नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचा कहर सुरूच आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारतात मृत्यूचे तांडव निर्माण केले होते. दुसरी लाट थोडी संथ होत नाही तर आता डेंग्यूने नागपूर जिल्हा गाठल्याचे दिसून येते.शहराप्रमाणेच नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही डेंग्यूने आपले जाळे निर्माण केले आहे. यामुळे विविध तालुक्यांत डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत, ही बाब आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे.
नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी सर्वाधिक म्हणजे 203 रूग्णांची नोंद एकट्या कुही तालुक्यात झाली आहे. हा आकडा अत्यंत गंभीर व धक्कादायक आहे.आतापर्यंत डेंग्यूच्या आजाराने तिघांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनाची दुसरी लाट संपल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच शहर आणि ग्रामीण परिसरात डेंग्यूच्या डंखाने नागरिकांना धास्तावून सोडले आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये शहरातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण दाखल होत आहेत,तर अनेक रूग्न घरीच उपचार घेऊन बरेही होत आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत डेंग्यूचे 790 रूग्ण आढळून आले आहेत.31 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात पुन्हा 54 नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली.अशा परीस्थितीत महानगरपालिकेनेही डेंग्यू निर्मूलनासाठी मोहीम उघडली आहे.याचे मी स्वागत करतो.परंतु डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने व प्रशासनाने युध्दपातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी स्वच्छतेकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे.
प्रशासन व नागरिक यांनी एकत्र येऊन डेंग्यूवर मात करण्यासाठी उपाययोजना आखल्या तर डेंग्यूवर मात करण्यास आपल्याला अवश्य यश प्राप्त होईल. पावसाच्या पाण्याने जे डबके तयार होतात यातही डेंग्यूचे मच्छर राहू शकतात याला नाकारता येत नाही.त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगुन स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे.कारण नागपूरसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी पाण्याचे डबके, सांडपाणी, टायरमधील पाणी किंवा अन्य जमा असलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूचे मच्छर राहु शकतात याला नाकारता येत नाही.त्यामुळे सर्वांनीच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. -(उर्वरित आतील पान 7 वर)
नागपूरसाठी सांगायचे झाले तर नागपूर मनपामध्ये 151 नगरसेवक आहेत. प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या वार्डात किंवा प्रभागात फेरफटका मारून जंतुनाशकाची फवारणी करावी व घरोघरी जाऊन डेंग्यूपासुन बचाव करण्यासाठी ताबडतोब मोहीम आखली पाहिजे व स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. आरोग्यविभाग आपल्या पध्दतीने कार्य करीत आहे. परंतु नगरसेवकांचे प्रथम कर्तव्य बनते की नागरिकांची सेवा करने. याअंतर्गत नगरसेवकांनी घरोघरी जाऊन डेंग्यूचा होणारा प्रादुर्भाव ताबडतोब रोखण्यासाठी व पाऊल उचलण्यासाठी प्रशासनाला योग्य ती मदत केली पाहिजे.नागरिकांनी सुध्दा लक्षात ठेवले पाहिजे की डेंग्यूच्या अळ्यां आढळल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवीने गरजेचे आहे.कारण अनेक तालुक्यांत व जिल्हयामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे, ही गंभीर बाब आहे. याकरीता प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी गांर्भियाने दखल घेऊन डेंग्यूच्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी युध्दपातळीवर मोहीम राबवली पाहिजे.
त्याचप्रमाणे नागरिकांनी सुध्दा सतर्क राहून स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर सर्वांनीच स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे.सध्याच्या परिस्थितीत हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया,चिकन गुनिया त्याचबरोबर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढु शकतो.त्यामुळे नागरिकांनी व नगरसेवकानी स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.सोलापूर जिल्ह्यात सुध्दा डेंग्यूने आनखीनच ताप वाढवीला आहे. कोरोनाचे रूग्ण कमी झाले असले तरी सोलापूर सह अनेक जिल्ह्यांत साथींच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.असेही सांगण्यात येते की सोलापूर जिल्ह्यात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या जवळपास चौपटीने वाढल्याचे सांगण्यात येतेय ही बाब अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात करोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याची भीतीसुध्दा व्यक्त केली जात आहे.याचा धोका लहान मुलांना असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्या आधीच डेंग्यूने आपले थैमान घालुन महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हादरवीले आहे. यवतमाळात सुध्दा डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. शासकीय रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा कोलमडली, कामठीमध्ये सुध्दा डेंग्यूचे थैमान दिसून आले. अशाप्रकारे संपूर्ण महाराष्ट्राला डेंग्यूने पुर्णतः वेढल्याचे दिसून येते.त्यामुळे राज्यातील संपूर्ण नागरिकांना विनंती करतो की स्वच्छतेकडे लक्ष देवून चिमुकल्यांची जातीने काळजी घ्यावी.कारण डेंग्यूसारखा वैरी व करोना सारखा राक्षस आपल्या दारात येऊन ठेपला आहे.त्यामुळे लहान-मोठ्यांनी आपली व आपल्या परिवाराची जातीने काळजी घेवून यावर मात करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. यात कोणीही ढील देवू नये. त्याचप्रमाणे कडुनिंबाच्या पाणांचा धुळ केल्याने मच्छरावर आपल्याला अंकुश लावता येतो. कारण कडुनिंबाचा पाला हा जंतू नाशक आहे.
डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसतात जवळच्या डॉ्नटरांना दाखवून घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत कुठलाही आजार अंगावर काढणे परवडणारे नाही. ते जीवघेणेही ठरू शकते. त्यामुळे स्वच्छता पाळा, वेळीच उपाययोजना करने गरजेचे आहे.
- रमेश कृष्णराव लंजेवार
नागपूर - 9921690779
Post a Comment