इच्छा असेल तर माझ्या घरी चला. मी तुम्हा दोघांना मृत्यूपर्यंत सांभाळतो. आणि जर इथेच राहू इच्छित असाल तर आम्ही तुमची भेट घेत राहू.  अल्लाह न करो कि तुम्ही आजारी पडो. पण जर  झालात तर आम्ही तुमचा इलाज आम्ही करू, तुम्ही काळजी करू नका आणि आत्महत्या करण्याचा इरादा सोडून द्या. जोपर्यंत अल्लाहने जीवन दिले आनंदाने जगा.
   त्या वृद्धांनी आश्चर्याने विचारले,तुम्ही माझी का सेवा करणार? तुम्हाला त्यापासून काय मिळणार? त्यावर इंजिनियर तौफिक असलम म्हणाले की, अंतिम पैगंबर मुहम्मद (स) यांची शिकवण आहे कि कोणीही माणूस संकटात असेल तर त्याची मदत करा. इतरांचे सुख-दुखः वाटून घ्या. हे आमचे कर्तव्य आहे आणि हे पुण्य आम्हाला जन्नतमधील सुखी अनंत जीवन  प्राप्त करण्यासाठी मदत करील. श्री नारायण लवाटे या भेटीने प्रभावित झाले.म्हणाले कि, सर्वांना माहीत आहे कि मी राष्ट्रपतींकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. पण कोणीही यापूर्वी मला जीवन व मृत्यूची वास्तविकता समजवून सांगितलेली नाही. तसेच जगण्यासाठी प्रेरित केले नाही. अनेक जण भेटीसाठी येतात आणि आत्महत्याचे कारण विचारून निघून जातात.पण आता मी तुम्हाला आश्वासन देतो कि, मी आत्महत्या करणार नाही आणि जोपर्यंत जगणे नशिबी आहे पूर्ण जगूनच मरणार. शेवटी लवाटे यांना शिष्टमंडळाने वाचणासाठी  अनेक पुस्तके, अडी अडचणीच्या काळात संपर्कासाठी फोन नंबर आणि सोबत आणलेली मिठाई व फळे देऊन त्यांच्याकडे निघण्याची परवानगी घेवून आम्ही सुखी मनाने परतलो.  (मजहर फारूकी हे शिष्टमंडळातील एक सदस्य होते.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget