Halloween Costume ideas 2015

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस


गांधीनगर

 देशातील अनेक राज्यांमध्ये काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत असून पुरामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात सतत मुसळधार पाऊस सुरू असून डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गुजरातच्या सौराष्ट्रात सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकोटपासून जामनगरपर्यंत नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे मधील नागरी वस्त्या जलमय झाल्या असून परिस्थिती इतकी भीषण आहे की येथील लोकांना वाचविण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक कार्यरत आहेत. तसेच वायुसेनेचे हेलिकॉप्टरही रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहे.

गुजरातच्या राजकोट, जुनागड आणि जामनगर भागात पावसाने प्रचंड कहर माजवला आहे. या पावसात अडकून पडलेले लोक जीव वाचविण्यासाठी अक्षरश: विव्हळत आहेत. गावापासून शहरापर्यंत अनेक ठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे, तर अनेक रस्ते पुरात बुडाले असून गावांचा संपर्कही तुटला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले इथल्या परिस्थितीचे फोटो अत्यंत वेदनादायी आहेत. दरम्यान, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान आपला जीव धोक्यात घालून येथील लोकांचे जीव वाचवत आहेत. जमिनीवरील परिस्थिती भयंकर असल्याने एका घराच्या छप्परावरून दुसऱ्या घराच्या छप्परापर्यंत लोखंडी ग्रीलचा रस्ता बांधून जवान लोकांना उचलून घेऊन जात आहेत. राजकोटमध्ये आतापर्यंत १४०० लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून ३०० हून अधिक लोकांचा जीव वाचवला आहे. तर जामनगरमध्ये काही ठिकाणी वायुसेनेकडून बचावकार्य सुरू आहे. वायुसेनेने काल दिवसभरात येथील २४ लोकांना वाचवले. तसेच पुरामुळे जामनगर-कलावाड महामार्ग बंद असून जामनगर, अमरेली आणि पोरबंदरचे ६ महामार्गही बंद ठेवण्यात आले आहेत. तर राजकोट महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. या पुरात एक कार अलगद वाहून गेली असून सुदैवाने कारमधील सर्वांना सुखरूप वाचविण्यात आले.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget