पर्यावरणीय संकटाची खरी कारणे
पर्यावरणीय संकट हे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा परिणाम आहे हे नाकारता येत नाही. वैज्ञानिक युगात एका तासातील विनाश हा गैर-वैज्ञानिक युगातील हजारो वर्षांच्या विश्वाच्या विनाशापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की विज्ञान स्वतः दोषी आहे, परंतु ही एक दैवी देणगी आहे ज्यामुळे ब्रह्मांडातील शक्तींवर विजय मिळविणे आणि त्याचा उपयोग करणे आमच्याकरिता शक्य झाले आहे. पश्चिमेमध्ये आधुनिक विज्ञानाचा विकास निरीश्वरवादाच्या प्रभावाखाली झाला असल्याने ते कोणत्याही प्रकारच्या मूलभूत व्यवस्थेपासून मुक्त आहे, त्याचे संपूर्ण लक्ष्य भौतिक प्रगतीवर वेंâद्रित आहे. त्याने या आध्यात्मिक उत्क्रांतीकडे आणि परिणामी मानवी प्रगतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. धर्मनिरपेक्ष भौतिकवादाच्या प्रभावाखाली असलेली सभ्यता, ईश्वर व पारलौकिक संकल्पनेशी पूर्णपणे अपरिचित आहे. तिचे मूळ स्वार्थ आणि शोषणावर आधारित आहे, ज्यामध्ये मनुष्याचे अंतिम लक्ष्य साधेपणा, भौतिकवाद, सुख शोधणे आणि पाशवी वृत्तीचा अवलंब आढळून येतो. भावनांच्या समाधानाशिवाय आणि शारीरिक इच्छांच्या पूर्ततेशिवाय काहीही नाही. मानवी प्रगतीऐवजी मानवी विनाशात आधुनिक साधने आणि संसाधने वापरली जात आहेत आणि भौतिक प्रगतीचे शिखर गाठूनदेखील आत्मिक समाधान शून्य आहे. याचे दुष्परिणाम आज संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत.
आधुनिक भौतिक सभ्यतेने मनुष्याला ईश्वर आणि निसर्गापासून विभक्त केले आहे आणि केवळ त्याच्या आत्म्याचाच नाश केला नसून त्यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय व्याधीमुळे त्याचे शारीरिक अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. जगभरातील शास्त्रज्ञ, विचारवंत आणि बुद्धिजीवी पर्यावरणीय संकटाची कारणे कार्यरत आहेत. मुस्लिम आणि बिगर मुस्लिम विद्वान पर्यावरणीय संकटाला नैतिकतेचे आणि मूल्यांचे संकट म्हणत आहेत, जो खरे तर मानवी जीवनातील आध्यात्मिक पोकळीचा परिणाम आहे. पर्यावरणीय संकटाचे विश्लेषण करताना, विविध विचारवंतांनी लोभ, दारिद्र्य, संपत्तीचे असमान वितरण, लोकसंख्यावाढ, असीमित आर्थिक वाढीची लालसा, उद्योग, राष्ट्रीयत्व, सैन्यवाद, उपभोक्तावाद आणि भौतिकवाद यामागील कारणे दर्शविली आहेत. आणि त्याच्या निराकरणासाठी, नम्रता, कृतज्ञता, न्याय, दया आणि सजीवांसाठी असलेले प्रेम यासारख्या नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांवर जोर देण्यात आला आहे, परंतु नैतिक मूल्यांचा वास्तविक स्रोत धर्म आहे, नास्तिकवाद नाही आणि धर्माशिवाय नैतिक मूल्यांची कल्पना करणे अशक्य आहे.
सध्याची परिस्थिती ही व्यक्तिशः आणि समाजावरील धर्माची पकड ढिली पडण्याचा परिणाम आहे, कारण मानवी चरित्र सुधारण्यासाठी आणि नैतिक बदनामी रोखण्यासाठी धर्मापेक्षा प्रभावी आणि सामथ्र्यवान प्रेरणा दुसरी असूच शकत नाही.
‘न्यूयॉर्क अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या अध्यक्ष क्रॅसी मेरीस म्हणाल्या:
‘‘शिष्टाचार व आदर, औदार्य, चरित्र, नैतिकता, उच्च आदर्श आणि ज्यांना दैवी गुण म्हटले जाऊ शकते ते निरीश्वरवादातून निर्माण होऊ शकत नाहीत, जो खरे तर त्याची निर्मिती हाच एक विचित्र प्रकार आहे ज्यात माणूस स्वत:ला ईश्वराच्या जागी ठेवतो. विश्वास आणि श्रद्धाविना सभ्यता नष्ट होईल. शिस्तीचे परिवर्तन अराजकतेत होईल, आत्मनियंत्रण अदृश्य होईल आणि सर्वत्र विनाशा पसरेल. ईश्वरावरील आपली श्रद्धा आणखीन दृढ करण्याची सध्या गरज आहे.’’
जबाबदार व संतुलित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी
आणि नीतिमान सभ्यतेच्या स्थापनेसाठी ईश्वर आणि पारलौकिक जीवनाच्या संकल्पनेची आवश्यकता आहे. वहीदुद्दीन खान यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘‘खरे तर सभ्यता निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचे एकमेव आणि योग्य उत्तर म्हणजे धर्म होय. धर्म आपल्याला वास्तविक, विधिमंडळ, कायद्याचा सर्वात योग्य आधार, जीवनाच्या प्रत्येक बाबतीत सर्वांत योग्य मार्गदर्शन करतो, ज्याच्या प्रकाशात आपण जीवनाचा संपूर्ण आराखडा बनवू शकतो. ते मार्गदर्शन कायद्याचा मानसिक पाया प्रदान करतो. या मार्गदर्शनाशिवाय हा कायदा व्यावहारिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतो. त्याच्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीकरिता समाजात अनुकूल वातावरण निर्माण होते. अशा प्रकारे धर्म आपल्याला सर्व काही प्रदान करतो. आपल्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी आम्हाला जे हवे आहे ते देतो तर निरीश्वरवाद यापैकी काहीही देऊ शकला नाही आणि खरोखर देऊ शकत नाही.’’ (भाग ३) - क्रमश:
- शाहजहान मगदुम
मो.: ८९७६५३३४०४
Post a Comment