Halloween Costume ideas 2015

द येवला एज्युकेशन सोशल वेल्फेयर सोसायटी तर्फे 10वी व 12वी मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न


येवला (शकील शेख) 

5 सप्टेंबर शिक्षण दिनाचे औचित्य साधून नांदगाव रोड समदिया हॉलमध्ये द येवला ऐजुकेश सोशल वेल्फेयर सोसायटी तर्फे 10वी व 12वी मधे पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील जमाअत ए इस्लामी हिंद चे प्रा. डॉक्टर वाजिद अली खान, येवला शहर काजी सलिमोदीन वासील खान आदी उपस्थित होते. वजिद अली खान यांनी शिक्षणाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना चांगले व उच्च शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन केलं. चांगल्या मार्कांनी पास झालेल्य विद्यार्थी व विद्यार्थिनींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफ़ी व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला येवल्याचे अॅड. माणिकरावजी शिंदे तसेच एज्युकेशन सोसायटी भिवंडी येथील सभासद व पालकवर्ग जमाअत ए इस्लामी हिंद येवला व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget