Halloween Costume ideas 2015

कल्याण सिंह, संघ आणि ओबीसीचे राजकारण

Kalyan Singh

राजस्थानचे माजी राज्यपाल आणि दोन वेळेस उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले कल्याण सिंह यांचे 21 ऑगस्ट 2021 रोजी लखनऊ येथील एका रूग्णालयात निधन झाले. तेव्हापासून भाजपा परिवाराचे सर्व सदस्य त्यांना श्रद्धांजली वाहतेवेळी त्यांच्या प्रशंसेचे गोडवे गात आहेत. ते भाजपाचा ओबीसी चेहरा होते. प्रामुख्याने त्यांना यासाठी आठवणीत ठेवले जाईल कारण की त्यांनी आपल्या देखरेखीत बाबरी मस्जिदीचा विध्वंस केला होता. त्यावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी राष्ट्रीय एकता परिषद (ज्याची पुनर्स्थापना भाजपा सरकारने आतापर्यंत केली नाही.) च्या बैठकीत विश्वास दिला होता की ते बाबरी मस्जिदीची रक्षा करतील. त्यांनी कित्येक न्यायालयात त्याबद्दल शपथपत्र दिले होते कि राज्य सरकार बाबरी मस्जिदीच्या रक्षणासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करेल. परंतु जेव्हा मस्जिदीवर हतोडे पडू लागले तेव्हा त्यांनी तिथे उपस्थित पोलीस बळाला दूसरीकडे बघण्याचे निर्देश दिले. साहजिक आहे की या स्थितीचा लाभ उचलत कारसेवकांनी तिथे मनमानी केली. त्यावेळी आडवाणी, जोशी आणि उमा भारती मंचावरून कारसेवकांचे मनोबल वाढवित होते. 

तद्नंतर कल्याण सिहांना न्यायालयाचा अवमान केल्यामुळे एक दिवसाची शिक्षा सुनावली गेली होती. या शिक्षेला त्यांनी आपला सन्मान समजला आणि त्यानंतर काही दिवसांनी लोकांनी त्यांना ’हिंदू हृदय सम्राट’ म्हणण्यास सुरूवात केली. ते गर्वाने म्हणत की, भगवान रामासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत आणि जे काही अयोध्येत झाले त्याचा त्यांना क्वचितही पश्चाताप नाही. 

कालांतरापासून भाजपाची छवी उच्च जातीच्या पक्षाची होती. कल्याण सिंह, उमा भारती आणि विनय कटियार सारख्या लोकांनी तिला ओबीसीचा पक्ष बनविण्यास मोठी मदद केली. कल्याण सिंह हे एक प्रमुख ओबीसी नेते होते. ज्यांची छाप त्यांच्या स्वतःच्या लोध समुदाया व्यतिरिक्त उत्तरप्रदेशाच्या अन्य गैर-यादव ओबीसी जातींत जसे की मल्लाह, कुम्हार, कश्यप, कुर्मी आदीमध्ये ही होती. सन 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा केली. ’कल्याण सिंह फार्मुला’ अंतर्गत यादवेत्तर ओबीसींना भाजपा-संघांच्या झेंड्याखाली आणले गेले. यामुळे भाजपाला निवडणुकीत मोठा लाभ झाला. आरएसएसच्या शाखांमध्ये प्रशिक्षित कल्याण सिंह यांच्यावर पहिल्यांदा नानाजी देशमुख आणि नंतर लालकृष्ण आडवाणी यांची नजर पडली आणि दोघांनी त्यांना महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविल्या. 

त्यांच्या राजकारणाचा सुवर्णकाळ राम रथ यात्रेने सुरू झाला. मंडल आयोगाचा अहवाल लागू केल्यानंतर राम मंदिर अभियानात आणखीन गती आली. आरएसएसचा एक कटिबद्ध कार्यकर्ता म्हणून कल्याण सिंह, मंडल आयोगाच्या अहवाल लागू करण्याविरूद्ध होते. परंतु, निवडणुकीच्या कारणामुळे संघ परिवार सार्वजनिक पद्धतीने ते मंडल आयोगाचा विरोध करत नव्हते. ते संघाचे तत्कालीन सहसरकार्यवाह भाऊराव देवरस यांना भेटले. देवरस यांनी त्यांना या मुद्याबद्दल आरएसएसच्या विचारांची माहिती दिली आणि त्यांना म्हटले की, राममंदिर आंदोलन जेवढे मजबूत होईल तेवढे मंडल आयोग लागू करण्याचा प्रभाव ही तेवढा कमी होईल. याच म्हणण्याला अटलबिहारी वाजपेयी यांनी या शब्दात म्हटले की, ’’जब वो मंडल लाए तो हमें कमंडल लाना पडा’’.

संघ परिवार आपल्या उच्च जातींच्या समर्थकांना हा संदेश देऊ इच्छित होता की, होय, आम्ही आरक्षणाच्या विरूद्ध आहोत आणि आम्ही राममंदिर आंदोलन आणि रथयात्रेच्या माध्यमातून याचा विरोध करू लागलोत. प्रथमदर्शनी असे वाटते की, संघ फक्त धार्मिक अल्पसंख्यांकांच्या विरूद्ध आहे आणि सर्व हिंदूंच्या हिताचे रक्षण करत आहे.परंतु, खरेतर असे नाही. संघ हिंदू धर्मातील जन्म-आधारित जातीय आणि लैंगिक वर्गवारी कायम ठेऊ इच्छित आहे. त्याचा जन्मही त्या काळी झाला जेव्हा महिलांच्या शिक्षणाचा मार्ग सुरळीत व्हायला सुरू झाला होता आणि दलीतांनीही आंदोलनाचा मार्ग पत्करला होता. ज्योतिराव फुले यांनी महिला आणि दलितांना साक्षर करण्याचे अभियान सुरू केले होते. कारण ते जमीनीच्या जोखडातून मुक्त होऊन शहरात जावून आपल्या रोजी-रोटी कमाऊ शकेल. विदर्भातील ब्राह्मणेत्तर आंदोलन, फुले आणि तद्नंतर आंबेडकरांच्या शिक्षणातून प्रेरित झाले होते. हे आंदोलन ब्राह्मण जमीनदारांच्या वर्चस्वाला संपविण्याच्या मार्गावर केंद्रित होते. 

या सर्वांच्या मध्येच हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. कारण हिंदू धर्मामधील इतिहासाचे महिमामंडन केले जावे. दूसरे सरसंघचालक गोलवलकर, मनुच्या शिक्षणाचे समर्थक होते. त्यांचे पुस्तक ’मनुस्मृति’ लैंगिक आणि जातीगत वर्गवारीला कायम ठेवायची आचारसंहिता आहे.  संघाने सर्वात अगोदर स्वयंसेवक आणि प्रचारकांचे एक मोठे नेटवर्क उभा केले जे जाती आणि लिंग यावर आधारित भेदभावाला प्रसंगावधान, धर्मसम्मत आणि देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक अटींना सिद्ध करण्याच्या अभियानात जोडून घेतले. होऊ शकते की, भारताचा भूतकाळ फार चांगला फार उत्तम राहिला असेल परंतु, हे निश्चित आहे की, त्यावेळी दलित आणि महिलांची अवस्था अतिशय वाईट होती. जो लेखक भारताच्या भूतकाळाचे महिमामंडन करतो तो दलित आणि महिलांच्या स्थितीबद्दल गप्प बसून राहतो. त्यांच्यासाठी भगवान बुद्ध आणि भक्ती संतांद्वारा सांगितलेला समानतेचा सिद्धांत ’महान भारतीय सभ्यता’ च्या इतिहासातील एक छोटासी फुटनोट मात्र आहे. 

संघ आपला रंग बदलण्यात पटाईत आहे. आज तो गोळवलकर ची भाषा बोलत नाही. परंतु, त्याच्या मुल्यांत काही परिवर्तन आलेले नाही. तो हिंदुना एक करू इच्छितो परंतु हिन्दू धर्मामधील आंतरिक उतरंडिला सोडू इच्छित नाही. सैद्धांतिक स्तरावर तो म्हणतो की, सर्व जाती समान आहेत आणि सर्व हिंदू धर्माला शक्ती देत आहेत. परंतु, त्याला हे स्वीकार्य नाही की, कमकुवत जातींना प्रगतीच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्यासाठी सकारात्मक भेदभावाची नीति अमलात आणावी. यासाठी संघ परिवाराला आरक्षण मान्य नाही. आणि या नीतिच्या अंतर्गत कमकुवत आणि मागास समुदायांना हिन्दू राष्ट्रवादी समाजाचा अंग बनविण्यासाठी अनेक डावपेच आखले जातात. ज्यामध्ये समाज सेवा आणि हिन्दू भावनेला प्रबळ करण्याचे प्रयत्न सामील आहेत. 

या समुदाय (अर्थात दलित आणि ओबीसी) मध्ये संघ परिवाराचे प्रचारक मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. काही समाजशास्त्रींचे म्हणणे आहे की, संघ परिवार या लोकांमध्ये जोडला गेल्याने संघाच्या चारित्र्यातही बदल होत आहे. असे होत आहे की नाही हे सांगणे कठीण आहे परंतु, असे म्हणणे वावगे ठरणार नाही की, या समुदायांत संघाने केलेल्या कामाने भाजपाला आशादायी यश मिळवून दिले आहे. सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जिथे काँग्रेसला ओबीसींचे 15 टक्के मते मिळाली होती तिथे 44 टक्के ओबीसींनी भाजपाला समर्थन दिले होते. 

संघ परिवार मागास आणि सबाल्टर्न समुदायांच्या प्रतिकांवर कब्जा करत आलेला आहे. ज्या क्षेत्रात तो काम करत आहे त्याची प्रकृतीच्या आधारावर तो हे निश्चित करतो की त्याला ख्रिश्चनांच्या विरोधात बोलायचे आहे की मुसलमानांच्या. संघ परिवार आरक्षणावर आघात करायची संधी सोडत नाही. जेव्हा आंबेडकर जाती निर्मुलनाबद्दल बोलत होते तेव्हा संघ परिवार ’जिथे आहे जसे आहे’ आधावर जातींच्या मध्ये समन्वयाचा विश्वास देतो.

नरेंद्र मोदी यांनी ओबीसी परिवारात जन्म घेण्याचा भरपूर फायदा उचलला आहे परंतु त्यांचे राजकारण पूर्ण रूपाने हिन्दू राष्ट्रवादाचे आहे. कल्याण सिंह आणि उमा भारती सारख्या लोकांनी संघ परिवाराच्या झेंड्याखाली ओबीसींना स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. आज संघ परिवाराचे ध्यान मुख्यतः याच वर्गावर केंद्रीत आहे. कल्याण सिंहांनी याच प्रक्रियेची सुरूवात केली होती. भाजपा आणि त्याचे साथीदार याच समुदायांना केवळ एक सम्मानपूर्ण ओळख देऊ इच्छित आहेत. त्यांना त्यांचे अधिकार द्यावे अथवा त्यांच्यासाठी सकारात्मक तरतूदी करण्याचे संघाच्या अजेंडयत नाही.

- राम पुनियानी

(लेखक आईआईटी मुंबई येथे शिकवित होते आणि सन 2007 चे राष्ट्रीय जातीय सलोखा पारतोषिकांनी सन्मानित आहेत.)

 (इंग्रजीतून भाषांतर अमरिश हरदेनिया यांनी केले तर मराठीत एम.आय.शेख, बशीर शेख यांनी केले.)  


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget