मुंबई
नवी दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या दहशतवादांच्या मोठ्या घातपाताचा कट होता. मुंबई आणि उत्तर प्रदेशमधील निवडणुका दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली. दरम्यान या दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड जान शेख यालाही अटक करण्यात आली असून तो मुंबईतील सायन भागात राहणारा आहे. यानंतर सर्वच तपास यंत्रणा अलर्टवर आहे. याच पार्श्वभूमीवर आरपीएफचे आयुक्त जितेंदर श्रीवास्तव, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि मध्य रेल्वेचे विभागीय संचालक शलभ गोयल यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत मुंबई लोकलच्या सुरक्षेबरोबरच महिलांच्या सुरक्षेबाबत देखील एक्शन प्लान तयार करण्यात आलेला आहे. तसेच लोकलच्या सुरक्षेसाठी एक नवीन मॉडेल तयार करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मुंबई आणि भारतातील अनेक शहरे बॉम्बस्फोटांनी हादरवून टाकण्याचा कट दिल्लीतील केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला. या गटातील एक मुख्य सूत्रधार मुंबईत राहत होता. त्याचं नाव जान मोहम्मद असून जान आणि त्याचा एक साथीदार गोल्डन टेंपल या ट्रेनमधून प्रवास करून दिल्लीकडे घाईघाईने जात होते. मात्र तपास यंत्रणांनी त्याला ट्रेनमध्येच पकडले. पण त्याच्या साथीदाराला पकडण्यात यश आले नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर राहून सध्या काम करत आहेत. दरम्यान दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची देखील रेकी केल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याने मध्य रेल्वेच्या मुख्यालयात मुंबईचे विभागीय संचालक आणि आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांची एक महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत लोकल रेल्वेची अतिरिक्त सुरक्षा वाढवण्याचे ठरवण्यात आले आहे. सुरक्षेसाठी एक मॉडल तयार करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. सध्या मुंबई लोकल आणि स्थानकांवर बॉम्ब शोधक पथक, सीसीटीव्ही, बॅग स्कॅनर मशीन आणि रँडम चेकिंगद्वारे सुरक्षा देण्यात येत आहे. या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली जाईल. तसेच ही यंत्रणा अद्ययावत करण्यात येईल, असे जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले.
Post a Comment