Halloween Costume ideas 2015

पर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – भाग ५

इस्लाम, शाकाहार आणि पर्यावरण

Earth
ज्या वेळी पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पुत्र इब्राहीम दीड वर्षाचे असताना निधन पावले तेव्हा पैगंबरांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. या गोष्टीचे त्यांच्या साथीदारांना आश्चर्य वाटले. त्यांच्यापैकी एकाने पैगंबरांना विचारले, ‘‘आपण तर ईश्वराचे संदेशवाहक (पैगंबर) आहात, मग का रडत आहात?’’ पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘ज्याच्या मनात दयाभाव नाही, तो चांगला मनुष्य होऊ शकत नाही.’’
म्हणून दया आणि सहानुभूती एका सच्चा मुस्लिमासाठी आवश्यक असते. इस्लाममध्ये जमिनीवर फिरणारी मुंगीदेखील अकारण मारणे पाप ठरविण्यात आले आहे. जर एखादे मूल पशुपक्ष्यांना त्रास देत असेल विंâवा त्यांना दु:ख असेल तर त्याने अल्लाहकडे माफी मागावी आणि इतर मुलांनाही असे करण्यापासून रोखावे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी खरोखरच लोकांना प्रेम आणि शांततेने जीवन व्यतीत करण्यास शिकविले.
इस्लामी दर्शनशास्त्राचा सखोल अभ्यास केल्यास त्याच्या पाया दया व करुणेवर उभारल्याचे आढळून येतो. पैगंबरांनी स्पष्टपणे म्हटले आहे की तुम्ही या पृथ्वीतलावरील सर्व जीवजंतुंवर दया करा, ईश्वर तुमच्यावर दया करील. याचाच अर्थ इस्लाम मनुष्याबरोबरच समस्त जीवजंतुंवरदेखील दया करण्यास शिकवितो. मग असा प्रश्न उपस्थित
होतो की जर इस्लाम जीवजंतुंवर दया व कृपा करण्यास शिकवितो तर मग मुस्लिम लोक जनावरांची हत्या करून त्यांचे मांस का खातात?ते शाकाहारी का बनत नाहीत? त्यांनादेखील जीवन जगण्याचा अधिकार आहे.
इस्लामनुसार प्रत्येक मुस्लिमाने मांसाहार करण्याची आवश्यक नाही. जर एखादी व्यक्ती स्वेच्छेने शाकाहार घेत असेल तर काही हरकत नाही, तो मुस्लिमच राहील, इस्लाममधून त्याला बाहेर काढले जाणार नाही. परंतु त्याचबरोबर इस्लाम हेदेखील मानतो की मनुष्य सुरुवातीपासूनच मांसाहारी आणि शाकाहारी आहे. कोट्यवधी-अब्जोवधी मासे, पक्षी, शेळ्यामेंढ्या, उंट, घोडे या सर्वांची कोणत्या न् कोणत्या कामासाठी ईश्वराने निर्मिती केली आहे. जसे ते आम्हाला दूध, अंडे, लोकर, कातडी देतात तसेच ते आहारदेखील देतात. त्यांचा उचित उपयोग केला गेला नाही तर पर्यावरणाचे संतुलन नष्ट होईल.
इस्लामनुसार मानवांच्या एका फार मोठ्या लोकसंख्येच्या आहारासाठी अन्न आणि फळांऐवजी हेच उपलब्ध आहे. एस्कीमो आणि समुद्रकिनाऱ्यावर वास्तव्य करणाऱ्या शेकडो लोकसमुदायांचा आहार मासे आणि इतर जलचर प्राणी आहेत. अनेक ठिकाणी कसलाही भाजीपाला पिकत नाही आणि लोकांना जीवंत राहण्यासाठी जनावरांच्या मांसावरच अवलंबून राहावे लागते. अशा प्रकारे अरबस्थानच्या वाळवंटात उंट व शेळ्यामेंढ्यांचे दूध आणि मांसाबरोबरच तंबू आणि पादत्राणे बनविण्यासाठी कातडीदेखील प्राप्त केली जात होती. अरबांची अर्थव्यवस्था पूर्णत: याच पशुंवर अवलंबून होती. म्हणून इस्लाम आवश्यकतेनुसार नियोजनाची मनाई करत नसून तो व्रूâर वर्तणुकीचा कट्टर विरोधक आहे.
इस्लाम एखाद्या सजीवास आगीत जीवंत जाळणे, करमणुकीसाठी मारून टाकणे, त्यांच्यावर आवश्यकतेपेक्षा अधिक ओझे टाकणे, दूध पाजणाऱ्या मादीची हत्या करणे, पक्ष्यांची अंडी अथवा घरटी तोडून टाकणे अथवा एखाद्या सजीवास अतोनात त्रास देऊन मारणे यास धर्मविरोधी काय मानतो. पैगंबर मुहम्मद (स.) एक असा समाज स्थापित करू इच्छित होते की ज्यात अस्पृश्यता नसावी, गरीब-श्रीमंताचा भेद नसावा, स्त्री-पुरुषांमध्ये असमानता नसावी. पैगंबरांनी गुलामांना (सेवकांना) सन्मान व आत्मविश्वास प्रदान केला. त्यांना मुक्त करविले, जन्मत:च मुलींना ठार मारण्याची प्रथा बंद केली. त्यांनी समस्त प्राणीमात्रांप्रती प्रेमाचा संदेश दिला आणि वृक्षांच्या संरक्षणाचा आदेश दिला.
मानव एक सामाजिक प्राणी आहे आणि समाजात राहाण्यासाठी धर्माचा मुख्य आधार असतो. धर्माचा शाब्दिक अर्थ होतो ज्यास धारण केले जाते तो धर्म. सर्व धर्माच्या मर्यादांमध्ये बंदिस्त असतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्राणीमात्रांचे समस्त कार्य व व्यवहार धार्मिक मर्यादांनुसारच घडत असतात. शांतता आणि स्थिर चित्तातून लोकहितात स्वहित स्वत:च बनते. या चिंतनाचा प्रत्येक व्यक्तीने अवलंब केल्यास समाजातील सामाजिक, आर्थिक,नैतिक प्रदूषणाच्या समस्येवरदेखील तोडगा निघू शकतो. पर्यावरणाच्या लोकानुभवानुसार १९९० ते २०२० च्या दरम्यान दररोज ५० जीव आणि वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होतात. जर जंगलतोड आणि औद्योगिक वायूंपासून निर्माण होणाऱ्या तापमानवृद्धीवर नियंत्रण मिळविले गेले नाही तर भयंकर परिणाम होतील.
पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रित करणे आम्हा सर्वांची आवश्यकता आहे. यासाठी आम्हाला अगदी मनापासून आपल्या संस्कृतीच्या रक्षणासह नैतिक मूल्यांना महत्त्व देऊन एकत्रित प्रयत्न करायला हवेत. नैतिक मूल्यांच्या संरक्षणासाठी वैयक्तिक, सामाजिक पातळीवर आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आम्हाला नैतिक प्रदूषणावर नियंत्रण मिळविले पाहिजे.
(भाग ५) - क्रमश:

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget