उत्तर प्रदेशातील शामील येथील बनत कसब्यात राहणाऱ्या 24 वर्षीय समीर अहेमदला 8 ते 10 गुंडांनी एवढी मारहाण केली की तो गतप्राण झाला. या संदर्भात अधिक माहिती अशी की, समीर अहेमद या तरूणाला स्थानिक टाटा सर्व्हिस सेंटरमध्ये खाजगी नोकरी लागली होती. त्यासाठी त्याला आधार कार्डमध्ये सुधारणा करावयाची होती. त्यासाठी तो आधारकार्ड अपडेट करणाऱ्या कार्यालयासमोर रांगेमध्ये उभा होता. तेव्हा त्याच्या कोपऱ्याचा धक्का त्याच्या मागे उभ्या असलेल्या तरूणाला लागला. तेव्हा त्यातून वाद वाढला आणि 8 -10 गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी समीर अहेमदला बेदम मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना 9 सप्टेंबरला संध्याकाळी घडली. समीरचे नातेवाईक अब्दुल खालीद यांनी पत्रकारांना सांगितले की, ते 8 ते 10 लोक हिंदूत्ववादी संघटनेच्या नेत्यांचे परिचित लोक होते.
बनत हा कसबा शामली जिल्ह्यापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. हे एक मुस्लिम बहुल गाव आहे. तसे पाहता या कसब्यामध्ये साधारणपणे सांप्रदायिक वातावरण नसते. पण 2013 च्या झालेल्या दंग्याच्या दरम्यान थोडासा तणाव झाला होता. दहा हजार लोकसंख्येच्या या गावात मारहाण करणारे सर्व आरोपी सुद्धा राहतात. छोटं गाव असल्यामुळे प्रत्येकजण एकमेकाला ओळखतो. मृत समीरची आई फातिमा बीबी ने प्रेसला सांगितले की, त्यांचे पती राहील यांचा दोन वर्षापूर्वी मृत्यू झाल्यानंतर समीर हाच घर चालवत होता. सुरूवातीला समीर अहेमदने मोटार मेकॅनिक म्हणून आपल्या कामाला सुरूवात केली होती. त्याच्या जीवनाचा एकमात्र उद्देश आपल्या छोट्या भाऊ आणि बहिणीला उच्च शिक्षण देणे होते. त्याची कोणाशी दुश्मनी नव्हती. त्याला स्थानिक टाटा-शोरूममध्ये मेकॅनिक म्हणून नोकरी लागली होती. त्यासाठी आधारकार्ड दुरूस्तीची गरज होती. ती करण्यासाठीच तो गेला असताना हा प्रकार घडला. पोलीस स्टेशन आदर्श मंडीचे प्रभारी सुनील नेगी यांनी सांगितले की, या संदर्भात दोघांना अटक करण्यात आलेली आहे. बाकीच्यांचा शोध सुरू आहे.
त्यांनीही आरोपी एका विशेष विचारधारेचे असल्यामुळे त्यांची प्रतीमा गुंडासारखीच असल्याचे मान्य केले. मारहाण करणाऱ्या आरोपींचे नाव वतनराज पिता सौपाल, वरदान पिता मिंटू, अक्षय पिता कुल्लू, राज पिता राजेश, आशिष पिता हरिश्चंद्र, लकी पिता गब्बर, आयुषराणा पिता निर्देश राणा, भोंदा पिता भारत नमूद करण्यात आलेली आहे. या घटनेवरून उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेचा अंदाज येवू शकतो.
Post a Comment