भारताची फाळणी विसाव्या शतकातील सर्वात मोठी त्रासदायक घटना होती. फाळणीच्या दरम्यान जेवढ्या मोठ्या संख्येने लोक मारले गेले आणि जेवढ्या मोठ्या संख्येने लोकं घरं, दारं, सोडून शेकडो मैल जाऊन अनोळखी क्षेत्रामध्ये प्रस्थापित झाले, तशी घटना जगात फार कमी वेळा झालेली आहे. फाळणीच्या जखमा अजून पूर्णपणे भरलेल्या नाहीत परंतु, हळूहळू लोक फाळणीचे सत्य स्वीकारू लागलेले आहेत.
तसं पाहता भारतात समस्या कमी नाहीत. त्यातच पंतप्रधान मोदी यांनी 14 ऑगस्टला फाळणीचा त्रासदायक घटनांचा स्मृतीदिन साजरा करण्याची घोषणा केली. 14 ऑगस्टच्या नंतर दुसऱ्याच दिवशी आपण इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा करतो. याच दिवशी भारताने समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव तसेच सामाजिक न्यायावर आधारित एक राष्ट्र निर्माण करण्याची यात्रा सुरू केली होती. यात कुठलाच संशय नाही की कित्येक लाख कुटुंबांना आपल्या नातेवाईकांपासून दूर जाऊन नाईलाजाने दुसऱ्या ठिकाणी सामंजस्य प्रस्थापित करावे लागले होते. त्यासाठी त्यांना ज्या झळा बसल्या त्याचे मर्मस्पर्शी विवरण अनेक गोष्टी, कादंबऱ्या, कविता आणि आठवणींमध्ये उपलब्ध आहेत. पार्टीशन्स स्टोरीज त्या काळात महिलांवर झालेल्या अत्याचारांचे विवरण असलेली एक उत्कृष्ट कृती आहे. आज आपल्याला अचानक फाळणीच्या जुन्या जखमांना परत आठवण करण्याची काय आवश्यकता आहे. ते दिवस आम्ही यासाठी आठवणीत आणायचे की त्याचे आम्ही प्रायश्चित करू किंवा यासाठी की आपल्या मूळ विचारधारेचा त्याग करून आपण विदेशी शक्तींच्या जाळ्यात फसलो.
या प्रश्नाचे उत्तर भाजपा महासचिव (संघटन, उत्तरप्रदेश) यांनी केलेल्या एका ट्विटवरून समजून घेता येऊ शकते. त्यांनी म्हटले आहे की, ही एक स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे आपण त्या त्रासाची आठवण करू शकू जो त्रास नेहरूंचा वारसा जपणाऱ्या ध्वजवाहकांनी विसरवण्याचा प्रयत्न केला आहे. या संबंधात केंद्रीय मंत्री हरदिपसिंह पुरी यांचे म्हणणे असे की, ’’फाळणी आपल्यासाठी एक धडा आहे की, इतिहासात केलेल्या चुकांचे आपण पुन्हा अनुसरण करू नये आणि भारताला सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करून आणि सर्वांचा विश्वास प्राप्त करून पुढे घेऊन जावे ना की तुष्टीकरणाच्या मार्गावर विशेषकरून जेव्हा आमच्या शेजारी अस्थिर परिस्थिती आहे.’’
सामान्य लोकांच्या मनामध्ये एक गोष्ट ठासून भरली आहे की, फाळणीच्या मागे नेहरूंची तुष्टीकरण निती होती. थोडक्यात फाळणीसाठी मुसलमान जबाबदार होते. ही धारणा लोकांमध्ये मोठ्या व्यापक प्रमाणात पसरलेली आहे परंतु, ती खरी नाही. फाळणी प्रामुख्याने इंग्रजांच्या फोडा आणि झोडा नितीमुळे झाली होती. जी नीती त्यांनी 1857 नंतर मोठ्या उत्साहात लागू केली होती. त्यांच्या याच नितीने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जातीय भावनेला हवा दिली होती. फाळणीचे सर्वात मोठे कारण ब्रिटिशांचे धोरण होते. ज्याचा मौलाना आझाद आणि गांधी सारख्यांनी जोरदार विरोध केला होता.
ज्यावेळेस देशाला फोडण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस महात्मा गांधी यासाठी गप्प होते की, दोन्हीकडून जातीय दंगली भडकावण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला जात होता. दोन्हीकडून घृणा पसरविली गेली आणि दोन्ही दोन्हीकडून हिंसा झाली. पुरींच्या वक्तव्यामध्ये ज्या तुष्टीकरणाचा उल्लेख केला गेलेला आहे त्या संदर्भात आपण पाहू शकतो की, सरदार पटेल यांनी हिंदू जातीय संघटन आरएसएसकडून फैलावल्या जात असलेल्या घृणेच्या बाबतीत काय म्हणणे होते, पटेल म्हणाले होते, ’’उनके (आरएसएसचे) सभी भाषण नफरत के जहेर बुझे होते थे. हिंदूओं को उत्साहित करणे और उनकी रक्षा के लिए उन्हें संघटित करने के लिए नफरत का जहेर फैलाना जरूरी नहीं था. इस जहर का अंतिम नतीजा गांधीजी के अमुल्य जीवन की बली थी’’
आतापर्यंत हिंदू राष्ट्रवाद्यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी प्रामुख्याने गांधी होते. आता त्यांनी आपल्या तोफांची दिशा नेहरूकडे वळविली आहे. काँग्रेसला आवडत नसतांनाही फाळणी स्विकारावी लागली. ही काँग्रेसची मजबूरी होती. ब्रिटिशांनी जातीयवादाच्या सैतानाला बाटलीच्या बाहेर काढले होते. त्या सैतानाचा मुकाबला करणे कोणालाही शक्य नव्हते. काँग्रेसचे सर्वाधिक काळासाठी अध्यक्ष राहिलेले मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शेवटच्या क्षणापर्यंत फाळणीचा विरोध केला. त्यांच्या तुलनेत काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या अनेक सदस्यांनी ज्यांनी फाळणीला एक अनिवार्यता म्हणून स्विकारले होते. कारण त्यांची अशी धारणा होती की, भारतीय उपमहाद्विपामध्ये गृहयुद्धाची भीषण परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी फाळणी स्विकारणे गरजेचे होते, असा विचार करणाऱ्यांमध्ये राज गोपालाचारी सुद्धा सामील होते.
जेव्हा लॉर्ड माऊंट बेटनने विभाजनाचा मसुदा काँग्रेसच्या शिर्ष नेतृत्वासमोर ठेवला तेव्हा नेहरूंच्या आधी सरदार पटेलनी त्याला स्विकृती दिली. या घटनाक्रमाचे विस्तृत वर्णन मौलाना आझाद यांनी लिहिलेल्या ’इंडिया विन्स फ्रिडममध्ये’ उपलब्ध आहे. जिथपर्यंत तुष्टीकरणाचा संबंध आहे त्याबाबतीत असे म्हणता येईल की, पुरींसारखे सांप्रदायिक तत्व काँग्रेसवर नेहमीच मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा आरोप लावत आलेले आहेत. हे तेव्हाही लावले गेले जेव्हा बद्रोद्दीन तय्यबसारखे उच्चकोटीचे नेते काँग्रेसअध्यक्ष बनले होते.
गोडसे देशाच्या फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार ठरवत होता. हे तेव्हा की जेव्हा गांधीजींन म्हटलं होतं की फाळणी माझ्या प्रेतावर होईल. गांधींच्या या वाक्याचे सांप्रदायिकतत्व टिंगल करत होते. तोपर्यंत आरएसएसचा खेळ पटेलांच्या लक्षात आला होता. संघ एकीकडे मुस्लिमांच्याविरूद्ध घृणा पसरवून समाजाला धार्मिक आधारावर विभाजित करत होता तर दुसरीकडे अखंड भारताच्या गोष्टीही करत होता. ज्याचा अर्थ असा होता की, मुस्लिमांना हिंदूंचे प्रभूत्व स्विकारून अखंड भारतात रहावे लागणार होते. स्पष्ट आहे मुस्लिमांना हे मान्य नव्हतं. ही गोष्ट सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे की, हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचे जन्मदाते सावरकर होते ज्यांनी सर्वप्रथम म्हटले होते की, भारतात दोन राष्ट्र आहेत. एक हिंदू राष्ट्र, दोन मुस्लिम राष्ट्र. लंडनमध्ये त्या काळी अभ्यासासाठी गेलेले चौधरी रहमतअली यांनी 1930 मध्ये पहिल्यांदा मुस्लिम बहुल देशासाठी पाकिस्तानचे नाव सुचविले होते. अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, सावरकारांच्या द्विराष्ट्राच्या सिद्धांतांनेच जिन्नांना पाकिस्तानची मागणी करण्याची प्रेरणा दिली होती.
फाळणीच्या आठवणी जागविण्याच्या मोदींच्या आव्हानाचा काय परिणाम होईल? नक्कीच यामुळे मुस्लिमांबद्दल घृणा वाढेल. याशिवाय, असेही प्रयत्न केले जातील की फाळणीची संपूर्ण जबाबदारी नेहरूंवर टाकली जाईल. सध्या देशात ज्या प्रकारे घृणा पसरत चाललेली आहे तिला पाहून मन हादरून जाते. अलिकडेच एका मुस्लिम ऑटोवाल्याला जय श्रीरामची घोषणा देण्यास विवश करण्यासाठी मारहाण केली गेली. दरम्यान, त्याची लहान मुलगी दयेची भीक मागत होती. आम्ही हे कसे विसरणार ज्या ठिकाणापासून देशाचे सत्ताधारी सरकार चालवितात. त्याच्यापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर उघडपणे गोली मारो आणि काटे जाएंगे सारख्या घोषणा दिल्या गेल्या होत्या.
- राम पुनियनी
(इंग्रजीतून मराठी भाषांतर अमरिश हरदेनिया, हिंदीतून मराठी भाषांतर एम.आय.शेख, बशीर शेख यांनी केले.)
Post a Comment