जगात विविध राष्ट्रे, विविध देश असले तरी जगातल्या सर्व राष्ट्रांचे शासक आणि प्रशासकवर्ग एकच प्रकारचा असतो. जनतेला स्वातंत्र्याचे आमिष दाखवून किंवा विकास, प्रगती, आर्थिक सुबत्ता वगैरे निरनिराळी स्वप्ने दाखवून हे शासक सत्तेवर काबिज होतात आणि आपल्या सेवेसाठी प्रशासकांची भलीमोठी शक्ती उभारतात. जनतेला वाटते ते आपल्या सोयीसाठी – सेवेसाठी काम करत आहेत, पण वास्तविकता वेगळीच असते. कालांतराने सारे शासक शेवटी हिटलर बनतात आणि सारे प्रशासक जनरल डायर बनतात. अंततः दोन्ही वर्ग देशातील श्रीमंतांचे उद्योगपतींचे दलाल बनतात. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काही भाग घेतलेला नसतो, असे लोक आणि ज्यांनी रक्ताचा एक थेंबसुद्धा देशाच्या हितासाठी सांडलेला नसतो ते आपल्या प्रजेचे रक्त सांडत असतात. यासाठी त्यांना मदत होते त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि ज्या वर्गाने देशाच्या कोणत्याही आपत्तीत, स्वातंत्र्य लढ्यात जनतेच्या कल्याणासाठी आपल्या श्रीमंतीचा एक रुपयाही खर्च करत नाहीत ते देशाच्या असीम संपत्तीवर ताबा मिळवतात आणि आपल्या दलालवर्गाला वेळोवेळी त्यांच्या देशवासीयांची म्हणजे जनतेच्या संपत्तीची लूट करण्यात जनतेवर गरीबीचे ओझे टाकण्यात, त्यांची मालमत्ता, शेतजमिनी सर्वकाहींच पट्टा स्वतःच्या नावावर करून घेतात.
जनरल डायर आणि हिटलरचे व्यक्तित्व जर बदलत असेल तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काहीच फरक पडत नाही. त्यांचे कार्य लोकांचे रक्त सांडणे, त्यांच्यावर गोळीबार करणे, त्यांना आल्या घरातच नव्हे तर आपल्या समस्यांमध्ये गुरफटून ठेवण्यासाठी रोज नवनवीन योजना आखतात. जगात याची अनेक उदाहरणे आहेत. फ्रेंच क्रांती घडवून आणली गेली होती, तिथल्या गोरगरीब जनतेने ज्यांना प्रोसिटारिएट म्हटले जात होते, एका फ्रान्समध्ये ती क्रांती घडवून आणली तेव्हापासून साम्राज्यवादाने त्यावर आपला पूर्ण ताबा मिळवला. ज्यांच्यासाठी ही क्रांती घडवण्यात आली होती तो गरीबवर्ग नंतर आजपर्यंत दिसला नाही. शासनदरबारी नवनवीन शासक आणि त्यांच्या सेवेला प्रशासक विराजमान झाले, हेच रशियन क्रांतीचे झाले. तेच चायनामधील सांस्कृतिक रिव्हॉल्युशनचे झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या भारतीयांना जालियनवाला बागमध्ये त्यांच्यावर ज्याने फायरिंग केली होती त्या जनरल डायरसारखा एक प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांवर लाठ्यांचा मारा करण्याचा आदेश देतो आणि आपल्या सहकाऱ्यांना म्हणतो की कुणीही या रेषेबाहेर येईल तो त्याच्या डोक्यातले रक्त न वाहता येऊ नये याची पुरेपूर खात्री करून घ्या. त्याचे नाव काहीही असो, त्याची वृत्ती जनरल डायरचीच! म्हणून सगळे एकाच जातीचे. ते आपल्या शासकाला म्हणजेच रूलर्सना खूश करण्यासाठी जनतेचे रक्त सांडतात आणि शासकांना याचे समाधान वाटते की आपला प्रशासकवर्ग उत्तम कामगिरी करत आहे. आणि दूरवर बसून देशाचे लुटारू धनदांडगे आपल्या दलालांच्या निष्ठेवर समाधान मानत असतात. देशातील शेतकरी गेल्या नऊ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, पण शासनाला त्या आंदोलक शेतकऱ्यांच्या अस्तित्वाशी काही देणे घेणे नाही, ज्या प्रकारे त्यांनी दिल्लीच्या हद्दीत जाऊ नये यासाठी सडकेवर खिळे ठोकले होते, निरनिराळे अडथळे उभे केले होते, जसा त्यांचा अटकाव करण्यात आला, यात जवळपास ६०० शेतकऱ्यांचे प्राणही गेले, पण सरकारला काहीच वाटले नाही. शेवटी एका डायरने त्यांची डोकी फोडली, रक्त सांडले तरी शासनाला काही वाटले नाही.
- सय्यद इफ्तिखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment