जेव्हा एक व्यक्ती जन्माला येते तेव्हा तिचा संबंध आपल्या अवतीभवती पसरलेल्या अनेकविध सजीव आणि निर्जीव निसर्गाशी येतो. या निसर्गाशी त्याचे नाते काय? कोणशी कसे वागायचे? सजीवांमध्ये इतर प्राणीमात्रांबरोबरच त्याच्या नातलगांशी त्या व्यक्तीचा संबंध येतो. लहान असताना त्याला कशाची काहीही माहिती नसते. जसजशी ती व्यक्ती मोठी होत जाते तिच्या जवळच्या व्यक्तींशी तिचा अधिक संबंध येत असत्याने तिची त्यांच्याबरोबर बांधिलकी निर्माण होते. आपल्या जवळच्या व्यक्तींशी कोण कशा प्रकारे वागतो. प्रेम भावना काय याचे भान जरी नसले तरी त्या भावनांशी तिचा दिवसेंदिवस संपर्क येत असतो आणि तिला कळायला सुरुवात होते. तिच्या अत्यंत जवळजी माणसे काळजी घेत असतात. तिला अन्नपाण्याची गरज असते तेव्हा त्याची पूर्तता करण्यास एक व्यक्ती सदैव तिच्या जवळ असते. इथूनच तिला मातेच्या प्रेमळ आणि संवेदनशील भावना कळायला लागतात. अशा तऱ्हेने ती जसजशी मोठी होते तसतसे इतर अनेक माणसांशी तिचा संबंध येत जातो. अशा प्रकारे आपण एका समूहाचे व्यक्ती आहोत, आपल्या चहूबाजूला पसरलेल्या व्यक्तींशी तिचे वेगवेगळे संबंध आहेत. हे संबंध ही नाती त्या व्यक्तीला जपावी लागतील, याचे तिला भान असते. कशा प्रकारे ही नाती जपायची या प्रश्नाचे उत्तर तिला त्या संस्कृतीत मिळतात ज्या संस्कृतीत ती व्यक्ती जन्माला आली आहे. ती संस्कृती म्हणजे भविष्यात एका सब्यतेशी तिचा संबंध जोडणारी असते. जशी संस्कृती असेल तशीच सभ्यता असता. म्हणजे सभ्यता काय तर संस्कृतीचे प्रतिबिंब. चांगली की वाईट हा प्रश्न सुरुवातीला कोणत्याही समूहात जन्माला येणाऱ्या अपत्याला माहीत नसते. संस्कृती म्हणजे एका समूहाच्या आंतरिक आणि बाहेरील प्रकरणाशी व्यवहार करण्यासाठी घालून दिलेले नियम. यात सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे नैतिकता आणि नैतिक मूल्ये. याचा अर्थ असा की एखाद्या संस्कृतीत नीतीमत्ता आणि नैतिक मूल्यांना महत्त्वाचे स्थान दिले जात नाही. त्यापासून प्रतिबिंबित होणाऱ्या सभ्यतेलाही महत्त्वाचे स्थान मिळत नाही.
जन्म घेणे एक तात्पुरती घटना असते. वाढ ही निरंतर प्रक्रिया असते. एखाद्या सभ्यतेचा उदय झाला तरी त्यात सर्जनशीलता नसेल तर ती सभ्यता जास्त काळ टिकत नाही. संस्कृतीत सर्जन शक्तीचा अभाव असेल तर त्याद्वारे उदयास येणारी सभ्यतेलादेखील महत्त्वाचे स्थान प्राप्त होत नसते. याचे कारण असे की सभ्यतेची प्रक्रिया खऱ्या अर्थाने मानवामानवांतील देवाणघेवाण आणि त्यांच्यापासून मानवजातीचा विकास असते. ज्या संस्कृतीद्वारे एखादी सभ्यता निर्माण होते त्यामध्ये अशा त्रुटीवर एक उपाय केला जातो. म्हणजे इतर सभ्यतांतील मूल्यांना आपल्या संस्कृती रुजवण्याचा किंवा काही घटकमूल्यांना स्वतःच्या संस्कृतीमध्ये जोपासण्याचा. पण अशा सभ्यता जरी काही आणखी अवधीसाठी टिकत असल्या तरी ज्या घटकांना त्यांनी इतर सभ्यतांमधून आयात केलेले असते त्यांचे मूळ या संस्कृतीच्या मुळाशी जुळत नसल्याने ते वाळीस लागतात. जोवर साधनसंपत्तीद्वारे अशा संस्कृतींना टिकवता येते तोवर ते तग धरतात किंवा राजकीय आश्रयाखाली फुलण्याचा प्रयत्न केला जातो, पण जेव्हा ही साधने संपुष्टात येतात तेव्हा साधनांद्वारे टिकवलेली सभ्यातदेखील कालांतराने आणि टप्प्याटप्प्याने नष्ट व्हायला सुरवात होते. शिवाय अशा संस्कृतीतील माणसे जेव्हा साकारलेल्या साधनसंपत्तीच्या जोरावर विलासी जीवन जगणे सुरू करतात तेव्हा त्यांना स्वतःहूनच आपल्या संस्कृती-सभ्यतेचा विसर पडतो. अशा सभ्यतेला परिघीय सभ्यता (Peripheral Civilization) म्हटले जाते. याचा अर्थ त्या संस्कृतीचा प्रमुख विचारधारेशी आयात केलेल्या सांस्कृतिक मूल्यांशी कोणताही संबंध नसल्याने ती विचारधाराच अशा सभ्यतेच्या पतनाला जबाबदार असते. कारण ती इतर संस्कृती-सभ्यतेच्या मूल्यांशी सुसंगत नसल्याने येत्या पिढीला ही घटकमूल्ये हस्तांतरित होत नसतात. या सर्व क्रिया-प्रक्रियांचा परिणाम असा होतो की अशा प्रकारच्या सभ्यता उदयास आल्या तरी काही काळानंतर त्या स्वतः लोप पावतात.
जगात अशा सभ्यतांची अनेक उदाहरणे देता येतील. बऱ्याच सभ्यता जन्माला आल्या आणि काही अधिक काळासाठी तर काही बऱ्यापैकी काळ टिकून राहिल्या. शेवटी त्या लयास गेल्या. त्या सभ्यतांतील जनसमूह बराच आटापिटा करत ते टिकवण्याचा प्रयत्न करत असतात. त्या समूहाची प्रमुख विचारधारेमध्येच (core ideology) तशी सर्जनशक्ती नसल्याने हे प्रयत्न शेवटी निकामी ठरतात. जगातील एकेकाळी शक्तिशाली ग्रीक (Hellenic) सभ्यता होती. याच सभ्यतेने सुरुवातीच्या काळात मानवतेला ज्ञानाची दारे उघडली. आजही ऱ्यापैकी राजकीय विचारधारा याच सभ्यतेतील विद्वानांनी विकसित केलेल्या विचारांवर आधारीत आहेत. अलेक्झांडरच्या काळात याच सभ्यतेने सीरियन आणि इराणी सभ्यतांना आव्हान दिले होते. त्यांच्या आव्हानासमोर उभे राहाणे सीरियन आणि इराणी सभ्यतांना जमले नाही. त्यांनी ग्रीक सभ्यतेच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी धार्मिक शिकवणींचा आधार घेतला होता. पण झोरोस्टरियन आणि ज्यू धर्मियांच्या प्रतिक्रिया फोल ठरल्या. पण त्याच वेळी इस्लामी प्रत्युत्तर यशस्वी ठरले. याचा अर्थ असा की त्या त्या धर्माच्या अनुयायींनी ग्रीक सभ्यतेला सामोरे जाण्याचा प्रयत्न कुचकामी होता, तर इस्लामी सभप्यतेच्या अनुयायांना यश मिळाले. याचे कारण काय हे आपण नंतर तपासणार आहतो.
एखादा समाज वा समूह प्रगतीपथावर असतो तेव्हा त्याला या जगातून अधिक काही प्राप्त करायचे नाही अशी त्यांची समज होते. हा टप्पा कोणत्या जनसमूहाचा आणि पर्यायाने त्यापासून उदयास आलेल्या सभ्यतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण असते. कारण अशा जनसमूहाच्या शिकवणीत या जगातून आपल्याला काय साध्य करायचे आहे याचीच चिंता जास्त असते. जगाला काही देण्याची त्यांची इच्छा नसते. जो समाज आणि समूह जेव्हा आपल्याच इच्छा-आकांक्षांमध्ये गुरफटून जातो तेव्हा त्या समाजाची किंवा जनसमूहाची प्रगती खुंटते. पण समाजाच्या अशा अवस्थेला जाबबादर कोण? याचे साधे उत्तर समाजातील प्रत्येक व्यक्तीस्तरावर जशी लोकांची विचारधारा तीच सामुहिक स्तरावर त्या जनसमूहाची विचारधारा. दुसरा प्रश्न उपस्थित होतो की याचा पुढचा टप्पा कोणता? याचे सोपे उत्तर असे की त्या जनसमूहांच्या वैचारिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक क्षमतेतच उणिवा असतात. या उणिवांमुळे त्या समाजाची वाढ खुंटते. याला ‘अरेस्टेड समाज’ म्हणता येईल. याचा शेवटचा टप्पा म्हणजे त्या जनसमूहाद्वारे जी सभ्यता उदयास आली होती त्याच्या संकुचित विचारधारेमुळे त्याचा पुढचा प्रवास थांबतो. अरेस्टेड समाजामुळे सभ्यतेचा पुढचा प्रवास थांबून तो जागच्या जागी स्थिरावतो. त्याला पुन्हा स्थापित करण्यासाठीचे प्रयत्न केले गेले नाही तर मग त्या सभ्यतेचे नष्ट होणे अटळ असते. या साऱ्या प्रक्रिया संकुचितप्रमुख विचारधारा असते, ज्यावर तो समाज विकसित झालेला असतो. म्हणून या विचारधारेतच जर बदल केला गेला तर मग सभ्यतेच्या भवितव्याची दारे उघडतील. पण विचारधारा बदलली की सभ्यताही बदलून जाते, कारण लोकांना यामागच्या सांस्कृतिक घटकांशी फारकत घ्यावी लागेल. तसे केल्यास समाजातील व्यक्ती दुसऱ्या सभ्यतेत विलीन होऊ शकतात. पण जुनी सभ्यता बहाल करता येत नसल्याने ती सभ्यात जगातून संपून जाते.
कोणतीही सभ्यता कठीण प्रसंगातून निर्माण होते. त्या सभ्यतेच्या विचारधारेत या प्रसंगांना तोंड देण्याची शक्ती असावी लागते. ज्या सभ्यतांचा ऱ्हास झाला त्याची कारणमीमांसा केल्यास असे दिसते की तो समाज-समूह अशा कठीण प्रसंगांना तोंड देण्यास नाकारतो. विचारधारेत जे परिवर्तन करावे लागत असतील त्या परिवर्तनांना नाकारले गेले. सजीव प्राणीमात्राला जगण्यासाठी आपल्या शारीरिक आणि वैचारिक स्थितीत बदल करावे लागतात. ते बदल केले नाहीत तर त्याचे अस्तित्व धोक्यात येते. तसेच काही सभ्यतांचे आहे. जी सभ्यता केवळ वंशवादी संस्कृती, आचारविचारांवर निश्चित केलेल्या भौगोलिक क्षेत्रामध्येच अडकून राहू इच्छिते ती शेवटी संपून जाते.
(पूर्वार्ध)
- सय्यद इफ्तिखार अहमद
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment