अमरावती
वरुड (अमरावती) तालुक्यातील बेनोडा पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव ऊलटून एकाच कुटुंबातील एकूण 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलिस आणि बचाव कार्य पथक दाखल झाले आहे.
मंगळवारी सकाळी ही घडना घडली. एकाच कुटुंबातील 11 जण दशक्रिया विधीसाठी आलेले होते. दरम्यान सोमवारी दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज मंगळवारी फिरायला गेले होते यावेळी ही घटना घडली. नाव उलटून पाच जणांना जलसमाधी मिळाली, तर सहा जणांचा शोध सुरु आहे.
हे सर्व व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गडेगाव येथील होते. प्राथमिक माहितीनुसार एकाच कुटुंबातील अकरा नातेवाईक हे गाडेगाव येथील मते कुटुंबीयांकडे दशक्रिया विधीसाठी आले होते. काल (सोमवार) दशक्रिया कार्यक्रम आटोपल्यानंतर आज (मंगळवार) सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते सर्व नातेवाईक महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून हे बोटीतून जात होते. मात्र अचानक बोट उलटली आणि अकरा जण बुडाले. यामध्ये बहिण, भाऊ, जावई असा एकमेकांचे नातेवाईक असलेल्या 11 जणांचा समावेश आहे. बोटीतील सर्वजण बुडाले असल्यामुळे अकराही जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र शोधकार्य सुरु असून दुपारपर्यंत तीन जणांचे मृतदेह हाती लागल आहेत. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. पोलिस व बचाव पथकाच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.
Post a Comment